स्वर्ग अन् नरक या दोन ध्रुवांसारख्या 2 टोकांच्या गोष्टी आहेत. स्वर्ग पुण्यवंतांना प्राप्त होणारा आनंदमय लोक, तर नरक म्हणजे पापी माणसांना मिळणारा दुःखमय लोक... स्वर्ग हा ऊर्ध्वलोक म्हणजे पृथ्वीच्या वर आहे. तर नरक हा अधोलोक म्हणजे पृथ्वीच्या खाली आहे. काही धार्मिक परंपरांमध्ये स्वर्ग हे देवांचे वसतिस्थान, तर नरक हे कथित दुष्ट शक्तींचे निवासस्थान मानले जाते. स्वर्ग हा आनंदमय असल्यामुळे प्रकाश हे त्याचे प्रतीक आहे. याऊलट नरक हे काळोखाचे प्रतीक मानले जाते. https://bhagyadarshi.blogspot.com/
स्वर्ग व नरक या दोन्ही अवस्था मृत्यूनंतर पाहता येतात असे मानले जाते. अनेकजण स्वतःच्या संसाराचाही स्वर्ग करतात. तर काही जण जीवंतपणेच नरकयातना भोगतात. वस्तुतः स्वर्ग व नरक या दोन्ही गोष्टी काल्पनिक आहेत. त्या अद्याप कुणीही पाहिल्या नाहीत. पण आपल्या पृथ्वीवरच नरकाचा दरवाजा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? होय, पृथ्वीवर नरकाचा दरवाजा असून, तो लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/
आता तुम्ही म्हणाल... हा दरवाजा पृथ्वीवर असेल, तर तो आतापर्यंत आम्हाला कसा माहिती झाला नाही? चला तर मग आज आपण पृथ्वीवरील नरकाच्या दरवाजाची माहिती पाहू...
पृथ्वीवरील नरकाचा दरवाजा तुर्कमेनिस्तानात आहे. अश्गाबात शहरापासून 160 मैल अंतरावरील काराकुम वाळवंटात एक मोठा खड्डा आहे. हा खड्डा जवळपास 230 फूट रुंद आहे. त्यात मागील 50 वर्षांपासून सतत आग धुमसत आहे. त्यामुळे या खड्ड्याला नरकाचे मुख किंवा नरकाचे द्वार असे मानतात. आता तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रपतींनी हा खड्डा लवकरात लवकर बुजवण्याचे आदेश दिलेत. या खड्ड्यातून निघणाऱ्या धुरामुळे वायू प्रदुषणात वाढ होत आहे. त्याचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्यामुळे नरकाचे हे दार बंद केले जात आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/
या खड्ड्यात दुसऱ्या महायुद्धानंतर आग लागली. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियनचे मोठे हाल सुरू झाले. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना तेल व नैसर्गिक वायूची नितांत गरज होती. त्याचवेळी तेथील वाळवंटात उत्खनन सुरू झाले. त्यात नैसर्गिक वायू सापडला. पण कालांतराने तेथील जमीन पाण्याखाली गेली. त्यामुळे तिथे मोठे खड्डे तयार झाले. पुढे सोव्हिएत युनियनचे विघटन झाले आणि तुर्कमेनिस्तान हा स्वतंत्र देश म्हणून अस्तित्त्वात आला.
या खड्ड्यांतून मिथेन वायूची गळती झपाट्याने होत होती. त्यामुळे वातावरणाचे जास्त नुकसान होऊ नये म्हणून या खड्ड्यांना आग लावण्यात आली. या खड्ड्यांतील गॅस संपल्यानंतर ही आग विझेल असे वाटले होते. पण तसे झाले नाही. मागील 50 वर्षांपासूनही ही आग आजही धगधगत आहे. हा एक दावा आहे. त्याचा कोणताही पुरावा नाही. https://bhagyadarshi.blogspot.com/
याविषयी अजून एक दावा केला जातो. तो असा... सोव्हिएत इंजिनिअर्सचा एक समूह अक बुगदे जिल्ह्यात खनिज तेल उत्खननार्थ आला होता. त्यांनी ऑईल रिग सुरू केली, पण जमीन भुसभूशीत निघाली आणि अख्खी रिग जमिनीत धसली. रिग जमिनीच्या पोटात गडप झाली, पण एकही माणूस दगावला नाही. हा चमत्कारच होता. रिग गडप झाली तिथे अर्धे क्रिकेटचे मैदान मावेल एवढा म्हणजे जवळपास 70 टक्के खड्डा तयार झाला. https://bhagyadarshi.blogspot.com/
ऑईल रिग्जमध्ये अशा दुर्घटना घडण्यात कोणतेही नवल नाही. काराकुम वाळवंटात असे एक-दोन अपघात घडले. त्यानंतर हे खड्डे कधी वाळू, तर कधी पाण्याने भरून गेले. पण येथे एक नवाच प्रश्न निर्माण झाला. खड्ड्यामुळे एका वायूसाठ्याचे तोंड उघडले गेले. त्यातून मिथेन हा ज्वलनशिल वायू बाहेर पडू लागला. हे लिकेज असेल ठेवले, तर त्यामुळे काहीतरी मोठे अनुचित घडण्याची भीती होती. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी या ठिकाणी फ्लेयरिंग करण्याचे ठरले.
फ्लेयरिंग म्हणजे वायूचा काही भाग जाळून नष्ट करणे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ही पद्धत वादग्रस्त आहे. पण त्याकाळी ही पद्धत सर्रासपणे रूढ होती. सामान्यतः आठवडाभर फ्लेयरिंग चालू राहते. मग विझते. त्यानुसार तेथील अधिकाऱ्यांनी क्रेटर पेटवला. पण सर्व अंदाज चुकले. हा क्रेटर आजही 50 वर्षांपासून सातत्याने धगधगत आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/
प्रत्येक संकटात काही चांगले शोधणारी माणसे असतात. अमेरिकेतील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (microbiologist) व अंतराळ जैवशास्त्रज्ञ (astrobiologist) यांना अशा वातावरणातील सूक्ष्म जीवांचा अभ्यास करण्याची हुक्की आली. परग्रहांवर कुठे सजीवसृष्टी असेल तर ती कशा प्रकारची असेल याचा अंदाज बांधण्यासाठी त्यांना पृथ्वीवरील असा टोकाच्या वातावरणातील जीवांचा म्हणजे एक्स्ट्रीमोफाईल्सचा अभ्यास करणे गरजेचे वाटले. त्यानुसार यलोस्टोन अर्थात अंटार्टिकासह या क्रेटरमध्येही हा अभ्यास करण्याचे प्रयत्न सुरू झाले. https://bhagyadarshi.blogspot.com/
पण या क्रेटरमध्ये उतरून तेथील मातीचे नमुणे आणणार कोण? असा मोठा प्रश्न उभा राहिला. या ठिकाणी नॅशनल जिओग्राफिक चॅनेल (National Geographic Channel) धावून आले. व्यावसायिक संशोधक असणाऱ्या जॉर्ज कोरोनीस यांनी हे आव्हान स्वीकारले. जॉर्जला वादळे, चक्रीवादळे व ज्वालामुखी अशा विविध संकटांचा सामना करण्याचा चांगला अनुभव होता. त्याने जवळपास 2 वर्षे हे क्रेटर सर करण्याचा सराव केला. क्रेटरमध्ये कोणत्या प्रकारचे अॅल्युमिनिअमचे कपडे घालावेत, कशा प्रकारचा दोरखंड वापरावा यावर बराच काथ्याकूट झाला. सर्व तयारी करूनही जॉर्जला ही मोहीम फत्ते करण्यासाठी केवळ 17 मिनिटांचा वेळ मिळणार होता.
पण जॉर्जने या कालावधीतच आपली मोहीम फत्ते केली. त्याने या नरकाच्या दरवाजाच्या तळाशी जावून माती आणली. या मातीचा अभ्यास केल्यानंतर त्यात काही विरळ बॅक्टेरिया सापडले. यामुळे परग्रहावरील अशा वातावरणात कोणत्या प्रकारची सजीवसृष्टी असेल याचा काहीसा अंदाज संशोधकांना बांधता आला. https://bhagyadarshi.blogspot.com/
आता जाता - जाता पृथ्वीवरील स्वर्गही पाहूया...
इंडोनेशियाची अनेक बेटे आहेत, त्यापैकी एका बेटाला ‘पृथ्वीवरील शेवटचा स्वर्ग’ (लास्ट पॅराडाईज ऑन अर्थ) असे म्हटले जाते. या बेटाचे नाव ‘राजा अम्पत’ असे आहे. हे बेट त्याच्या निसर्गसौंदर्यासाठी ओळखले जाते. याशिवाय तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीसाठीही ते विख्यात आहे.
मॅक्स एम्मर नाक डच माणसाने या बेटाचा शोध लावला. दुसर्या महायुद्धात सैन्यात सहभागी झालेल्या त्याच्या घर मालकाकडून मॅक्सला या बेटाची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने इंडोनेशिया गाठले व या बेटाचा शोध सुरू केला. जवळपास 4 महिने त्याने हे बेट शोधले. यासाठी त्याने स्थानिक मच्छीमारांची मदतही घेतली. अखेर, पश्चिम पापुआ प्रांताजवळ त्याला हे ‘राजा अम्पत’ बेट सापडले. याठिकाणी असलेली थक्क करणारी सागरी जैवविविधता आणि तुलनेने दुर्गम स्थानामुळे लोक राजा अम्पत बेटाला ‘पृथ्वीवरील शेवटचा स्वर्ग’ मानले जाते.
या ब्लॉगची सुरुवात कुठून झाली आणि आपण कुठपर्यंत पोहोचलो. असो, दिवानोंकी यह बाते दिवाने ही जानते है…
https://bhagyadarshi.blogspot.com/
संदर्भ - मायबोली, नॅशनल जिओग्राफिक आदी...






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा