भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

सोमवारी आकाशात 1 स्फोट अन् गायब होणार चकाकता तारा

bhagydarshi.blogspot.com आपले ब्रह्मांड अनंत गूढ गुपितांनी भरलेले आहे. त्यात आता आणखी एका अनोख्या घटनेची भर पडणार आहे. नव्या घटनेत आकाशातील एक सर्वाधिक चकाकणारा तारा अचानक नाहीसा होणार आहे. या असामान्य घटनेंतर्गत हा सर्वात मोठा व सर्वाधिक तेजस्वी तारा काही क्षणांसाठी नाहीसा होईल. एका उल्केमुळे हे सर्वकाही घडेल. खगोलप्रेमींच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी पर्वणी असणारी घटना येत्या सोमवारी 11 डिसेंबर रोजी रात्री उशिरा घडेल. ती मंगळवारी पहाटेपर्यंत पाहता येईल.



कुठून दिसेल हा अनोखा नजारा?

मध्य आशियाच्या तझाकिस्तान व आर्मेनियापासून तुर्की, ग्रीस, इटली व स्पेनपर्यंत ही घटना पाहता येईल. एवढेच नाही तर मियामी व फ्लोरिडा कीज ते मेक्सिकोच्या काही भागांतही ही घटना दिसेल. शास्त्रज्ञांनी या ताऱ्याला बेटेल्गेयूज (betelgeuse) असे नाव दिले आहे. संशोधक त्याला ओरायन तारकामंडळातील एक लाल विशाल तारा म्हणूनही ओळखतात. या ताऱ्यासमोरून लियोना नामक उल्कापिंड जाईल. लियोना हा मंगळ व गुरू ग्रहाच्या मध्यभागी असणाऱ्या उल्कापिंडांच्या बेल्टमध्ये हळूहळू फिरणारा एक आयाताकृती दगड आहे. 

कसा आहे हा तारा?

ही एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे, जिने केवळ अवकाश विज्ञानात रस असलेल्या लोकांनाच आकर्षित केले नाही, तर शास्त्रज्ञांचेही लक्ष वेधून घेतले आहे. बेटेल्गेयूज तारा रात्रीच्या आकाशात सर्वात जास्त चमकतो. या ताऱ्याचा स्फोट होणार आहे. त्यानंतर तो सुपरनोव्हात जाण्यास तयार होईल. शास्त्रज्ञांच्या मते, गेल्या काही काळापासून या ताऱ्याचा व्यवहार खूपच अनियमित झाला आहे. या ताऱ्याचा व्यास सुमारे 700 दशलक्ष मैलांपेक्षा जास्त असून, तो त्याच्या खास केशरी रंगासाठी ओळखला जातो. खगोलशास्त्रज्ञ याला सर्वात मोठ्या ज्ञात ताऱ्यांपैकी एक मानतात.

संशोधकांची उत्सुकता टोकाला 

खगोलशास्त्रज्ञांना या ग्रहणाद्वारे बेटेल्गेयूज आणि लिओनाची अधिक माहिती गोळा करता येईल. तथापि, हे ग्रहण 15 सेकंदांपेक्षा जास्त राहणार नाही. उल्लेखनीय गत सप्टेंबर महिन्यात स्पॅनिश संशोधकांच्या एका पथकाने ही उल्का जवळपास 34 मैल रुंद व 80 किलोमीटर लांब असण्याचा अंदाज व्यक्त केला होता. उल्कापिंडामुळे संपूर्ण तारा नाहीसा होईल. यामुळे संपूर्ण ग्रहण होईल की त्याचा काही भागच झाकला जाईल हे अद्याप स्पष्ट झाले नाही. जर हे संपूर्ण ग्रहण असेल तर ताऱ्याला पूर्णतः गायब होण्यासाठी किती सेकंद लागतील हे शास्त्रज्ञांना माहिती नाही. त्या स्थितीत हा तारा अवघ्या 10 सेकंदांत पूर्णतः गायब होईल. 

0+ WhatsApp Great

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा