गावी लहानपणी कधी-कधी रात्रीचे भूताखेतांचे किस्से मस्त रंगायचे. माझा भूतांवर विश्वास नाही. पण काही जण खोटे बोलत नाहीत हे माहिती होते. त्यांना थापा मारायची सवय नाही हे सर्वांना माहिती होते. त्यामुळे असे लोक जेव्हा भूताचे अनुभव सांगायचे तेव्हा त्यांना खोटे ठरवणे योग्य वाटायचे नाही. https://bhagyadarshi.blogspot.com/
ज्याची त्याची श्रद्धा कपूर म्हणून मी हे किस्से ऐकायचो... 😄
असे खूप किस्से ऐकले.
त्यात एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे सर्वांना भूत रात्रीच दिसते.
असे का?
सोडा...(बाटलीतला नाही) हा आपला विषय नाही.. असाही ब्रह्मांडाच्या पसाऱ्यात अंधारच शाश्वत आहे...
आज हा विषय आठवण्याचे कारण म्हणजे अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेला (नासा) ब्रह्मांडात नुकतेच एक खरेखुरे भूत आढळले आहे... ते ही तोंड आ वासलेले...
आपले ब्रह्मांड अनंत रहस्यमय गोष्टींनी भरलेले आहे. आपल्या कधी कधी या ब्रह्मांडाचे खूप सुंदर रूप दिसते. पण कधी कधी त्याचे आक्राळविक्राळ रुपही नजरेस पडते. नासाला ब्रह्मांडाचे हेच आक्राळविक्राळ रुप नजरेस पडले आहे. नासाने काढलेला एक फोटो जेवढा सुंदर आहे, तेवढाच भितीदायकही आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/
2 मोठे डोळे अन् तोंड वासलेले भूत
वास्तविक, जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपच्या (JWST) माध्यमातून नासाला दिसलेले हे दृश्य एखाद्या 'डीप-स्पेस ब्लॉब मॉन्स्टर' अर्थात एखाद्या भितीदायक भूत किंवा राक्षसासारखे आहे. या फोटोत एक प्रचंड आकाराची धुळीची आकाशगंगा दिसत आहे. ती दरवर्षी शेकडो ताऱ्यांना जन्मास घालत आहे. तिचा आकार पाहून ती फारच भितीदायक वाटते. तिच्याकडे बारकाईने पाहून ही आकाशगंगा म्हणजे 2 मोठे डोळे असणारा व तोंड वासलेला ब्रह्मांड राक्षसच दिसते. https://bhagyadarshi.blogspot.com/
केव्हा अस्तित्वात आली ही गॅलक्सी?
ऑस्टिनच्या टेक्सास विद्यापीठाच्या खगोलशास्त्रज्ञांचे लक्ष्य या आकाशगंगेने स्वतःकडे वेधून घेतले. त्यानंतर त्यांनी जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपच्या डेटाचे विश्लेषण केले. त्यात AzTECC71 नामक ही आकाशगंगा जवळपास 900 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आल्याचे निष्पन्न झाले. बारकाईने पाहिल्यास ही आकाशगंगा एखाद्या ओरडणाऱ्या भूतासारखी दिसते.
एक खराखुरा राक्षस
या शोधामुळे शास्त्रज्ञांची सुरुवातीच्या विश्वाबद्दलची समज बदलू शकते. कारण त्यांना पूर्वी ही राक्षसी आकाशगंगा छोटीशी असल्याचे वाटले. पण नंतर ती जवळपास 3 ते 10 पट जास्त दूरवर पसरल्याचे स्पष्ट झाले. टेक्सास विद्यापीठाचे संशोधक जेड मॅककिनी यांनी सांगितले की, या आकाशंगेला खराखुरा राक्षस म्हटले जाऊ शकते, कारण ती एखाद्या थेंबासारखी दिसत असली तरी ती दरवर्षी शेकडो नव्या ताऱ्यांना जन्म देत आहे. या घटनेमुळे आकाशगंगेची एक मोठी संख्या अजूनही आपल्या नजरेपासून दूर असल्याचेही या संशोधनामुळे स्पष्ट झाले आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/
जाता जाता एका झपाटलेल्या झाडाची गोष्ट...
एक दौलतकपूर नावाचे राज्य होते. दौलतसिंह नामक राजा त्यावर राज्य करत होता. राजा आपल्या प्रजेत लोकप्रिय होता. लोकही त्याच्यावर अमाप प्रेम करत होते. एकेदिवशी एक गिधाड आकाशात झपाटलेल्या झाडाचे बीज घेऊन उडत होते. हे गिधाड रौनकपुराहून उडताना त्याच्या तोंडातून हे बीज रौनकपूरच्या मध्यभागी पडले.
बी झपाटलेले होते, त्यामुळे दुसऱ्याच दिवशी त्याचे रोपट्यात रुपांतर झाले. तिथल्या स्थानिक रहिवाशांनी जेव्हा ते पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. कारण, या रोपाचा रंग काळा होता. हे एखादे जंगली गवत किंवा दुर्मिळ वनस्पती असावी असे त्यांना वाटले. दुसऱ्या दिवशी हे रोप खूप मोठे झाले. एका दिवसात हे रोप एवढे कसे वाढले या विचाराने जनता अधिकच गोंधळली.
अखेर तिसर्या दिवशी त्या रोपाचे झाड झाले. वेळ निघून गेला आणि वेगाने वाढणार्या या वनस्पतीवर विचार करून लोकही काळजीत पडले. त्यांनी हे प्रकरण राजाकडे नेले. या जादुई झाडाची माहिती मिळताच राजा तत्काळ झाडापाशी पोहोचला. एका काळ्या रंगाच्या रोपाचे 3 दिवसांत झाडात रूपांतर झाल्यामुळे राजालाही आश्चर्य वाटले. https://bhagyadarshi.blogspot.com/
चौथ्या दिवशी राजा स्वतः त्या झाडाजवळ पोहोचला. तोपर्यंत ते झाड खूप मोठे झाले होते. ते एवढ्या वेगाने वाढले होते की, कुणाचाही विश्वास बसत नव्हता. या झाडाचा रंग काळा असल्यामुळे राजाला हा प्रकार जादुटोण्याचा असावा असा संशय आला. हाच विचार करून राजाने घोषणा केली की, जो कुणी या झाडाचा नाश करेल त्याला 1 हजार सोन्याची नाणी बक्षीस म्हणून देण्यात येतील. एवढेच नाही तर राजाने या झाडाचा नायनाट करणाऱ्याला आपला उत्तराधिकारी बनवण्याचीही घोषणा केली.
एवढी मोठी घोषणा ऐकून सर्वांनीच झाड तोडण्याचा विचार सुरू केला. राजाच्या हुशार मंत्र्यांनीही आपापल्या परीने प्रयत्न केले, पण कुणीही झाड नष्ट करू शकले नाही. एकाने या झाडाभोवती आग लावली. तर दुसऱ्याने ते झपाटलेले झाड हत्तीने ओढून पाडण्याचा प्रयत्न केला. पण झाड जागचे हलले नाही.
हे पाहून लोक घाबरले... हे झाड भुताटकीने झपाटलेले आहे अशी त्यांची खात्री पटली. तेव्हा त्या गावातील एका हुशार माणसाच्या कानावर राजाची घोषणा पडली. त्यानंतर लगेच तो व्यक्ती आपल्या गुरूंकडे गेला. आणि त्या झपाटलेल्या झाडाशी संबंधित रहस्य जाणून घेतले.
गुरुजींनी आपल्या शक्तीने त्या विचारले, "तुला झाड नष्ट करायचे आहे का?"
त्या हुशार व्यक्तीने उत्तर दिले, “हो, गुरुजी. सर्वजण त्याच्यामुळे परेशान आहेत.”
गुरुजींनी सांगितले की, त्याचा नायनाट करण्याचा एकच मार्ग आहे. त्यासाठी त्या झाडाभोवती मीठ टाकावे लागेल.
ही युक्ती कळताच ती व्यक्ती ताबडतोब राजाकडे गेली आणि म्हणाली की, तुम्हाला या झाडाभोवती मीठ टाकावे लागेल. असे केल्यानेच हे झाड मरेल. राजाने आपल्या सैनिकांना तसे करण्यास सांगितले. सैनिकांनी मिळून झाडाभोवती भरपूर मीठ ओतले. https://bhagyadarshi.blogspot.com/
मीठ घातल्यानंतर अवघ्या एका दिवसातच झाडाचा आकार काहीसा कमी झाला. त्यानंतर 5 व्या दिवशी झाड अगदी लहान झाले. त्यानंतर ते वाळून नष्ट झाले. त्या हुशार माणसाची युक्ती यशस्वी ठरली होती. त्यामुळे राजाने प्रसन्न होऊन त्याला 1 हजार सोन्याच्या नाण्याची थैली व एक सनद दिली. या सनदीवर राजाच्या मृत्यूनंतर हा व्यक्ती त्याचे सिंहासन सांभाळेल असे नमूद होते. राजाच्या या घोषणेमुळे हा हुशार व्यक्ती आनंदाने आपल्या घरी परतला...
मॉरल ऑफ द स्टोरी - जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही. फक्त संयम अन् ती समजून घेण्याची गरज असते. https://bhagyadarshi.blogspot.com/



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा