भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

ब्रह्मांडातील विशाल तरंगता तलाव



जलं ददाति जीवनम् जलं विना मरणम्...अर्थात पाणी असेल तर जीवन व नसेल तर मरण... पाणी हा विषयी कितीही चावून चोथा झाला असला तरी त्याबद्दलचे आपले अज्ञान पदोपदी दिसून येते. 

आपले ब्रह्मांड अनेक गुपितांनी भरलेले आहे. आपली पृथ्वी सौरमंडळाचा एक सदस्य आहे. आपल्या ब्रह्मांडाचा एक किरकोळ हिस्सा... हे ब्रह्मांड पृथ्वीवरून दिसणाऱ्या आकाशगंगेचा एक हिस्सा आहे. लहानपणापासून आतापर्यंत आपण विज्ञान, पृथ्वी, आकाश, चंद्र व सूर्याचे किस्से ऐकलेत. संशोधकांच्या मते, जगात केवळ आपणच नाही. आपल्यासारखे अनेक ब्रह्मांड आहेत. कारण, आकाश अनंत आहे. त्याला कोणतेही पलिकडचे टोक नाही. आपण त्याला अद्याप पूर्णपणे पाहिले आहे किंवा ते आपल्याला फारसे समजलेही नाही.   https://bhagyadarshi.blogspot.com/

त्यानंतरही आपण आपल्यासारखे दुसरे कोणतेही ब्रह्मांड नाही असा दावा कसे काय करू शकतो? काही संशोधक या प्रश्नाचे उत्तर पाणी असे देतात. त्यांच्या मते ब्रह्मांडात दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी पाणी नाही. पण त्यांचा हा समज आता चुकीचा ठरला आहे. कारण, आजवर मनुष्याला माहिती असलेल्या ब्रह्मांडातील पाण्याचा सर्वात मोठा साठा पृथ्वीपासून 12 अब्ज प्रकाश वर्ष अंतरावर आढळला आहे. विशेष म्हणजे हा साठा पृथ्वीवरील एकूण जलसाठ्याच्या तुलनेत तब्बल 140 ट्रिलियन पट मोठा आहे. 



खगोलशास्त्रज्ञांच्या 2 चमूंनी संयुक्तपणे तरंगता जलाशय शोधून काढला आहे. पॅसिफिक महासागर पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर असल्याचे आपण मानतो. पण पृथ्वीवर जेवढ्या नद्या, तलाव, सरोवरे व समुद्र किंवा महासागर आहेत, ते सर्व मिळून ब्रह्मांडात आढळलेल्या या तरंगत्या जलाशयापुढे केवळ पाण्याचा एक थेंब आहे. 

ब्रह्मांडाच्या एखाद्या कोपऱ्यात आपल्यासारखेच सजिवसृष्टी असल्याचा दावा मानवजातीने आतापर्यंत अनेकदा केला आहे. त्यांच्या या दाव्याला या संशोधनामुळे बळ मिळाले आहे. नासा व इस्रो सारख्या अंतराळ संस्था अंतराळात पाण्याचा शोध घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा  खर्च करत आहेत. त्यामु्ळे क्वासर (एक विशाल ब्लॅकहोल) लगत पाण्याचा हा विशालकाय ढग आढळणे, हे खगोल विज्ञानाचे एक मोठे यश आहे.   https://bhagyadarshi.blogspot.com/

संशोधकांच्या मते, क्वासरमधून प्रचंड ऊर्जा बाहेर पडत आहे. या ब्लॅकहोलच्या मध्यभागी वायू व धूळ कोसळत आहे. या कृष्णविवरातून सूर्यापेक्षा तब्बल 22 पट अधिक ऊर्जा बाहेर पडते. 



दुसरीकडे, संशोधकांनी केवळ पाणी अस्तित्वात असणाऱ्या एका ग्रहाचा शोध लावला आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 100 प्रकाश वर्ष अंतरावर आहे. हा ग्रह पाण्याच्या एका जाड थराने झाकलेला आहे. त्याची रचना गुरू व शनीच्या काही चंद्रांसारखी आहे. पण त्याचा आकार व वस्तुमान पृथ्वीपेक्षा जास्त आहे. पण त्याच्या ताऱ्यापासून त्याचे अंतर फार कमी असल्यामुळे तिथे जीवसृष्टी अस्तित्वात येण्याची कोणतीही शक्यता नाही. TOI-1452 b हा एक एक्सोप्लॅनेट आहे, जो ड्रॅको नक्षत्रात असलेल्या बायनरी सिस्टीममधील दोन लहान तार्‍यांपैकी एका तार्‍याभोवती फिरतो.

संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने या ग्रहाचा शोध लावला. त्याचे नेतृत्व युनिव्हर्सिटी डटी मॉन्ट्रियल येथील पीएचडी विद्यार्थी व एक्सोप्लॅनेट्सवर संशोधन करणाऱ्या संस्थेने लावला. नासाच्या TESS अंतराळ दुर्बिणीच्या माध्यमातून या ग्रहाचा शोध लावला.  https://bhagyadarshi.blogspot.com/

पृथ्वीशिवाय 17 ग्रहांवर पाण्याचे अस्तित्व

जीवसृष्टीसाठी आवश्यक असणार्‍या मूलभूत घटकांमध्ये पाण्याचा समावेश होतो. त्यामुळे आपल्या सौरमालिकेतील किंवा बाहेरील ग्रहांबाबतचे संशोधन करत असताना तिथे पाण्याचे अस्तित्व आहे का? हे तपासून पाहिले जाते. नासाच्या संशोधनानुसार, पृथ्वीशिवाय आणखी 17 ग्रहांवर पाण्याचे अस्तित्व आहे. हा डेटा मानवासाठी इतर ठिकाणी जीवसृष्टी निर्माण करण्याकरिता अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. तूर्त, आपल्या सौरमालेत केवळ पृथ्वीवरच जीवसृष्टी अस्तित्वात आहे.

आपल्या सौरमालेसारखे विविध ग्रह असलेल्या अनेक सौरमालिका अंतराळात आहेत. अशा प्रकारच्या सौरमालिकेतील अनेक ग्रहांवर जीवसृष्टी असू शकते असा संशोधकांचा दावा आहे. नासाच्या मते, पृथ्वीसारख्या अन्य 17 ग्रहांवर पाणीसाठा आहे. हे सर्व ग्रह आपल्या सौरमालेबाहेरील आहेत. काही ग्रहांवर बर्फाळ महासागर, काहींच्या पृष्ठभागावर द्रवरूप महासागर, तर काहींच्या बर्फाळ पृष्ठभागाखाली महासागर आहेत असा दावा नासाने यासंबंधी केला आहे.   https://bhagyadarshi.blogspot.com/

शास्त्रज्ञांनी या 17 ग्रहांवर असलेल्या गिझरचा सखोल अभ्यास केला आहे. जमिनीवर अशी छिद्रे असतात जिथून कारंज्यासारखे पाणी बाहेर पडते. या छिद्रांना वैज्ञानिक भाषेत गिझर असे म्हणतात. पाणी गोठल्यामुळे किंवा वितळल्यामुळे बर्फाळ महासागराच्या पृष्ठभागाखाली दाब निर्माण होतो. अशा स्थिती जमिनीतील पाणी कारंजे सारखे बाहेर वाहायला लागते. कधीकधी हे कारंजे 100 मीटर उंच असतात. विशेष म्हणजे हे 17 ग्रह पृथ्वीच्या जवळपास आहेत. येथे पुरेसा प्रकाश, पाणी आणि बर्फ आहे. दगड देखील आहेत. या खडकांची खरी रचना कशी आहे, यावर सध्या संशोधन सुरू आहे.



आता वाचू पाण्याच्या थेंबाची कथा...

गिसान नावाचे एक झेन गुरू होते. ते अन्य झेन गुरूंप्रमाणे केवळ पुस्तकी ज्ञानातून अध्यात्मिक शिकवण न देता, जगण्याच्या रोजच्या अनुभवातून शिष्यांना शिकवण देण्यासाठी प्रसिद्ध होते.

एके दिवशी काय झाले? ते आंघोळीला बसणार इतक्यात त्यांच्या लक्षात आले की पाणी जरा जास्तच गरम आहे. त्यांनी एका शिष्याला बोलावले आणि सांगितले की जरा थंड पाण्याची एक बादली भरून आण आणि हे गरम पाणी थोडे कोमट कर, ते फारच गरम आहे.  https://bhagyadarshi.blogspot.com/

शिष्य गेला व त्यांनी थंड पाण्याची बादली भरून आणली. त्याने गरम पाण्यामध्ये थंड पाणी ओतले आणि गिसान यांना आंघोळ करता येईल इतकं ते कोमट केलं. हे काम झाल्यावर त्यांनं बादलीतलं उरलेलं थंड पाणी स्नानगृहात ओतून टाकलं.

त्या क्षणी गिसान, त्या शिष्यावर अज्ञानी, मूर्ख माणसा असं म्हणत ते जोरात खेकसले. एकदम धक्का बसलेल्या त्या शिष्याकडे बघत ते पुढे म्हणाले, उरलेलं पाणी तू झाडांना का नाही दिलंस. पाण्याचा एक थेंब देखील वाया घालवण्याचा अधिकार या मंदिरामध्ये तुला कोणी दिला?

असं म्हणतात, त्याक्षणी त्या शिष्याला झेनचा साक्षात्कार झाला. त्यानं आपलं नाव बदललं आणि तेकीसुई असं नवं नाव धारण केलं. तेकीसुईचा अर्थ आहे पाण्याचा थेंब!



मॉरल ऑफ द स्टोरी

"पृथ्वीचा 71 टक्के भाग पाण्याने व्यापला आहे. पण त्यापैकी बहुतांश भाग समुद्र व महासागरांत सामावलेला आहे. उरलेल्या 2.5 टक्के पाण्यापैकी केवळ 1 टक्के पाणीच पिण्यायोग्य आहे. हे पाणी म्हणजेच आपले जीवन आहे. ते जोवर उपलब्ध असेल, तोवरच पृथ्वीवर सजीवांचे अस्तित्व असेल."


0+ WhatsApp Great

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा