नमस्कार, मी भाग्यदर्शी लोखंडे!
मी छत्रपती संभाजीनगर येथील राहणारा एक साधा उत्साही पत्रकार आहे.
माझा ब्लॉग https://bhagyadarshi.blogspot.com/ हा माझ्या मनातील विचार, अनुभव व शिकवणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. मी लहानपणापासूनच काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो. महाविद्यालयात असताना शेरोशायरी, कविता, गझल आदींनी माझ्या काही वह्या भरल्या. त्यानंतर मी पोटापाण्यासाठी पत्रकारितेत आलो. हो, सामाजिक मुद्यांवर ठाम मत व्यक्त करण्याचा किडा माझ्यातही आहे. त्यामुळे पत्रकारिता फार विचारपूर्वकच निवडली. यामुळे काय झाले तर माझ्या मनातील लेखनाची ज्योत कायम तेवत राहिली.
मी हा ब्लॉग 2013 मध्ये सुरू केला. पण नंतर स्वतःच्या प्रपंचात बुडालो. यामुळे लेखनात एक मोठा खंड पडला. पण पत्रकारिता अव्याहत सुरूच आहे. आता पुन्हा एकदा नोकरी धंदा सांभाळून लिहिण्यास सुरुवात केली आहे. यामुळे हा ब्लॉग यापुढे कायम हलता दिसेल.
तुम्हाला या ब्लॉगवर मिळेल -
- सामाजिक प्रबोधनाविषयी खास लेख.
- महाराष्ट्रातील सांस्कृतिक चळवळींचा इतिहास
- वाचकांसाठी प्रेरणादायी व सकारात्मक विचार
- जगभरातील वैज्ञानिक शोध, विज्ञानविषयक घडामोडी
मी इथे स्पष्ट करतो की, मी https://divyamarathi.bhaskar.com/ या वेबसाईटचा एक भाग आहे. पण येथील माझे विचार पूर्णपणे माझे वैयक्तिक आहेत. त्याचा मी नोकरी करत असलेल्या कंपनीशी कोणताही संबंध नाही.
तुम्हाला माझे लेख आवडत असतील तर कृपया कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक छोटासा प्रतिसाद मला खूप प्रेरणा देतो.
धन्यवाद!
भाग्यदर्शी यादवराव लोखंडे
छत्रपती संभाजीनगर ✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा