अस्वीकरण (Disclaimer)
नमस्कार मित्रांनो,
bhagyadarshi.blogspot.com हा माझा एक वैयक्तिक ब्लॉग आहे. इथे लिहिलेले सर्व लेख आणि विचार हे माझे वैयक्तिक मत आणि अनुभव आहेत.
या ब्लॉगवर दिलेली सर्व माहिती आणि सल्ले हे फक्त सामान्य ज्ञान आणि प्रेरणेसाठी आहेत. याचा वापर करून कोणतेही नुकसान झाल्यास मी किंवा हा ब्लॉग जबाबदार राहणार नाही. हा ब्लॉग केवळ सामाजिक प्रबोधनासाठी तयार करण्यात आला आहे. या ब्लॉगद्वारे मला एक पैसा मिळत नाही, त्यामुळे तुम्हालाही तो मिळण्याची शक्यता नाही.
पण इथे तुम्हाला एक पाऊल पुढे राहण्यासाठी सर्वच विषयांचे ज्ञान मिळेल. ते तुम्हाला अपडेट राहण्यासाठी उपयोगी ठरेल.
या ब्लॉगवरील सर्व लेखन माझे स्वतःचे आहे. त्यात योग्य ठिकाणी वस्तुनिष्ठ माहितीचा वापर केला आहे. सध्या AI जनरेटेड लेख एका क्लिकवर उपलब्ध होतात. पण माझा या ब्लॉगद्वारे स्वतःचा हात लिहिता ठेवण्याचा प्रयत्न आहे.
मी दिव्य मराठी डिजिटल (https://divyamarathi.bhaskar.com/) मध्ये नोकरीस आहे. त्यामुळे मी तिथे लिहिलेले काही लेख इथे वापरलेले दिसू शकतात. ते माझेच आहेत. त्यामुळे त्याचा कायद्याने कॉपीराईटशी संबंध येत नाही. तरीही काही चूक आढळल्यास कृपया मला लगेच कळवा. मी ती लगेच दुरुस्त करून घेईन.
धन्यवाद!
भाग्यदर्शी लोखंडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा