भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

रविवार, १० डिसेंबर, २०२३

'व्हॉयझर-1' एलियन्सनी हायजॅक केले का?

अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाचे 'व्हॉयझर-1' (Voyager 1) अंतराळ यान आपल्या सौर मंडळाच्या बाहेर प्रवास करत आहे. 45 वर्षांपूर्वी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. पण, आता हे यान पृथ्वीवर विचित्र संदेश पाठवत आहे. यामुळे शास्त्रज्ञही हैरान झालेत. 'नासा'ने सांगितले की, 'व्हॉयझर' सुरुळीतपणे काम करत आहे. त्याचा अँटेनाही पृथ्वीच्या दिशेने आहे. पण, तो आता आपल्या ठिकाणापासून एका वेगळ्या प्रकारचा संदेश पाठवत आहे. हा डेटा त्याने आतापर्यंत पाठवलेल्या डेटाशी मेळ खात नाही.'



'व्हॉयझर-1' (Voyager 1) पाठवत असलेला डेटा 'नासा'साठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण, याच डेटापासून त्यांना यानाच्या अँटेनाची दिशा पृथ्वीच्या दिशेने असल्याचे समजते. 

'नासा'च्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या (nasa jet propulsion laboratory) प्रोजेक्ट मॅनेजर सुजैन डॉड म्हणाल्या की, 'व्हॉयझरने असा व्यवहार करणे अत्यंत गूढ गोष्ट आहे. या यानाची AACS यंत्रणा योग्य ती माहिती पाठवत नाही. ही यंत्रणा यानाच्या ठिकाणाची माहिती पाठवण्यासह विविध प्रकारची काम करते. त्यातील एक काम व्हॉयझरचा अँटेना पृथ्वीच्या दिशेने ठेवण्याचे आहे.' त्या पुढे म्हणाल्या -'AACS अजूनही आपले काम करत आहे. पण, तो एरर डेटा पाठवत आहे. ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.'

यापूर्वीही करण्यात आली आहे व्हॉयझरमध्ये दुरुस्ती 

डॉड पुढे म्हणाल्या -'सध्या या कारणामुळे व्हॉयझरमध्ये कोणतीही समस्या दिसून येत नाही. अँटेना सातत्याने सिग्नल पाठवत आहे. म्हणजे तो सुरुळीतपणे काम करत आहे. त्याची दिशाही पृथ्वीच्या दिशेने आहे.' त्या म्हणाल्या -'इंजिनियर या समस्येवरील तोडगा सॉफ्टवेअरमध्ये बदल करुन काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्यात यश आले नाही तर पुढील पर्याय शोधावे लागतील.'

विशेष म्हणजे व्हॉयझरमध्ये बिघाड होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2017 मध्ये त्याच्या थ्रस्टरमध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर दुसरे एक थ्रस्टर तब्बल 37 वर्षांनी सुरू करण्यात आले होते. 

एक संदेश येण्यासाठी लागतात 2 दिवस

'व्हॉयझर-1' 1977 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. त्यानंतर 2012 मध्ये ते आपल्या सौर मंडळातून बाहेर पडले. सध्या ते इंटरस्टेलर अंतराळात प्रवास करत आहे. आपल्या सूर्यमालिकेबाहेर प्रवास करणारी ही मानवनिर्मित पहिलीच वस्तू आहे. सध्या व्हॉयझर पृथ्वीपासून सुमारे 23 अब्ज किलोमीटर दूर आहे. हे अंतर एवढे आहे की 'व्हॉयझर'ने पाठवलेला एक संदेश पृथ्वीपर्यंत येण्यासाठी व येथून त्याच्यापर्यंत संदेश पाठवण्यासाठी तब्बल् 48 तासांचा अवधी लागतो. bhagyadarshi.blogspot.com



केव्हा झाले होते प्रक्षेपण?

व्हॉयझर-1 ((Voyager 1)) आंतरिक्षयान आहे. याचे वजन 722 किलो ग्राम (1590 lb) आहे. ही पृथ्वीपासून सर्वात दूर गेलेली माणसाने निर्माण केलेली वस्तू आहे. दिनांक 5 सप्टेंबर 1977 रोजी व्हॉयझर-1 ((Voyager 1)) या यानाने पृथ्वीवरून उड्डाण केले. सौरमालेचा अभ्यास करण्यासाठी हे यान सोडले गेले आहे. गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून या दूरच्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यानंतर ही यानं आपल्या सौरमालेपलीकडे जातील अशी व्यवस्था करण्यात आली होती. युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांना भेट देणारी हे पहिले यान आहे. bhagyadarshi.blogspot.com

व्हॉयझर-1 ((Voyager 1)) आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वैज्ञानिकांना अपेक्षित असलेल्या कामगिरीच्या कितीतरी पटीने अधिक कामगिरी त्याने पार पाडली आहे. या यानाच्या प्रक्षेपणापूर्वी म्हणजे 20 ऑगस्ट 1977 या दिवशी व्हॉयझर-2 ((Voyager 2) या यानाला अवकाशात पाठविण्यात आले. गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून या दूरच्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी ही अंतराळ यानं सोडण्यात आली होती आणि त्यानंतर ही यानं आपल्या सौरमालेपलीकडे जातील अशी व्यवस्था करण्यात आली होती. या यानाचे आयुष्य 5 वर्षे असेल, असे गृहित धरून या मोहिमेची आखणी झाली होती, पण अतिशय आनंदाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 37 वर्षांनंतरही हे दोन्ही यान उत्तम कामगिरी बजावत आहेत. bhagyadarshi.blogspot.com

सुरुवातीच्या काळात व्हॉयझर्सनी गुरू व शनी हे ग्रह तसेच त्यांच्या उपग्रहांचा सविस्तर अभ्यास केला. युरेनस आणि नेपच्यून या  ग्रहांना भेट देणारी ही पहिलीच याने ठरली. गुरूच्या वातावरणात सतत प्रचंड उलथापालथ  चालू असते. या वातावरणाची विशेषत: गुरूवर असलेल्या भल्या मोठ्या लाल ठिपक्यांचे तपशीलवार फोटो या यानांनी पृथ्वीवर पाठवली. गुरूला अनेक उपग्रह आहेत. आयो हा त्यापैकी एक. या उपग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यावर अनेक जागृत ज्वालामुखी आहेत. त्यांचेही फोटो व्हॉयझर्सनी पाठवली आहेत. शनीला असलेली कडी हा वैज्ञानिकांच्याच नव्हे तर सर्वसामान्यांच्याही कुतूहलाचा विषय. त्या कड्यांचेही सुस्पष्ट फोटो आपल्याला या यानांमुळे उपलब्ध झाली आहेत. bhagyadarshi.blogspot.com




व्हॉयझरच आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यावर ठेवण्यात आलेली एक सोनेरी तबकडी. या तबकडीवर पृथ्वीसंबंधीची बरीच माहिती रेकॉर्ड करून ठेवलेली आहे. पृथ्वीवर नेहमी ऐकू येणारे आवाज उदा. पक्ष्यांचा किलबिलाट, धबधब्याचा किंवा रेल्वेचा आवाज यासह जगातल्या सर्वच प्रमुख भाषांमधून दिलेले शुभेच्छा संदेशही या तबकडीवर आहेत. या भाषांमध्ये हिंदी भाषेचाही समावेश आहे. आपली सौरमाला, त्यातले पृथ्वीचे स्थान याचा नकाशाही या तबकडीवर आहे. हा सगळा मजकूर, छायाचित्रे इ. तयार करण्याचे काम ज्या वैज्ञानिकांनी केले त्यात कार्ल सेगन या प्रसिद्ध खगोल वैज्ञानिकाचा समावेश होता. त्याच्या छोट्या मुलाचे बोबडे बोलही या गोल्डन रेकॉर्डवर आहेत. तो म्हणतो- Hello from the children of planet earth! हा सगळा मजकूर / आवाज व्हॉयझरच्या वेबसाईटवर आपल्याला पाहता / ऐकता येतो. bhagyadarshi.blogspot.com

वैज्ञानिकांना अशी (भाबडी?) आशा आहे की भविष्यात कधीतरी व्हॉयझर यान एखाद्या परग्रहावर उतरेल आणि तेथे असलेले मानव ही तबकडी पाहतील / वाचतील आणि पृथ्वीशी संपर्क साधतील. असे खरेच घडेल की नाही याचे उत्तर अर्थातच काळाच्या उदरात दडलेले आहे. एक मात्र निश्चित की व्हॉयझर यान आता अनंताच्या प्रवासाला निघाली आहेत. bhagyadarshi.blogspot.com

0+ WhatsApp Great

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा