भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

रविवार, १० डिसेंबर, २०२३

पृथ्वी 1 सेकंद थांबली तर.. कधी विचार केलाय?



पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते आणि यामुळे पृथ्वीवर दिवस अन् रात्र होते हे आपल्या सर्वांनाच ठावूक आहे. वसुंधरेच्या या फिरण्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. त्याचा आनंद आपण सर्वजणच घेत असतो. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की, पृथ्वीने क्षणभर आपले फिरणेच बंद केले तर काय होईल? पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर म्हणजे आपल्यावर त्याचा काय परिणाम होईल?... डोक्याला हात लावला ना? चला तर मग जाणून घेऊया, पृथ्वीने 1 सेकंद स्वतःभोवती फिरणे थांबवले तर काय होईल या प्रश्नाचे उत्तर.... https://bhagyadarshi.blogspot.com/

आपला निळा ग्रह अर्थात पृथ्वी आपल्या अक्षावर फिरते. ती 23 तास 56 मिनिटे व 4.1 सेकंदांत स्वतःची प्रदक्षिणा पूर्ण करते. यामुळे पृथ्वीच्या एका भागावर दिवस व दुसऱ्या बाजूला रात्र असते. अमेरिकेचे विख्यात खगोलशास्त्रज्ञ नील डीग्रास टायसन यांनी पृथ्वीने 1 सेकंद फिरणे बंद केले तर काय होईल यावर मार्मिक भाष्य केले आहे.

वेगात धावणाऱ्या कारचा अपघात झाला तर...

टायसन सांगतात की, पृथ्वीने एका सेकंदासाठी आपल्या अक्षावर फिरणे बंद केले तर अत्यंत भयंकर परिस्थिती उत्पन्न होईल. आपण सर्वजण पृथ्वीसोबत पूर्वेकडे ताशी 1674 किलोमीटर वेगाने पुढे जात आहोत. म्हणजे तिच्यासोबत आपणही फिरत आहोत. त्यामुळे पृथ्वीचे 1 सेकंद थांबणे आपल्यासाठी सजीवसृष्टी नष्ट करणारे ठरणार आहे. टायसन याविषयी एका कार अपघाताच्या उदाहरणाद्वारे समजावून सांगतात. ते म्हणतात की, पृथ्वीने क्षणभर स्वतःभोवती फिरणे थांबवले तर वेगाने जाणाऱ्या कारचा अपघात झाल्यासारखी स्थिती उत्पन्न होईल. कारमध्ये बसलेले लोक अपघात झाल्यानंतर जसे झटकन पुढे फेकल्या जातात, तसेच ते सीटवरून वेगाने पुढे फेकले जातील. https://bhagyadarshi.blogspot.com/




एका भागात अंधार दुसऱ्या भागात उजेड 

लोक उंच इमारतीतून खाली वेगाने आपटतील. हे दृश्य पाहणे खूपच भयावह असेल. ABC च्या रिपोर्टनुसार, पृथ्वी अचानक थांबली तर आपल्या वसुंधरेचा बहुतांश भाग नष्ट होईल. अर्ध्या पृथ्वीला सतत सूर्याच्या उष्णतेचा सामना करावा लागेल. याऊलट अर्ध्या ग्रहाला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागेल. म्हणजे सूर्याच्या दिशेला असणाऱ्या पृथ्वीच्या एका भागात कायमस्वरुपी दिवस तर सूर्याच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या दुसऱ्या भागात कायमस्वरुपी अंधार असेल. पृथ्वीवर काही भागात कायम सूर्योदय व सूर्यास्थाची स्थिती असेल. काही भागात वर्षभर पाऊस पडेल. तर काही भागात कायमस्वरुपी दुष्काळस्थिती निर्माण होईल, असाही दावा या प्रकरणी केला जातो. https://bhagyadarshi.blogspot.com/




मोठमोठे डोंगर उन्मळून पडतील 

पृथ्वीवरील या विचित्र स्थितीचा फटका बाष्पीभवनाच्या प्रक्रियेला बसेल. मानवासह संपूर्ण सजीवसृष्टी संकटात येईल. या स्थितीत नेमके काय होईल? याची कल्पना न केलेली बरी. पृथ्वीने अचानक फिरणे थांबवल्यास वेगवान वादळे निर्माण होतील. मोठ्या व धोकादायक वादळांचा वेग ताशी 200 ते 300 किलोमीटर एवढा असतो. या स्थितीत पृथ्वीने फिरणे थांबवले तर एक भयंकर वादळ निर्माण होईल. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वच वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर उडून जातील. मोठे डोंगरही उन्मळून पडतील. महासागरांचे पाणी संपूर्ण पृथ्वीवर पसरेल. https://bhagyadarshi.blogspot.com/

आता पाहूया पृथ्वीची माहिती... 

पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते. त्या क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. या अक्षाला पृथ्वीचा आस असेही म्हणतात. हा आस दक्षिणोत्तर असून, उत्तरेकडे तो साधारणतः ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. समजा तुम्ही ध्रुव ताऱ्यावर जावून पृथ्वीकडे पाहिले, तर ती तुम्हाला घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरताना दिसेल. 

पृथ्वी स्वतःभोवती 23 तास 56 मिनिटे व 4.099 सेकंदांत 1 फेरी पूर्ण करते. सूर्याचा संदर्भ घेऊन विचार केला तर पृथ्वी एका दिवसात म्हमजे 24 तासांत ही 1 फेरी पूर्ण करते. हा फरक पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे होतो. दररोज 8,400 (24 तासांचे सेकंद)/365.25 ( एका वर्षातील दिवस) = 3 मिनिटे 56 सेकंद एवढा असतो. 




पृथ्वीची उत्पत्ती केव्हा झाली?

पृथ्वीची निर्मिती साधारणतः 457 कोटी वर्षांपूर्वी झाली असावी असे मानले जाते. त्यानंतर 453 कोटी वर्षांपूर्वी तिच्या उपग्रहाने म्हणजे आपल्या चंद्राने पृथ्वीला प्रदक्षिणा घालणे सुरू केले. पृथ्वीचा व्यास 12,753 किलोमीटर एवढा आहे. सूर्यापासूनच तिचे अंतर सामान्यतः 14,95,97,890 किलोमीटर एवढे आहे. पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर सजीवसृष्टी नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे पृथ्वी स्वतः एक मोठे चुंबक आहे. त्यामु्ळे तिच्याभोवती चुंबकीय क्षेत्र आहे. या क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानीकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशाकडे वळले जातात. 

तर मग पृथ्वीची इत्यंभूत माहिती जाणून घेताना तुम्हाला पृथ्वी क्षणभर थांबली तर किती भयंकर स्थिती उद्भवेल हे समजले का? हो तर मग उद्या पुन्हा अशाच एका रंजक विषयाची माहिती घेऊया...

 वाचा https://bhagyadarshi.blogspot.com/

0+ WhatsApp Great

1 टिप्पणी: