भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

मृत्यूला हसत सामोरी गेलेली एक वीरांगणा

मागच्या काही ब्लॉगमध्ये आपण विज्ञानकथा वाचल्या. विज्ञानासारखाच इतिहासही अनेक थरारक गोष्टींनी भरलेला आहे. यातील काही शौर्यकथा अक्षरशः अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. चीनच्या चेंग बेनहुआची कथाही अशीच शहारे आणणारी आहे...

 चेंग बेनहुआ एक धीरोदात्त साहसी महिला होती. तिने 1937 साली जपानच्या चीनवरील हल्ल्यावेळी जपान्यांचा निकराने सामना केला. बंदुकीच्या संगीनीने शरीराची चाळणी होण्यापूर्वी तिचे एक छायाचित्र काढण्यात आले होते. मृत्यूच्या काही क्षण अगोदर काढण्यात आलेले तिचे हे हसरे छायाचित्र तिच्या निर्भयतेचे एक ऐतिहासिक उदाहरण ठरले. ते आजही तुम्हा-आम्हा सारख्या असंख्य नागरिकांना जीवन जगण्याचा संघर्ष करण्याचे बळ देते.



चेंग बेनहुआ यांचा हा फोटो जपानच्या एका फोटोग्राफरने काढला होता. या फोटोग्राफरने चेंगचे अंतिम क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते. जपानने या युद्धात आपल्या ताब्यात घेतले आणि त्यानंतर तिला तुरुंगात डांबले. ज्या सैनिकांनी तिला पकडले, त्यांनी तिच्यावर असंख्यवेळा बलात्कार केला. पण ती शेवटच्या श्वासापर्यंत डगमगली नाही. 

या छायाचित्रातही चेंग बेनहुआ आपल्या मृत्यूला हसत सामोरे जाताना दिसते. तिने आपले दोन्ही हात आपल्या छातीला घट्ट धरलेत. तिची मान अभिमानाने ऊर भरून यावा अशा पद्धतीने ताठ आहे. ती अत्यंत निडरपणे कॅमेऱ्याच्या पाहताना दिसून येते. तिचा याच पोजचता एक पुतळा चीनच्या नानजिंग शहरात उभारण्यात आला आहे.



नानजिंग शहर दुसऱ्या युद्धातील नरसंहाराचे साक्षीदार बनले होते. येथे जपानी सैनिकांनी 3 लाखांहून अधिक चिनी पुरुष व महिलांचा रक्तपात केला होता. चेंग बेनहुआची हत्या 1938 साली करण्यात आली. तेव्हा ती अवघ्या 24 वर्षांची होती. त्यानंतर वर्षभराने या युद्धाचे लोन संपूर्ण यूरोपपर्यंत पसरले. 

चिनी इतिहासकार व संग्रहालय संचालक फॅन जियानचुआन यांनी 2013 मध्ये पीपल्स डेलीला सांगितले की, या भीषण युद्धात मारल्या गेलेल्या लाखो लोकांमध्ये चेंग बेनहुआ ही सर्वात शक्तिशाली व्यक्ती होती. तिने स्वतःची ऐतिहासिक छापी सोडली. त्यामुळे ती आजही सर्वात जास्त आदरास पात्र ठरते. 

कोण होती चेंग बेनहुआ?

चेंग बेनहुआविषयी इंटरनेटवर फार कमी माहिती उपलब्ध आहे. तिची माहिती शोधूनही सापडत नाही. पण उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, चेंग बेनहुआचा जन्म 1914 साली चीनच्या अनहुई प्रांतातील हेक्सियान काउंटीतील गाओशियांग गावात झाला. तिच्या आईचे आडनाव लियांग होते. ती तिच्या आई-वडिलांच्या 4 भावंडांपैकी तिसरी होती. तिला 1 सावत्र भाऊही होता. माध्यमिक शिक्षण घेताना बेनहुआने चिनी स्काउट्सच्या 1194 रेजिमेंटमध्ये खडतर परिस्थितीचा सामना करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. तिने दुसऱ्या महायुद्धातील जपानविरोधातील युद्धात सक्रीय सहभाग घेतला होता. 



चेंग बेनहुआ 1937 च्या उत्तरार्धात चिनी सेनानी लिऊ झियी यांच्या संपर्कात आली. पण दुर्दैवाने लिऊ 1938 च्या सुरुवातीला जपानच्या हल्ल्यांत मारले गेले. त्यानंतर एप्रिल 1938 मध्ये कमांडर कोइची यामाशिता यांच्या नेतृत्वातील जपानच्या 6 व्या डिव्हिजनच्या 13 व्या रेजिमेंटने चेंग बेनहुआला ताब्यात घेतले. त्यानंतर तिचा अतोनात छळ करण्यात आला. तिच्यावर शेकडोवेळा सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर काही दिवसांनी जपानी सैनिकांनी दुसऱ्या एका ठाण्यावर स्थलांतरीत होण्याचे आदेश मिळाले. पण तत्पूर्वी, त्यांनी चेंग व तिच्या सहकारी लढवय्यांना बंदुकीच्या संगीनीने भोसकून ठार मारले.

सावित्रीमाईंचे ऐतिहासिक कार्य 

चेंग बेनहुआ सारख्या असंख्य महिला इतिहासात होऊन गेल्या. भारतात सावित्रीबाई फुले सारख्या महनीय व्यक्ती होऊन गेल्या. त्यांनी जात व लिंगावर आधारित भेदभाव व अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्याचे ऐतिहासिक कार्य केले. भारतात जेवढे महापुरुष झाले, त्या सर्वांविषयी एखाद दुसरा वाद आहे. पण महिलांना शिक्षणाची दारे उघडणाऱ्या सावित्रीमाई फुले यांच्याबाबत मात्र एकही वाद नाही. किंबहुना असल्या वादाच्याही कित्येक पुढे जाऊन त्यांनी त्याकाळी उत्तमोत्तम काम केले. 



महात्मा जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांनी जवळपास पावणे दोनशे वर्षांपूर्वी जे महान कार्य केले, ते काळाच्याही पुढे होते. या दाम्पत्याने त्या काळात दाखवलेली हिंमत, घेतलेली भूमिका व त्यासाठी केलेला त्याग आजही कुणी करण्याचे धाडस करू शकत नाही. त्यासाठी या दोन्ही महापुरुषांना मनापासून वंदन केलेच पाहिजे!

0+ WhatsApp Great

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा