शनिवार, २५ जुलै, २०२६

Gen Z चा मोदी सरकारला हादरा; भारतीय राजकारण नव्या वळणावर?


केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार, परीक्षा व्यवस्थेवरील प्रश्न आणि देशभरातील विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला. या आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील NDA सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. हा दबाव मोदींच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत होता. जेन झीने त्यांना सळो की पळो करून सोडले होते. आतापर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांची झाली नाही एवढी छी-थू मोदींची सुरू होती. त्यामुळे सरकारपुढे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन या नाचक्कीपासून स्वतःची सुटका करून घेण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. अखेर मोदींनी प्रधान यांचा राजीनामा घेतला आणि स्वतःची सुटका करून घेतली. Dharmendra Pradhan Resignation Pm Modi

A Political Shock- मोदी सरकार प्रथमच दबावात

मोदी सरकार सत्तेत आले तेव्हापासूनच म्हणजे 2014 पासून देशात एक समज तयार झाला होता. तो म्हणजे, NDA चे मंत्री राजीनामा देत नाहीत. भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांचा याविषयीचा एक बाईट प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नाही, तर तो भारतीय राजकारणातील एका नव्या टप्प्याचा संकेत म्हणूनही पाहिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण आंदोलनाने आणि वाढत्या राजकीय दबावाने केंद्राला त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे "सरकार कधीच झुकत नाही" हा समज मोडून निघाला. NEET Paper Leak


Gen Z म्हणजे नेमके कोण?

Gen Z म्हणजे साधारणपणे १९९७ ते २०१२ या कालावधीत जन्मलेली पिढी. ही पिढी इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडियासोबत वाढलेली आहे. ही पिढी माहिती मिळवण्यासाठी पारंपरिक माध्यमांवर कमी आणि डिजिटल माध्यमांवर अधिक अवलंबून असते. अन्याय किंवा गैरव्यवहाराची माहिती काही मिनिटांत लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याची ताकद या पिढीकडे आहे. त्यामुळे आंदोलनाची पारंपरिक व्याख्या बदलली असून डिजिटल मोहीम आणि प्रत्यक्ष रस्त्यावरील आंदोलन यांचे प्रभावी मिश्रण आज दिसून येत आहे. Gen Z Movement India

Gen Z Movement- रस्त्यावर उतरलेल्या तरुणांची नवी ताकद 

आजची जेन झी पिढी केवळ सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणारी नाही. ती प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून सरकारला प्रश्न विचारणारी पिढी म्हणून समोर आली आहे. NEET परीक्षेतील अनियमिततेच्या आरोपांनंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची व्याप्ती वाढली. त्यांच्या मते, हा केवळ एका परीक्षेचा प्रश्न नव्हता, तर देशातील शिक्षणव्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न होता. आंदोलन सातत्याने सुरू राहिल्यामुळे ते राष्ट्रीय चर्चेचा विषय बनले. त्यामुळेच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हे नवतरुण आंदोलनकर्ते आपल्या संघर्षाचा पहिला मोठा विजय म्हणून साजरा करत आहेत. Reuters 


Social Media Revolution- मोबाईलवरून उभे राहिलेले आंदोलन

पूर्वी आंदोलने संघटना आणि पक्षांच्या माध्यमातून उभी राहत असत. आज परिस्थिती वेगळी आहे. X (Twitter), Instagram, YouTube, Telegram आणि WhatsApp या माध्यमांमुळे हजारो विद्यार्थी काही तासांत एकत्र येऊ शकतात. हॅशटॅग, व्हिडिओ आणि लाईव्ह अपडेट्समुळे आंदोलनाला राष्ट्रीय स्वरूप मिळाले. सोशल मीडियाने केवळ माहिती पोहोचवली नाही, तर आंदोलनाला गती आणि व्यापकता दिली. त्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्म आता भारतीय लोकशाहीतील प्रभावी साधन म्हणून समोर आले आहेत. NEET Scam

विद्यार्थी आंदोलनांचा इतिहास 

भारतात विद्यार्थी आंदोलनांचा इतिहास मोठा आहे. १९७४ मधील बिहार विद्यार्थी आंदोलनाने राष्ट्रीय राजकारणाला वेगळी दिशा दिली होती. मंडल आयोगाच्या निर्णयानंतर देशभर झालेली आंदोलनेही इतिहासात नोंदली गेली. आंतरराष्ट्रीय स्तरावर हाँगकाँगमधील विद्यार्थी आंदोलनानेही सरकारवर मोठा दबाव निर्माण केला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आवाज हा केवळ शैक्षणिक प्रश्नापुरता मर्यादित राहत नाही; तो अनेकदा व्यापक सामाजिक आणि राजकीय बदलांचे कारण ठरतो.

NEET Paper Leak आणि शिक्षणव्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न

विद्यार्थ्यांचा मुख्य मुद्दा फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नव्हता. परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह व्हावी, ही त्यांची मूलभूत मागणी होती. पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थापन आणि उत्तरदायित्व या मुद्द्यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण केला. सरकारने चौकशी, परीक्षा रद्द करणे आणि पुढील काळात CBT पद्धतीचा निर्णय यासारखी पावले जाहीर केली. पण विद्यार्थ्यांच्या मते, यासबंधी आणखी व्यापक सुधारणा आवश्यक आहेत. 

Congress Support- विरोधकांनी आंदोलनाला दिले राजकीय पाठबळ

जेन झी आंदोलनाला विविध विरोधी पक्षांनी, विशेषतः काँग्रेसने, उघडपणे पाठिंबा दिला. त्यामुळे हा विषय संसदेपासून रस्त्यापर्यंत पोहोचला. विरोधकांनी सरकारला उत्तरदायी धरण्याचा प्रयत्न केला. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर धडक दिली. त्यांनी तिथे पोलिसांच्या दबावाचा सामना केला. ते ठामपणे आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे उभे राहिले. त्यांच्या नाकातून रक्त निघाले. नेत्याचा कार्यकर्ता झालेले हे चित्र, तमाम विरोधी पक्षांना सुखावून गेले. यामुळे सत्ताधारी पक्षाची प्रतिमा एखाद्या हुकूमशहासारखी अधोरेखित झाली. त्यांना परीक्षा सुधारणा व कारवाईला प्राधान्य द्यावे लागले. परिणामी, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि राजकीय पाठिंबा यांचा संगम सरकारवरील दबाव वाढवणारा घटक ठरल्याचे विश्लेषक मानतात.  Student Movement India


What Next? 

आता सर्वात मोठा प्रश्न आहे- यापुढे काय? काही आंदोलनकर्ते केवळ शिक्षणव्यवस्थेतील बदलांवर लक्ष केंद्रित करतील, तर काही व्यापक सामाजिक आणि राजकीय प्रश्न उपस्थित करू शकतात. रोजगार, पारदर्शक भरती, परीक्षा प्रक्रिया आणि उत्तरदायित्व यांसारखे विषय आधीच चर्चेत आले आहेत. तथापि, हे आंदोलन भविष्यात सत्तांतराकडे नेईल की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. पण विरोधक याविषयी एकेक पाऊल पुढे टाकू शकतात असे संकेत मिळत आहेत. असे झाले तर भारतात पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडताना दिसून येतील. 

Indian Politics 2026- तरुणांच्या राजकीय भूमिकेचा नवा अध्याय 

आत्ताच्या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे. ती म्हणजे, भारतातील तरुण मतदार आणि विद्यार्थी वर्गाला आता दुर्लक्षित करणे कोणत्याही सरकारसाठी सोपे राहिलेले नाही. सोशल मीडिया, डिजिटल संवाद आणि संघटित आंदोलन यांच्या मदतीने तरुणांनी राष्ट्रीय पातळीवर प्रभाव निर्माण करण्याची क्षमता दाखवून दिली आहे. भविष्यात कोणतेही सरकार शिक्षण, रोजगार आणि तरुणांच्या आकांक्षा या विषयांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज ओळखेल. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा एका व्यक्तीच्या राजकीय कारकिर्दीपेक्षा भारतीय लोकशाहीतील जनदबाव आणि उत्तरदायित्वाच्या चर्चेला नवा आयाम देणारा क्षण ठरला आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा