Artificial Intelligence लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Artificial Intelligence लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १० जुलै, २०२६

थिसिसशिवाय पीएचडी? चीनचा नवा शैक्षणिक प्रयोग!


पीएचडी (PhD) म्हटले की, अनेक वर्षांचे संशोधन, शेकडो पानांचा प्रबंध (थिसिस) आणि त्याचे कठोर सादरीकरण हे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. पण चीनमध्ये आता या पारंपरिक पद्धतीला एक पर्याय उपलब्ध झाला आहे. 2024 मध्ये लागू झालेल्या एका नव्या कायद्यानुसार काही अभियांत्रिकी (Engineering) शाखांतील संशोधकांना लिखित थिसिसऐवजी प्रत्यक्ष विकसित केलेले नाविन्यपूर्ण उत्पादन, तंत्रज्ञान किंवा औद्योगिक प्रकल्प सादर करून पीएचडी पूर्ण करता येणार आहे. हा बदल केवळ पदवी देण्याच्या पद्धतीतील सुधारणा नसून, संशोधनाला उद्योगांशी अधिक घट्ट जोडण्याचा प्रयत्न मानला जात आहे. China PhD Without Thesis

शनिवार, १३ जून, २०२६

AI च्या युगात स्वतःला कसे अपडेट ठेऊ?

जग झपाट्याने बदलत आहे. काही वर्षांपूर्वी जे अशक्य वाटत होते ते आज सहज शक्य झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयने या बदलांना आणखी वेग दिला आहे. आज मोबाईल, संगणक, बँक, शाळा, रुग्णालय आणि उद्योगांमध्ये एआयचा सर्रास वापर होत आहे. अनेक कामे काही सेकंदांत पूर्ण होत आहेत. Artificial Intelligence

या स्थितीत मराठी माणसासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. या नव्या युगात स्वतःला कसे टिकवायचे? स्वतःला सतत अपडेट कसे ठेवायचे? हा प्रश्न फक्त नोकरी करणाऱ्यांसाठी नाही, तर विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, उद्योजक, पत्रकार, लेखक आणि गृहिणी यांच्यासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. Digital Skills

गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

क्वांटम कम्प्युटिंग... भविष्याकडे एक पाऊल!



जग आज तंत्रज्ञानाच्या एका निर्णयाक वळणावर उभे आहे. ज्या प्रकारे 20 व्या शतकात संगणकाने मानवी जीवनाची दिशा बदलली. त्याचप्रमाणे 21 व्या शतकात क्वांटम संगणन (Quantum Computing) ही संकल्पना संपूर्ण विज्ञान, उद्योग व अर्थव्यवस्थेला नवे वळण देणार आहे. 

याच पार्श्वभूमीवर अलीकडेच पहिला स्केलेबल अणु - आधारित (Atom-based) क्वांटम प्रोसेसर विकसित झाल्याची व त्याची फिडेलिटी तब्बल 99.99 टक्के असल्याची माहिती समोर आली आहे. ही केवळ वैज्ञानिक प्रगती नाही, तर क्वांटम संगणन प्रत्यक्ष वापराच्या उंबरठ्यावर पोहोचत असल्याचा ठोस पुरावा मानला जात आहे.