पीएचडी (PhD) म्हटले की, अनेक वर्षांचे संशोधन, शेकडो पानांचा प्रबंध (थिसिस) आणि त्याचे कठोर सादरीकरण हे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. पण चीनमध्ये आता या पारंपरिक पद्धतीला एक पर्याय उपलब्ध झाला आहे. 2024 मध्ये लागू झालेल्या एका नव्या कायद्यानुसार काही अभियांत्रिकी (Engineering) शाखांतील संशोधकांना लिखित थिसिसऐवजी प्रत्यक्ष विकसित केलेले नाविन्यपूर्ण उत्पादन, तंत्रज्ञान किंवा औद्योगिक प्रकल्प सादर करून पीएचडी पूर्ण करता येणार आहे. हा बदल केवळ पदवी देण्याच्या पद्धतीतील सुधारणा नसून, संशोधनाला उद्योगांशी अधिक घट्ट जोडण्याचा प्रयत्न मानला जात आहे. China PhD Without Thesis
शुक्रवार, १० जुलै, २०२६
थिसिसशिवाय पीएचडी? चीनचा नवा शैक्षणिक प्रयोग!
पीएचडी (PhD) म्हटले की, अनेक वर्षांचे संशोधन, शेकडो पानांचा प्रबंध (थिसिस) आणि त्याचे कठोर सादरीकरण हे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. पण चीनमध्ये आता या पारंपरिक पद्धतीला एक पर्याय उपलब्ध झाला आहे. 2024 मध्ये लागू झालेल्या एका नव्या कायद्यानुसार काही अभियांत्रिकी (Engineering) शाखांतील संशोधकांना लिखित थिसिसऐवजी प्रत्यक्ष विकसित केलेले नाविन्यपूर्ण उत्पादन, तंत्रज्ञान किंवा औद्योगिक प्रकल्प सादर करून पीएचडी पूर्ण करता येणार आहे. हा बदल केवळ पदवी देण्याच्या पद्धतीतील सुधारणा नसून, संशोधनाला उद्योगांशी अधिक घट्ट जोडण्याचा प्रयत्न मानला जात आहे. China PhD Without Thesis
रविवार, १० डिसेंबर, २०२३
पृथ्वी 1 सेकंद थांबली तर.. कधी विचार केलाय?
पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते आणि यामुळे पृथ्वीवर दिवस अन् रात्र होते हे आपल्या सर्वांनाच ठावूक आहे. वसुंधरेच्या या फिरण्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. त्याचा आनंद आपण सर्वजणच घेत असतो. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की, पृथ्वीने क्षणभर आपले फिरणेच बंद केले तर काय होईल? पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर म्हणजे आपल्यावर त्याचा काय परिणाम होईल?... डोक्याला हात लावला ना? चला तर मग जाणून घेऊया, पृथ्वीने 1 सेकंद स्वतःभोवती फिरणे थांबवले तर काय होईल या प्रश्नाचे उत्तर.... https://bhagyadarshi.blogspot.com/
आपला निळा ग्रह अर्थात पृथ्वी आपल्या अक्षावर फिरते. ती 23 तास 56 मिनिटे व 4.1 सेकंदांत स्वतःची प्रदक्षिणा पूर्ण करते. यामुळे पृथ्वीच्या एका भागावर दिवस व दुसऱ्या बाजूला रात्र असते. अमेरिकेचे विख्यात खगोलशास्त्रज्ञ नील डीग्रास टायसन यांनी पृथ्वीने 1 सेकंद फिरणे बंद केले तर काय होईल यावर मार्मिक भाष्य केले आहे.
वेगात धावणाऱ्या कारचा अपघात झाला तर...
टायसन सांगतात की, पृथ्वीने एका सेकंदासाठी आपल्या अक्षावर फिरणे बंद केले तर अत्यंत भयंकर परिस्थिती उत्पन्न होईल. आपण सर्वजण पृथ्वीसोबत पूर्वेकडे ताशी 1674 किलोमीटर वेगाने पुढे जात आहोत. म्हणजे तिच्यासोबत आपणही फिरत आहोत. त्यामुळे पृथ्वीचे 1 सेकंद थांबणे आपल्यासाठी सजीवसृष्टी नष्ट करणारे ठरणार आहे. टायसन याविषयी एका कार अपघाताच्या उदाहरणाद्वारे समजावून सांगतात. ते म्हणतात की, पृथ्वीने क्षणभर स्वतःभोवती फिरणे थांबवले तर वेगाने जाणाऱ्या कारचा अपघात झाल्यासारखी स्थिती उत्पन्न होईल. कारमध्ये बसलेले लोक अपघात झाल्यानंतर जसे झटकन पुढे फेकल्या जातात, तसेच ते सीटवरून वेगाने पुढे फेकले जातील. https://bhagyadarshi.blogspot.com/
एका भागात अंधार दुसऱ्या भागात उजेड
लोक उंच इमारतीतून खाली वेगाने आपटतील. हे दृश्य पाहणे खूपच भयावह असेल. ABC च्या रिपोर्टनुसार, पृथ्वी अचानक थांबली तर आपल्या वसुंधरेचा बहुतांश भाग नष्ट होईल. अर्ध्या पृथ्वीला सतत सूर्याच्या उष्णतेचा सामना करावा लागेल. याऊलट अर्ध्या ग्रहाला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागेल. म्हणजे सूर्याच्या दिशेला असणाऱ्या पृथ्वीच्या एका भागात कायमस्वरुपी दिवस तर सूर्याच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या दुसऱ्या भागात कायमस्वरुपी अंधार असेल. पृथ्वीवर काही भागात कायम सूर्योदय व सूर्यास्थाची स्थिती असेल. काही भागात वर्षभर पाऊस पडेल. तर काही भागात कायमस्वरुपी दुष्काळस्थिती निर्माण होईल, असाही दावा या प्रकरणी केला जातो. https://bhagyadarshi.blogspot.com/
मोठमोठे डोंगर उन्मळून पडतील
पृथ्वीवरील या विचित्र स्थितीचा फटका बाष्पीभवनाच्या प्रक्रियेला बसेल. मानवासह संपूर्ण सजीवसृष्टी संकटात येईल. या स्थितीत नेमके काय होईल? याची कल्पना न केलेली बरी. पृथ्वीने अचानक फिरणे थांबवल्यास वेगवान वादळे निर्माण होतील. मोठ्या व धोकादायक वादळांचा वेग ताशी 200 ते 300 किलोमीटर एवढा असतो. या स्थितीत पृथ्वीने फिरणे थांबवले तर एक भयंकर वादळ निर्माण होईल. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वच वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर उडून जातील. मोठे डोंगरही उन्मळून पडतील. महासागरांचे पाणी संपूर्ण पृथ्वीवर पसरेल. https://bhagyadarshi.blogspot.com/
आता पाहूया पृथ्वीची माहिती...
पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते. त्या क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. या अक्षाला पृथ्वीचा आस असेही म्हणतात. हा आस दक्षिणोत्तर असून, उत्तरेकडे तो साधारणतः ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. समजा तुम्ही ध्रुव ताऱ्यावर जावून पृथ्वीकडे पाहिले, तर ती तुम्हाला घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरताना दिसेल.
पृथ्वी स्वतःभोवती 23 तास 56 मिनिटे व 4.099 सेकंदांत 1 फेरी पूर्ण करते. सूर्याचा संदर्भ घेऊन विचार केला तर पृथ्वी एका दिवसात म्हमजे 24 तासांत ही 1 फेरी पूर्ण करते. हा फरक पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे होतो. दररोज 8,400 (24 तासांचे सेकंद)/365.25 ( एका वर्षातील दिवस) = 3 मिनिटे 56 सेकंद एवढा असतो.
पृथ्वीची उत्पत्ती केव्हा झाली?
पृथ्वीची निर्मिती साधारणतः 457 कोटी वर्षांपूर्वी झाली असावी असे मानले जाते. त्यानंतर 453 कोटी वर्षांपूर्वी तिच्या उपग्रहाने म्हणजे आपल्या चंद्राने पृथ्वीला प्रदक्षिणा घालणे सुरू केले. पृथ्वीचा व्यास 12,753 किलोमीटर एवढा आहे. सूर्यापासूनच तिचे अंतर सामान्यतः 14,95,97,890 किलोमीटर एवढे आहे. पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर सजीवसृष्टी नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे पृथ्वी स्वतः एक मोठे चुंबक आहे. त्यामु्ळे तिच्याभोवती चुंबकीय क्षेत्र आहे. या क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानीकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशाकडे वळले जातात.
तर मग पृथ्वीची इत्यंभूत माहिती जाणून घेताना तुम्हाला पृथ्वी क्षणभर थांबली तर किती भयंकर स्थिती उद्भवेल हे समजले का? हो तर मग उद्या पुन्हा अशाच एका रंजक विषयाची माहिती घेऊया...
'व्हॉयझर-1' एलियन्सनी हायजॅक केले का?
अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाचे 'व्हॉयझर-1' (Voyager 1) अंतराळ यान आपल्या सौर मंडळाच्या बाहेर प्रवास करत आहे. 45 वर्षांपूर्वी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. पण, आता हे यान पृथ्वीवर विचित्र संदेश पाठवत आहे. यामुळे शास्त्रज्ञही हैरान झालेत. 'नासा'ने सांगितले की, 'व्हॉयझर' सुरुळीतपणे काम करत आहे. त्याचा अँटेनाही पृथ्वीच्या दिशेने आहे. पण, तो आता आपल्या ठिकाणापासून एका वेगळ्या प्रकारचा संदेश पाठवत आहे. हा डेटा त्याने आतापर्यंत पाठवलेल्या डेटाशी मेळ खात नाही.'
'व्हॉयझर-1' (Voyager 1) पाठवत असलेला डेटा 'नासा'साठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण, याच डेटापासून त्यांना यानाच्या अँटेनाची दिशा पृथ्वीच्या दिशेने असल्याचे समजते.
'नासा'च्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या (nasa jet propulsion laboratory) प्रोजेक्ट मॅनेजर सुजैन डॉड म्हणाल्या की, 'व्हॉयझरने असा व्यवहार करणे अत्यंत गूढ गोष्ट आहे. या यानाची AACS यंत्रणा योग्य ती माहिती पाठवत नाही. ही यंत्रणा यानाच्या ठिकाणाची माहिती पाठवण्यासह विविध प्रकारची काम करते. त्यातील एक काम व्हॉयझरचा अँटेना पृथ्वीच्या दिशेने ठेवण्याचे आहे.' त्या पुढे म्हणाल्या -'AACS अजूनही आपले काम करत आहे. पण, तो एरर डेटा पाठवत आहे. ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.'
यापूर्वीही करण्यात आली आहे व्हॉयझरमध्ये दुरुस्ती
डॉड पुढे म्हणाल्या -'सध्या या कारणामुळे व्हॉयझरमध्ये कोणतीही समस्या दिसून येत नाही. अँटेना सातत्याने सिग्नल पाठवत आहे. म्हणजे तो सुरुळीतपणे काम करत आहे. त्याची दिशाही पृथ्वीच्या दिशेने आहे.' त्या म्हणाल्या -'इंजिनियर या समस्येवरील तोडगा सॉफ्टवेअरमध्ये बदल करुन काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्यात यश आले नाही तर पुढील पर्याय शोधावे लागतील.'
विशेष म्हणजे व्हॉयझरमध्ये बिघाड होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2017 मध्ये त्याच्या थ्रस्टरमध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर दुसरे एक थ्रस्टर तब्बल 37 वर्षांनी सुरू करण्यात आले होते.
एक संदेश येण्यासाठी लागतात 2 दिवस
'व्हॉयझर-1' 1977 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. त्यानंतर 2012 मध्ये ते आपल्या सौर मंडळातून बाहेर पडले. सध्या ते इंटरस्टेलर अंतराळात प्रवास करत आहे. आपल्या सूर्यमालिकेबाहेर प्रवास करणारी ही मानवनिर्मित पहिलीच वस्तू आहे. सध्या व्हॉयझर पृथ्वीपासून सुमारे 23 अब्ज किलोमीटर दूर आहे. हे अंतर एवढे आहे की 'व्हॉयझर'ने पाठवलेला एक संदेश पृथ्वीपर्यंत येण्यासाठी व येथून त्याच्यापर्यंत संदेश पाठवण्यासाठी तब्बल् 48 तासांचा अवधी लागतो. bhagyadarshi.blogspot.com
केव्हा झाले होते प्रक्षेपण?
व्हॉयझर-1 ((Voyager 1)) आंतरिक्षयान आहे. याचे वजन 722 किलो ग्राम (1590 lb) आहे. ही पृथ्वीपासून सर्वात दूर गेलेली माणसाने निर्माण केलेली वस्तू आहे. दिनांक 5 सप्टेंबर 1977 रोजी व्हॉयझर-1 ((Voyager 1)) या यानाने पृथ्वीवरून उड्डाण केले. सौरमालेचा अभ्यास करण्यासाठी हे यान सोडले गेले आहे. गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून या दूरच्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यानंतर ही यानं आपल्या सौरमालेपलीकडे जातील अशी व्यवस्था करण्यात आली होती. युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांना भेट देणारी हे पहिले यान आहे. bhagyadarshi.blogspot.com
व्हॉयझर-1 ((Voyager 1)) आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वैज्ञानिकांना अपेक्षित असलेल्या कामगिरीच्या कितीतरी पटीने अधिक कामगिरी त्याने पार पाडली आहे. या यानाच्या प्रक्षेपणापूर्वी म्हणजे 20 ऑगस्ट 1977 या दिवशी व्हॉयझर-2 ((Voyager 2) या यानाला अवकाशात पाठविण्यात आले. गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून या दूरच्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी ही अंतराळ यानं सोडण्यात आली होती आणि त्यानंतर ही यानं आपल्या सौरमालेपलीकडे जातील अशी व्यवस्था करण्यात आली होती. या यानाचे आयुष्य 5 वर्षे असेल, असे गृहित धरून या मोहिमेची आखणी झाली होती, पण अतिशय आनंदाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 37 वर्षांनंतरही हे दोन्ही यान उत्तम कामगिरी बजावत आहेत. bhagyadarshi.blogspot.com
सुरुवातीच्या काळात व्हॉयझर्सनी गुरू व शनी हे ग्रह तसेच त्यांच्या उपग्रहांचा सविस्तर अभ्यास केला. युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांना भेट देणारी ही पहिलीच याने ठरली. गुरूच्या वातावरणात सतत प्रचंड उलथापालथ चालू असते. या वातावरणाची विशेषत: गुरूवर असलेल्या भल्या मोठ्या लाल ठिपक्यांचे तपशीलवार फोटो या यानांनी पृथ्वीवर पाठवली. गुरूला अनेक उपग्रह आहेत. आयो हा त्यापैकी एक. या उपग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यावर अनेक जागृत ज्वालामुखी आहेत. त्यांचेही फोटो व्हॉयझर्सनी पाठवली आहेत. शनीला असलेली कडी हा वैज्ञानिकांच्याच नव्हे तर सर्वसामान्यांच्याही कुतूहलाचा विषय. त्या कड्यांचेही सुस्पष्ट फोटो आपल्याला या यानांमुळे उपलब्ध झाली आहेत. bhagyadarshi.blogspot.com
व्हॉयझरच आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यावर ठेवण्यात आलेली एक सोनेरी तबकडी. या तबकडीवर पृथ्वीसंबंधीची बरीच माहिती रेकॉर्ड करून ठेवलेली आहे. पृथ्वीवर नेहमी ऐकू येणारे आवाज उदा. पक्ष्यांचा किलबिलाट, धबधब्याचा किंवा रेल्वेचा आवाज यासह जगातल्या सर्वच प्रमुख भाषांमधून दिलेले शुभेच्छा संदेशही या तबकडीवर आहेत. या भाषांमध्ये हिंदी भाषेचाही समावेश आहे. आपली सौरमाला, त्यातले पृथ्वीचे स्थान याचा नकाशाही या तबकडीवर आहे. हा सगळा मजकूर, छायाचित्रे इ. तयार करण्याचे काम ज्या वैज्ञानिकांनी केले त्यात कार्ल सेगन या प्रसिद्ध खगोल वैज्ञानिकाचा समावेश होता. त्याच्या छोट्या मुलाचे बोबडे बोलही या गोल्डन रेकॉर्डवर आहेत. तो म्हणतो- Hello from the children of planet earth! हा सगळा मजकूर / आवाज व्हॉयझरच्या वेबसाईटवर आपल्याला पाहता / ऐकता येतो. bhagyadarshi.blogspot.com
वैज्ञानिकांना अशी (भाबडी?) आशा आहे की भविष्यात कधीतरी व्हॉयझर यान एखाद्या परग्रहावर उतरेल आणि तेथे असलेले मानव ही तबकडी पाहतील / वाचतील आणि पृथ्वीशी संपर्क साधतील. असे खरेच घडेल की नाही याचे उत्तर अर्थातच काळाच्या उदरात दडलेले आहे. एक मात्र निश्चित की व्हॉयझर यान आता अनंताच्या प्रवासाला निघाली आहेत. bhagyadarshi.blogspot.com
शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३
अहो ऐकलं का, उंदीर मांजरीला नव्हे तर केळीला घाबरतो!
उंदीर मांजराला घाबरतो हे सर्वश्रूत आहे. पण, एका संशोधनाद्वारे या पूर्वापार चालत आलेल्या समजुतीला छेद बसला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, "उंदीर मांजराला नव्हे तर केळीला घाबरतो." हे ऐकण्यास काहीसे विचित्र वाटत असले तरी शास्त्रज्ञांना अनावधानाने लागलेल्या एका शोधामुळे हे सिद्ध झाले आहे. संशोधक गरोदर व स्तनदा मादा उंदरावरील नर उंदराच्या प्रतिक्रियेचा अभ्यास करत होते. यावेळी त्यांना केळीच्या रासायनिक संयुगामुळे नर उंदरांत तणावपूर्ण प्रतिक्रिया निर्माण होत असल्याचे आढळले.
"सायंस अॅडव्हान्स" नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका संशोधनात नमूद करण्यात आले आहे की, "नर उंदरांत तणाव दिसून आला." मॉन्ट्रियल मॅगकिल युनिव्हर्सिटीच्या संशोधन पथकाला असे आढळले की, "गरोदर व स्तनदा मादी उंदरांनी अनोळखी नर उंदरांबद्दल आक्रमकता दर्शविली व लघवीच्या चिन्हासह प्रतिसाद दिला. नर उंदीर त्यांच्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात. परंतु, मादी उंदीर त्यांना पळवून लावण्यासाठी व सावध करण्यासाठी रसायने सोडली. त्यानंतर नर उंदराने त्यांच्यापासून अंतर राखले."
गंध घेण्याच्या शक्तीने संकेत समजतात
या संशोधनाचे वरिष्ठ लेखक प्रोफेसर जेफ्री मोगिल यांच्या म्हणण्यानुसार, "उंदीर व इतर अनेक सस्तन प्राणी त्यांच्या गंध घेण्याच्या शक्तीचा वापर करतात. प्राण्यांमध्ये लघवीच्या वासाचा म्हणजे मूत्रगंधाचा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा अर्थ असतो. पण, या संशोधनात जे आढळले ते वेगळेच आहे. गंध घेण्याचे संकेत सामान्यतः नर एखाद्या मादीला पाठवतो. असे संकेत क्वचितच मादा उंदीर नराला पाठवते. पण, या प्रकरणात मादा उंदीर नर उंदराला दूर राहण्यासाठी असे संकेत पाठवत होती असे संशोधकांचे म्हणणे आहे."
कोठून आली केळीची भीती
संशोधकांना स्तनदा व मादा उंदरांच्या लघवीमध्ये "एन-पेंटाइल एसीटेट" (N-Pentyl Acetate) नामक संयुग आढळले. हे संयुग केळीसह अनेक फळांत आढळणाऱ्या संयुगासारखे आहे. केळीचा अर्क बनवण्यासाठी ते फळांतून काढले जाते. या रसायनामुळे नर उंदरांतील हार्मोनमध्ये बदल होतो. संशोधकांच्या पथकाने उंदरांच्या पिंजऱ्यात केळीचा अर्क टाकला असता त्यांच्यातील तणावात मोठी वाढ झाली. हा तणाव उंदरांच्या लढाईत निर्माण होणाऱ्या तणावाएवढाच होता. यावरुन मादा उंदीर नसली तरी रसायन नर उंदराला भडकावू शकते हे सिद्ध झाले.
गुरुवार, ७ डिसेंबर, २०२३
1 किमी लांबीचा लघुग्रह पृथ्वीला धडकला तर काय होईल? मानवी कल्पनेपलीकडील विध्वंस होईल...असे 4 वेळा घडलेही आहे
"अथांग ब्रह्मांडातील सजीवसृष्टीचे नेतृत्व करणारी आपली वसुंधरा 37 हजार वर्षांत एकदा संपूर्ण सजीवसृष्टी नष्ट होईल अशा लघुग्रहाला धडकते," असा धक्कादायक दावा अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था अर्थात "नासा"ने केला आहे. 1 किमीपेक्षा जास्त व्यासाचा एखादा लघुग्रह पृथ्वीला धडकला, तर पृथ्वीवरील संपूर्ण जीवन संपुष्टात येऊ शकते असे मानले जाते. या धडकेने लाखो लोकांचा मृत्यू होईल. एवढेच नाही तर त्यानंतर होणाऱ्या भयावह भूकंप, ज्वालामुखीचे विस्फोट व त्सुनामीसारख्या आपत्तीतही कोट्यवधींचा बळी जाईल.
'डेलीस्टार'च्या वृत्तानुसार, असा एखादा लघुग्रह पृथ्वीला धडकला तर राखेचे ढग सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास अडथळा निर्माण करतील. जग अनेक वर्ष अंधारात बुडून जाईल. यामुळे उर्वरित लोकांच्या जगण्याची आशा संपुष्टात येईल. विशेष म्हणजे इतिहासात अनेकदा आपल्या पृथ्वीने अशा महाकाय लघुग्रहांचा आघात सहन केला आहे. पण, प्रत्येकवेळी आपली वसुंधरा काळाच्या कसोटीवर खरी उतरली व तिने स्वतःच स्वतःची पुनर्बांधणी केली.
लघुग्रहानेच दिली ग्लोबल वॉर्मिंगला चालना
आतापर्यंत आपल्या पृथ्वीला तब्बल 4 वेळा अशा संकटांचा सामना करावा लागला आहे. सुमारे 2.229 अब्ज वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात कोसळलेल्या एका लघुग्रहाने याराबुब्बा क्रेटर (विवर) तयार झाले होते. या टक्करीपूर्वी पृथ्वी मुख्यतः एक बर्फाळ ग्रह होता. पण, याराबुब्बा धडकेमुळे ग्लोबल वॉर्मिंगला चालना मिळाली. त्यावेळी जवळपास अर्धा ट्रिलियन टन पाण्याची वाफ हवेत मिसळली. रशियाच्या उत्तर सायबेरियातील 3.50 कोटी वर्ष जुने महाकाय विवरही लघुग्रहाच्या धडकेने तयार झाले आहे. हे विवरही लघुग्रहाच्या धडकेने झालेल्या विध्वंसाचे एक आदर्श उदाहरण आहे.
लघुग्रहांमुळेच झाला डायनासोरचा अंत
मेक्सिकोतील चिक्सुलब (Chicxulub) क्रेटरही 6.60 कोटी वर्ष जुने आहे. हे क्रेटर पृथ्वीवरील डायनासोरह 75 टक्के सजीवांचा सफाया करणाऱ्या एका लघुग्रहाच्या धडकेने तयार झाल्याचे मानले जाते. सर्वात अलीकडील घटना 19 व्या शतकातील आहे, ज्यात मेक्सिकन खगोलशास्त्रज्ञ जोस बोनिला यांनी 1883 मध्ये सूर्यासमोरून मार्गक्रमण करणाऱ्या 300 हून अधिक रहस्यमय वस्तूंचा शोध लावला होता. 2011 मध्ये असे आढळून आले की, ते कदाचित कोट्यवधी टन वजनाच्या धूमकेतूचे तुकडे आहे, जे पृथ्वीपासून काहीशे किमी अंतरावरुन गेले होते.
नुकतीच झाली लघुग्रहासोबत चकमक
उल्लेखनीय बाब म्हणजे Asteroid 388945 (2008 TZ3) नामक एक लघुग्रह नुकताच पृथ्वीच्या जवळून गेला होता. शास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून 7,484,704 लाख किमी अंतरावरुन जाणाऱ्या सर्वच लघुग्रहांचा समावेश धोकादायक लघुग्रहांच्या श्रेणीत केला आहे. हा लघुग्रहही याच श्रेणीतील होता. तो मेच्या मध्यात पृथ्वीपासून 5,632,704 किमी अंतरावरुन पुढे गेला.
490 मीटर लांबीचा हा लघुग्रह अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील 440 मीटर उंच एम्पायर स्टेट बिल्डिंगहूनही मोठा होता. तो पृथ्वीला धडकला असता तर मोठा विध्वंस झाला असता. उल्लेखनीय बाब म्हणजे 1908 मध्ये पूर्व सायबेरियात कोसळणाऱ्या एका उल्कापिंडाने 200 मीटर परिघातील सर्वकाही नष्ट केले होते. 100 मीटरहून लांब असणारा कोणताही उल्कापिंड ज्वालामुखीच्या स्फोटाच्या तुलनेत जवळपास 10 पट जास्त विध्वंस घडवून आणतो.







.jpeg)
.jpeg)