रविवार, २३ ऑगस्ट, २०२६
नारायण मेघाजी लोखंडे
रविवार, हा दिवस आपला प्राणवायू. संपूर्ण आठवड्याची थकावट हा दिवस दूर करतो. पण रविवारची ही साप्ताहिक सुट्टी आपल्या पदरात कशी पडली? त्यासाठी कुणी व किती संघर्ष केला? आपल्यासारख्या कामगार लोकांसाठी आठवड्यात एक दिवस सुट्टी मिळावी म्हणून आपले जीवन कुणी खर्ची घातले? हे आपल्याला माहिती असलेच पाहिजे.
सोमवार, १३ जुलै, २०२६
दानवीर कर्णापासून मॅकेंझी स्कॉटपर्यंत... काळ बदलला, पण दानत आजही जिवंत
महाभारतातील दानवीर कर्णाचे नाव घेतले की, उदारतेचे सर्वोच्च उदाहरण डोळ्यांसमोर उभे राहते. स्वतःचे कवच-कुंडल हेच त्याच्या जीवनरक्षणाचे साधन असूनही, याचकाच्या विनंतीवर त्याने ते निःसंकोचपणे दान केले, असे महाभारतात वर्णन येते. ही कथा श्रद्धा आणि परंपरेचा भाग असली तरी तिच्यामागील संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. खरे दान तेच, जे कोणत्याही स्वार्थाशिवाय केले जाते.
गुरुवार, १६ एप्रिल, २०२६
स्त्रियांची ‘अस्पृश्यता’ केव्हा नष्ट होणार?
मानवजातीने विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि विचारस्वातंत्र्याच्या बाबतीत मोठी झेप घेतली आहे. पण या प्रगतीच्या उजेडातही काही अंधार अजूनही तसाच टिकून आहे. त्यापैकी एक म्हणजे स्त्रियांच्या मासिक पाळीशी जोडलेली तथाकथित ‘अस्पृश्यता’. ही केवळ एक परंपरा नाही, तर ती स्त्रीच्या अस्तित्वावर, तिच्या सन्मानावर आणि तिच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारी मानसिकता आहे.
शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३
मृत्यूला हसत सामोरी गेलेली एक वीरांगणा
मागच्या काही ब्लॉगमध्ये आपण विज्ञानकथा वाचल्या. विज्ञानासारखाच इतिहासही अनेक थरारक गोष्टींनी भरलेला आहे. यातील काही शौर्यकथा अक्षरशः अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. चीनच्या चेंग बेनहुआची कथाही अशीच शहारे आणणारी आहे...
चेंग बेनहुआ एक धीरोदात्त साहसी महिला होती. तिने 1937 साली जपानच्या चीनवरील हल्ल्यावेळी जपान्यांचा निकराने सामना केला. बंदुकीच्या संगीनीने शरीराची चाळणी होण्यापूर्वी तिचे एक छायाचित्र काढण्यात आले होते. मृत्यूच्या काही क्षण अगोदर काढण्यात आलेले तिचे हे हसरे छायाचित्र तिच्या निर्भयतेचे एक ऐतिहासिक उदाहरण ठरले. ते आजही तुम्हा-आम्हा सारख्या असंख्य नागरिकांना जीवन जगण्याचा संघर्ष करण्याचे बळ देते.
चेंग बेनहुआ यांचा हा फोटो जपानच्या एका फोटोग्राफरने काढला होता. या फोटोग्राफरने चेंगचे अंतिम क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते. जपानने या युद्धात आपल्या ताब्यात घेतले आणि त्यानंतर तिला तुरुंगात डांबले. ज्या सैनिकांनी तिला पकडले, त्यांनी तिच्यावर असंख्यवेळा बलात्कार केला. पण ती शेवटच्या श्वासापर्यंत डगमगली नाही.
या छायाचित्रातही चेंग बेनहुआ आपल्या मृत्यूला हसत सामोरे जाताना दिसते. तिने आपले दोन्ही हात आपल्या छातीला घट्ट धरलेत. तिची मान अभिमानाने ऊर भरून यावा अशा पद्धतीने ताठ आहे. ती अत्यंत निडरपणे कॅमेऱ्याच्या पाहताना दिसून येते. तिचा याच पोजचता एक पुतळा चीनच्या नानजिंग शहरात उभारण्यात आला आहे.
नानजिंग शहर दुसऱ्या युद्धातील नरसंहाराचे साक्षीदार बनले होते. येथे जपानी सैनिकांनी 3 लाखांहून अधिक चिनी पुरुष व महिलांचा रक्तपात केला होता. चेंग बेनहुआची हत्या 1938 साली करण्यात आली. तेव्हा ती अवघ्या 24 वर्षांची होती. त्यानंतर वर्षभराने या युद्धाचे लोन संपूर्ण यूरोपपर्यंत पसरले.
चिनी इतिहासकार व संग्रहालय संचालक फॅन जियानचुआन यांनी 2013 मध्ये पीपल्स डेलीला सांगितले की, या भीषण युद्धात मारल्या गेलेल्या लाखो लोकांमध्ये चेंग बेनहुआ ही सर्वात शक्तिशाली व्यक्ती होती. तिने स्वतःची ऐतिहासिक छापी सोडली. त्यामुळे ती आजही सर्वात जास्त आदरास पात्र ठरते.
कोण होती चेंग बेनहुआ?
चेंग बेनहुआविषयी इंटरनेटवर फार कमी माहिती उपलब्ध आहे. तिची माहिती शोधूनही सापडत नाही. पण उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, चेंग बेनहुआचा जन्म 1914 साली चीनच्या अनहुई प्रांतातील हेक्सियान काउंटीतील गाओशियांग गावात झाला. तिच्या आईचे आडनाव लियांग होते. ती तिच्या आई-वडिलांच्या 4 भावंडांपैकी तिसरी होती. तिला 1 सावत्र भाऊही होता. माध्यमिक शिक्षण घेताना बेनहुआने चिनी स्काउट्सच्या 1194 रेजिमेंटमध्ये खडतर परिस्थितीचा सामना करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. तिने दुसऱ्या महायुद्धातील जपानविरोधातील युद्धात सक्रीय सहभाग घेतला होता.
चेंग बेनहुआ 1937 च्या उत्तरार्धात चिनी सेनानी लिऊ झियी यांच्या संपर्कात आली. पण दुर्दैवाने लिऊ 1938 च्या सुरुवातीला जपानच्या हल्ल्यांत मारले गेले. त्यानंतर एप्रिल 1938 मध्ये कमांडर कोइची यामाशिता यांच्या नेतृत्वातील जपानच्या 6 व्या डिव्हिजनच्या 13 व्या रेजिमेंटने चेंग बेनहुआला ताब्यात घेतले. त्यानंतर तिचा अतोनात छळ करण्यात आला. तिच्यावर शेकडोवेळा सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर काही दिवसांनी जपानी सैनिकांनी दुसऱ्या एका ठाण्यावर स्थलांतरीत होण्याचे आदेश मिळाले. पण तत्पूर्वी, त्यांनी चेंग व तिच्या सहकारी लढवय्यांना बंदुकीच्या संगीनीने भोसकून ठार मारले.
सावित्रीमाईंचे ऐतिहासिक कार्य
चेंग बेनहुआ सारख्या असंख्य महिला इतिहासात होऊन गेल्या. भारतात सावित्रीबाई फुले सारख्या महनीय व्यक्ती होऊन गेल्या. त्यांनी जात व लिंगावर आधारित भेदभाव व अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्याचे ऐतिहासिक कार्य केले. भारतात जेवढे महापुरुष झाले, त्या सर्वांविषयी एखाद दुसरा वाद आहे. पण महिलांना शिक्षणाची दारे उघडणाऱ्या सावित्रीमाई फुले यांच्याबाबत मात्र एकही वाद नाही. किंबहुना असल्या वादाच्याही कित्येक पुढे जाऊन त्यांनी त्याकाळी उत्तमोत्तम काम केले.
महात्मा जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांनी जवळपास पावणे दोनशे वर्षांपूर्वी जे महान कार्य केले, ते काळाच्याही पुढे होते. या दाम्पत्याने त्या काळात दाखवलेली हिंमत, घेतलेली भूमिका व त्यासाठी केलेला त्याग आजही कुणी करण्याचे धाडस करू शकत नाही. त्यासाठी या दोन्ही महापुरुषांना मनापासून वंदन केलेच पाहिजे!
बुधवार, २० डिसेंबर, २०२३
ब्रह्मांडातील विशाल तरंगता तलाव
जलं ददाति जीवनम् जलं विना मरणम्...अर्थात पाणी असेल तर जीवन व नसेल तर मरण... पाणी हा विषयी कितीही चावून चोथा झाला असला तरी त्याबद्दलचे आपले अज्ञान पदोपदी दिसून येते.
आपले ब्रह्मांड अनेक गुपितांनी भरलेले आहे. आपली पृथ्वी सौरमंडळाचा एक सदस्य आहे. आपल्या ब्रह्मांडाचा एक किरकोळ हिस्सा... हे ब्रह्मांड पृथ्वीवरून दिसणाऱ्या आकाशगंगेचा एक हिस्सा आहे. लहानपणापासून आतापर्यंत आपण विज्ञान, पृथ्वी, आकाश, चंद्र व सूर्याचे किस्से ऐकलेत. संशोधकांच्या मते, जगात केवळ आपणच नाही. आपल्यासारखे अनेक ब्रह्मांड आहेत. कारण, आकाश अनंत आहे. त्याला कोणतेही पलिकडचे टोक नाही. आपण त्याला अद्याप पूर्णपणे पाहिले आहे किंवा ते आपल्याला फारसे समजलेही नाही. https://bhagyadarshi.blogspot.com/
त्यानंतरही आपण आपल्यासारखे दुसरे कोणतेही ब्रह्मांड नाही असा दावा कसे काय करू शकतो? काही संशोधक या प्रश्नाचे उत्तर पाणी असे देतात. त्यांच्या मते ब्रह्मांडात दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी पाणी नाही. पण त्यांचा हा समज आता चुकीचा ठरला आहे. कारण, आजवर मनुष्याला माहिती असलेल्या ब्रह्मांडातील पाण्याचा सर्वात मोठा साठा पृथ्वीपासून 12 अब्ज प्रकाश वर्ष अंतरावर आढळला आहे. विशेष म्हणजे हा साठा पृथ्वीवरील एकूण जलसाठ्याच्या तुलनेत तब्बल 140 ट्रिलियन पट मोठा आहे.
खगोलशास्त्रज्ञांच्या 2 चमूंनी संयुक्तपणे तरंगता जलाशय शोधून काढला आहे. पॅसिफिक महासागर पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर असल्याचे आपण मानतो. पण पृथ्वीवर जेवढ्या नद्या, तलाव, सरोवरे व समुद्र किंवा महासागर आहेत, ते सर्व मिळून ब्रह्मांडात आढळलेल्या या तरंगत्या जलाशयापुढे केवळ पाण्याचा एक थेंब आहे.
ब्रह्मांडाच्या एखाद्या कोपऱ्यात आपल्यासारखेच सजिवसृष्टी असल्याचा दावा मानवजातीने आतापर्यंत अनेकदा केला आहे. त्यांच्या या दाव्याला या संशोधनामुळे बळ मिळाले आहे. नासा व इस्रो सारख्या अंतराळ संस्था अंतराळात पाण्याचा शोध घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहेत. त्यामु्ळे क्वासर (एक विशाल ब्लॅकहोल) लगत पाण्याचा हा विशालकाय ढग आढळणे, हे खगोल विज्ञानाचे एक मोठे यश आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/
संशोधकांच्या मते, क्वासरमधून प्रचंड ऊर्जा बाहेर पडत आहे. या ब्लॅकहोलच्या मध्यभागी वायू व धूळ कोसळत आहे. या कृष्णविवरातून सूर्यापेक्षा तब्बल 22 पट अधिक ऊर्जा बाहेर पडते.
दुसरीकडे, संशोधकांनी केवळ पाणी अस्तित्वात असणाऱ्या एका ग्रहाचा शोध लावला आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 100 प्रकाश वर्ष अंतरावर आहे. हा ग्रह पाण्याच्या एका जाड थराने झाकलेला आहे. त्याची रचना गुरू व शनीच्या काही चंद्रांसारखी आहे. पण त्याचा आकार व वस्तुमान पृथ्वीपेक्षा जास्त आहे. पण त्याच्या ताऱ्यापासून त्याचे अंतर फार कमी असल्यामुळे तिथे जीवसृष्टी अस्तित्वात येण्याची कोणतीही शक्यता नाही. TOI-1452 b हा एक एक्सोप्लॅनेट आहे, जो ड्रॅको नक्षत्रात असलेल्या बायनरी सिस्टीममधील दोन लहान तार्यांपैकी एका तार्याभोवती फिरतो.
संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने या ग्रहाचा शोध लावला. त्याचे नेतृत्व युनिव्हर्सिटी डटी मॉन्ट्रियल येथील पीएचडी विद्यार्थी व एक्सोप्लॅनेट्सवर संशोधन करणाऱ्या संस्थेने लावला. नासाच्या TESS अंतराळ दुर्बिणीच्या माध्यमातून या ग्रहाचा शोध लावला. https://bhagyadarshi.blogspot.com/
पृथ्वीशिवाय 17 ग्रहांवर पाण्याचे अस्तित्व
जीवसृष्टीसाठी आवश्यक असणार्या मूलभूत घटकांमध्ये पाण्याचा समावेश होतो. त्यामुळे आपल्या सौरमालिकेतील किंवा बाहेरील ग्रहांबाबतचे संशोधन करत असताना तिथे पाण्याचे अस्तित्व आहे का? हे तपासून पाहिले जाते. नासाच्या संशोधनानुसार, पृथ्वीशिवाय आणखी 17 ग्रहांवर पाण्याचे अस्तित्व आहे. हा डेटा मानवासाठी इतर ठिकाणी जीवसृष्टी निर्माण करण्याकरिता अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. तूर्त, आपल्या सौरमालेत केवळ पृथ्वीवरच जीवसृष्टी अस्तित्वात आहे.
आपल्या सौरमालेसारखे विविध ग्रह असलेल्या अनेक सौरमालिका अंतराळात आहेत. अशा प्रकारच्या सौरमालिकेतील अनेक ग्रहांवर जीवसृष्टी असू शकते असा संशोधकांचा दावा आहे. नासाच्या मते, पृथ्वीसारख्या अन्य 17 ग्रहांवर पाणीसाठा आहे. हे सर्व ग्रह आपल्या सौरमालेबाहेरील आहेत. काही ग्रहांवर बर्फाळ महासागर, काहींच्या पृष्ठभागावर द्रवरूप महासागर, तर काहींच्या बर्फाळ पृष्ठभागाखाली महासागर आहेत असा दावा नासाने यासंबंधी केला आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/
शास्त्रज्ञांनी या 17 ग्रहांवर असलेल्या गिझरचा सखोल अभ्यास केला आहे. जमिनीवर अशी छिद्रे असतात जिथून कारंज्यासारखे पाणी बाहेर पडते. या छिद्रांना वैज्ञानिक भाषेत गिझर असे म्हणतात. पाणी गोठल्यामुळे किंवा वितळल्यामुळे बर्फाळ महासागराच्या पृष्ठभागाखाली दाब निर्माण होतो. अशा स्थिती जमिनीतील पाणी कारंजे सारखे बाहेर वाहायला लागते. कधीकधी हे कारंजे 100 मीटर उंच असतात. विशेष म्हणजे हे 17 ग्रह पृथ्वीच्या जवळपास आहेत. येथे पुरेसा प्रकाश, पाणी आणि बर्फ आहे. दगड देखील आहेत. या खडकांची खरी रचना कशी आहे, यावर सध्या संशोधन सुरू आहे.
आता वाचू पाण्याच्या थेंबाची कथा...
गिसान नावाचे एक झेन गुरू होते. ते अन्य झेन गुरूंप्रमाणे केवळ पुस्तकी ज्ञानातून अध्यात्मिक शिकवण न देता, जगण्याच्या रोजच्या अनुभवातून शिष्यांना शिकवण देण्यासाठी प्रसिद्ध होते.
एके दिवशी काय झाले? ते आंघोळीला बसणार इतक्यात त्यांच्या लक्षात आले की पाणी जरा जास्तच गरम आहे. त्यांनी एका शिष्याला बोलावले आणि सांगितले की जरा थंड पाण्याची एक बादली भरून आण आणि हे गरम पाणी थोडे कोमट कर, ते फारच गरम आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/
शिष्य गेला व त्यांनी थंड पाण्याची बादली भरून आणली. त्याने गरम पाण्यामध्ये थंड पाणी ओतले आणि गिसान यांना आंघोळ करता येईल इतकं ते कोमट केलं. हे काम झाल्यावर त्यांनं बादलीतलं उरलेलं थंड पाणी स्नानगृहात ओतून टाकलं.
त्या क्षणी गिसान, त्या शिष्यावर अज्ञानी, मूर्ख माणसा असं म्हणत ते जोरात खेकसले. एकदम धक्का बसलेल्या त्या शिष्याकडे बघत ते पुढे म्हणाले, उरलेलं पाणी तू झाडांना का नाही दिलंस. पाण्याचा एक थेंब देखील वाया घालवण्याचा अधिकार या मंदिरामध्ये तुला कोणी दिला?
असं म्हणतात, त्याक्षणी त्या शिष्याला झेनचा साक्षात्कार झाला. त्यानं आपलं नाव बदललं आणि तेकीसुई असं नवं नाव धारण केलं. तेकीसुईचा अर्थ आहे पाण्याचा थेंब!
मॉरल ऑफ द स्टोरी
"पृथ्वीचा 71 टक्के भाग पाण्याने व्यापला आहे. पण त्यापैकी बहुतांश भाग समुद्र व महासागरांत सामावलेला आहे. उरलेल्या 2.5 टक्के पाण्यापैकी केवळ 1 टक्के पाणीच पिण्यायोग्य आहे. हे पाणी म्हणजेच आपले जीवन आहे. ते जोवर उपलब्ध असेल, तोवरच पृथ्वीवर सजीवांचे अस्तित्व असेल."
बुधवार, १३ डिसेंबर, २०२३
ब्रह्मांडातील 'ओरडणारे भूत' अन् 'झपाटलेले झाड'
गावी लहानपणी कधी-कधी रात्रीचे भूताखेतांचे किस्से मस्त रंगायचे. माझा भूतांवर विश्वास नाही. पण काही जण खोटे बोलत नाहीत हे माहिती होते. त्यांना थापा मारायची सवय नाही हे सर्वांना माहिती होते. त्यामुळे असे लोक जेव्हा भूताचे अनुभव सांगायचे तेव्हा त्यांना खोटे ठरवणे योग्य वाटायचे नाही. https://bhagyadarshi.blogspot.com/
ज्याची त्याची श्रद्धा कपूर म्हणून मी हे किस्से ऐकायचो... 😄
असे खूप किस्से ऐकले.
त्यात एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे सर्वांना भूत रात्रीच दिसते.
असे का?
सोडा...(बाटलीतला नाही) हा आपला विषय नाही.. असाही ब्रह्मांडाच्या पसाऱ्यात अंधारच शाश्वत आहे...
आज हा विषय आठवण्याचे कारण म्हणजे अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेला (नासा) ब्रह्मांडात नुकतेच एक खरेखुरे भूत आढळले आहे... ते ही तोंड आ वासलेले...
आपले ब्रह्मांड अनंत रहस्यमय गोष्टींनी भरलेले आहे. आपल्या कधी कधी या ब्रह्मांडाचे खूप सुंदर रूप दिसते. पण कधी कधी त्याचे आक्राळविक्राळ रुपही नजरेस पडते. नासाला ब्रह्मांडाचे हेच आक्राळविक्राळ रुप नजरेस पडले आहे. नासाने काढलेला एक फोटो जेवढा सुंदर आहे, तेवढाच भितीदायकही आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/
2 मोठे डोळे अन् तोंड वासलेले भूत
वास्तविक, जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपच्या (JWST) माध्यमातून नासाला दिसलेले हे दृश्य एखाद्या 'डीप-स्पेस ब्लॉब मॉन्स्टर' अर्थात एखाद्या भितीदायक भूत किंवा राक्षसासारखे आहे. या फोटोत एक प्रचंड आकाराची धुळीची आकाशगंगा दिसत आहे. ती दरवर्षी शेकडो ताऱ्यांना जन्मास घालत आहे. तिचा आकार पाहून ती फारच भितीदायक वाटते. तिच्याकडे बारकाईने पाहून ही आकाशगंगा म्हणजे 2 मोठे डोळे असणारा व तोंड वासलेला ब्रह्मांड राक्षसच दिसते. https://bhagyadarshi.blogspot.com/
केव्हा अस्तित्वात आली ही गॅलक्सी?
ऑस्टिनच्या टेक्सास विद्यापीठाच्या खगोलशास्त्रज्ञांचे लक्ष्य या आकाशगंगेने स्वतःकडे वेधून घेतले. त्यानंतर त्यांनी जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपच्या डेटाचे विश्लेषण केले. त्यात AzTECC71 नामक ही आकाशगंगा जवळपास 900 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आल्याचे निष्पन्न झाले. बारकाईने पाहिल्यास ही आकाशगंगा एखाद्या ओरडणाऱ्या भूतासारखी दिसते.
एक खराखुरा राक्षस
या शोधामुळे शास्त्रज्ञांची सुरुवातीच्या विश्वाबद्दलची समज बदलू शकते. कारण त्यांना पूर्वी ही राक्षसी आकाशगंगा छोटीशी असल्याचे वाटले. पण नंतर ती जवळपास 3 ते 10 पट जास्त दूरवर पसरल्याचे स्पष्ट झाले. टेक्सास विद्यापीठाचे संशोधक जेड मॅककिनी यांनी सांगितले की, या आकाशंगेला खराखुरा राक्षस म्हटले जाऊ शकते, कारण ती एखाद्या थेंबासारखी दिसत असली तरी ती दरवर्षी शेकडो नव्या ताऱ्यांना जन्म देत आहे. या घटनेमुळे आकाशगंगेची एक मोठी संख्या अजूनही आपल्या नजरेपासून दूर असल्याचेही या संशोधनामुळे स्पष्ट झाले आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/
जाता जाता एका झपाटलेल्या झाडाची गोष्ट...
एक दौलतकपूर नावाचे राज्य होते. दौलतसिंह नामक राजा त्यावर राज्य करत होता. राजा आपल्या प्रजेत लोकप्रिय होता. लोकही त्याच्यावर अमाप प्रेम करत होते. एकेदिवशी एक गिधाड आकाशात झपाटलेल्या झाडाचे बीज घेऊन उडत होते. हे गिधाड रौनकपुराहून उडताना त्याच्या तोंडातून हे बीज रौनकपूरच्या मध्यभागी पडले.
बी झपाटलेले होते, त्यामुळे दुसऱ्याच दिवशी त्याचे रोपट्यात रुपांतर झाले. तिथल्या स्थानिक रहिवाशांनी जेव्हा ते पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. कारण, या रोपाचा रंग काळा होता. हे एखादे जंगली गवत किंवा दुर्मिळ वनस्पती असावी असे त्यांना वाटले. दुसऱ्या दिवशी हे रोप खूप मोठे झाले. एका दिवसात हे रोप एवढे कसे वाढले या विचाराने जनता अधिकच गोंधळली.
अखेर तिसर्या दिवशी त्या रोपाचे झाड झाले. वेळ निघून गेला आणि वेगाने वाढणार्या या वनस्पतीवर विचार करून लोकही काळजीत पडले. त्यांनी हे प्रकरण राजाकडे नेले. या जादुई झाडाची माहिती मिळताच राजा तत्काळ झाडापाशी पोहोचला. एका काळ्या रंगाच्या रोपाचे 3 दिवसांत झाडात रूपांतर झाल्यामुळे राजालाही आश्चर्य वाटले. https://bhagyadarshi.blogspot.com/
चौथ्या दिवशी राजा स्वतः त्या झाडाजवळ पोहोचला. तोपर्यंत ते झाड खूप मोठे झाले होते. ते एवढ्या वेगाने वाढले होते की, कुणाचाही विश्वास बसत नव्हता. या झाडाचा रंग काळा असल्यामुळे राजाला हा प्रकार जादुटोण्याचा असावा असा संशय आला. हाच विचार करून राजाने घोषणा केली की, जो कुणी या झाडाचा नाश करेल त्याला 1 हजार सोन्याची नाणी बक्षीस म्हणून देण्यात येतील. एवढेच नाही तर राजाने या झाडाचा नायनाट करणाऱ्याला आपला उत्तराधिकारी बनवण्याचीही घोषणा केली.
एवढी मोठी घोषणा ऐकून सर्वांनीच झाड तोडण्याचा विचार सुरू केला. राजाच्या हुशार मंत्र्यांनीही आपापल्या परीने प्रयत्न केले, पण कुणीही झाड नष्ट करू शकले नाही. एकाने या झाडाभोवती आग लावली. तर दुसऱ्याने ते झपाटलेले झाड हत्तीने ओढून पाडण्याचा प्रयत्न केला. पण झाड जागचे हलले नाही.
हे पाहून लोक घाबरले... हे झाड भुताटकीने झपाटलेले आहे अशी त्यांची खात्री पटली. तेव्हा त्या गावातील एका हुशार माणसाच्या कानावर राजाची घोषणा पडली. त्यानंतर लगेच तो व्यक्ती आपल्या गुरूंकडे गेला. आणि त्या झपाटलेल्या झाडाशी संबंधित रहस्य जाणून घेतले.
गुरुजींनी आपल्या शक्तीने त्या विचारले, "तुला झाड नष्ट करायचे आहे का?"
त्या हुशार व्यक्तीने उत्तर दिले, “हो, गुरुजी. सर्वजण त्याच्यामुळे परेशान आहेत.”
गुरुजींनी सांगितले की, त्याचा नायनाट करण्याचा एकच मार्ग आहे. त्यासाठी त्या झाडाभोवती मीठ टाकावे लागेल.
ही युक्ती कळताच ती व्यक्ती ताबडतोब राजाकडे गेली आणि म्हणाली की, तुम्हाला या झाडाभोवती मीठ टाकावे लागेल. असे केल्यानेच हे झाड मरेल. राजाने आपल्या सैनिकांना तसे करण्यास सांगितले. सैनिकांनी मिळून झाडाभोवती भरपूर मीठ ओतले. https://bhagyadarshi.blogspot.com/
मीठ घातल्यानंतर अवघ्या एका दिवसातच झाडाचा आकार काहीसा कमी झाला. त्यानंतर 5 व्या दिवशी झाड अगदी लहान झाले. त्यानंतर ते वाळून नष्ट झाले. त्या हुशार माणसाची युक्ती यशस्वी ठरली होती. त्यामुळे राजाने प्रसन्न होऊन त्याला 1 हजार सोन्याच्या नाण्याची थैली व एक सनद दिली. या सनदीवर राजाच्या मृत्यूनंतर हा व्यक्ती त्याचे सिंहासन सांभाळेल असे नमूद होते. राजाच्या या घोषणेमुळे हा हुशार व्यक्ती आनंदाने आपल्या घरी परतला...
मॉरल ऑफ द स्टोरी - जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही. फक्त संयम अन् ती समजून घेण्याची गरज असते. https://bhagyadarshi.blogspot.com/
सोमवार, ११ डिसेंबर, २०२३
तुम्ही नरकाचा दरवाजा पाहिलाय का?
स्वर्ग अन् नरक या दोन ध्रुवांसारख्या 2 टोकांच्या गोष्टी आहेत. स्वर्ग पुण्यवंतांना प्राप्त होणारा आनंदमय लोक, तर नरक म्हणजे पापी माणसांना मिळणारा दुःखमय लोक... स्वर्ग हा ऊर्ध्वलोक म्हणजे पृथ्वीच्या वर आहे. तर नरक हा अधोलोक म्हणजे पृथ्वीच्या खाली आहे. काही धार्मिक परंपरांमध्ये स्वर्ग हे देवांचे वसतिस्थान, तर नरक हे कथित दुष्ट शक्तींचे निवासस्थान मानले जाते. स्वर्ग हा आनंदमय असल्यामुळे प्रकाश हे त्याचे प्रतीक आहे. याऊलट नरक हे काळोखाचे प्रतीक मानले जाते. https://bhagyadarshi.blogspot.com/
स्वर्ग व नरक या दोन्ही अवस्था मृत्यूनंतर पाहता येतात असे मानले जाते. अनेकजण स्वतःच्या संसाराचाही स्वर्ग करतात. तर काही जण जीवंतपणेच नरकयातना भोगतात. वस्तुतः स्वर्ग व नरक या दोन्ही गोष्टी काल्पनिक आहेत. त्या अद्याप कुणीही पाहिल्या नाहीत. पण आपल्या पृथ्वीवरच नरकाचा दरवाजा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? होय, पृथ्वीवर नरकाचा दरवाजा असून, तो लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/
आता तुम्ही म्हणाल... हा दरवाजा पृथ्वीवर असेल, तर तो आतापर्यंत आम्हाला कसा माहिती झाला नाही? चला तर मग आज आपण पृथ्वीवरील नरकाच्या दरवाजाची माहिती पाहू...
पृथ्वीवरील नरकाचा दरवाजा तुर्कमेनिस्तानात आहे. अश्गाबात शहरापासून 160 मैल अंतरावरील काराकुम वाळवंटात एक मोठा खड्डा आहे. हा खड्डा जवळपास 230 फूट रुंद आहे. त्यात मागील 50 वर्षांपासून सतत आग धुमसत आहे. त्यामुळे या खड्ड्याला नरकाचे मुख किंवा नरकाचे द्वार असे मानतात. आता तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रपतींनी हा खड्डा लवकरात लवकर बुजवण्याचे आदेश दिलेत. या खड्ड्यातून निघणाऱ्या धुरामुळे वायू प्रदुषणात वाढ होत आहे. त्याचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्यामुळे नरकाचे हे दार बंद केले जात आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/
या खड्ड्यात दुसऱ्या महायुद्धानंतर आग लागली. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियनचे मोठे हाल सुरू झाले. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना तेल व नैसर्गिक वायूची नितांत गरज होती. त्याचवेळी तेथील वाळवंटात उत्खनन सुरू झाले. त्यात नैसर्गिक वायू सापडला. पण कालांतराने तेथील जमीन पाण्याखाली गेली. त्यामुळे तिथे मोठे खड्डे तयार झाले. पुढे सोव्हिएत युनियनचे विघटन झाले आणि तुर्कमेनिस्तान हा स्वतंत्र देश म्हणून अस्तित्त्वात आला.
या खड्ड्यांतून मिथेन वायूची गळती झपाट्याने होत होती. त्यामुळे वातावरणाचे जास्त नुकसान होऊ नये म्हणून या खड्ड्यांना आग लावण्यात आली. या खड्ड्यांतील गॅस संपल्यानंतर ही आग विझेल असे वाटले होते. पण तसे झाले नाही. मागील 50 वर्षांपासूनही ही आग आजही धगधगत आहे. हा एक दावा आहे. त्याचा कोणताही पुरावा नाही. https://bhagyadarshi.blogspot.com/
याविषयी अजून एक दावा केला जातो. तो असा... सोव्हिएत इंजिनिअर्सचा एक समूह अक बुगदे जिल्ह्यात खनिज तेल उत्खननार्थ आला होता. त्यांनी ऑईल रिग सुरू केली, पण जमीन भुसभूशीत निघाली आणि अख्खी रिग जमिनीत धसली. रिग जमिनीच्या पोटात गडप झाली, पण एकही माणूस दगावला नाही. हा चमत्कारच होता. रिग गडप झाली तिथे अर्धे क्रिकेटचे मैदान मावेल एवढा म्हणजे जवळपास 70 टक्के खड्डा तयार झाला. https://bhagyadarshi.blogspot.com/
ऑईल रिग्जमध्ये अशा दुर्घटना घडण्यात कोणतेही नवल नाही. काराकुम वाळवंटात असे एक-दोन अपघात घडले. त्यानंतर हे खड्डे कधी वाळू, तर कधी पाण्याने भरून गेले. पण येथे एक नवाच प्रश्न निर्माण झाला. खड्ड्यामुळे एका वायूसाठ्याचे तोंड उघडले गेले. त्यातून मिथेन हा ज्वलनशिल वायू बाहेर पडू लागला. हे लिकेज असेल ठेवले, तर त्यामुळे काहीतरी मोठे अनुचित घडण्याची भीती होती. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी या ठिकाणी फ्लेयरिंग करण्याचे ठरले.
फ्लेयरिंग म्हणजे वायूचा काही भाग जाळून नष्ट करणे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ही पद्धत वादग्रस्त आहे. पण त्याकाळी ही पद्धत सर्रासपणे रूढ होती. सामान्यतः आठवडाभर फ्लेयरिंग चालू राहते. मग विझते. त्यानुसार तेथील अधिकाऱ्यांनी क्रेटर पेटवला. पण सर्व अंदाज चुकले. हा क्रेटर आजही 50 वर्षांपासून सातत्याने धगधगत आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/
प्रत्येक संकटात काही चांगले शोधणारी माणसे असतात. अमेरिकेतील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (microbiologist) व अंतराळ जैवशास्त्रज्ञ (astrobiologist) यांना अशा वातावरणातील सूक्ष्म जीवांचा अभ्यास करण्याची हुक्की आली. परग्रहांवर कुठे सजीवसृष्टी असेल तर ती कशा प्रकारची असेल याचा अंदाज बांधण्यासाठी त्यांना पृथ्वीवरील असा टोकाच्या वातावरणातील जीवांचा म्हणजे एक्स्ट्रीमोफाईल्सचा अभ्यास करणे गरजेचे वाटले. त्यानुसार यलोस्टोन अर्थात अंटार्टिकासह या क्रेटरमध्येही हा अभ्यास करण्याचे प्रयत्न सुरू झाले. https://bhagyadarshi.blogspot.com/
पण या क्रेटरमध्ये उतरून तेथील मातीचे नमुणे आणणार कोण? असा मोठा प्रश्न उभा राहिला. या ठिकाणी नॅशनल जिओग्राफिक चॅनेल (National Geographic Channel) धावून आले. व्यावसायिक संशोधक असणाऱ्या जॉर्ज कोरोनीस यांनी हे आव्हान स्वीकारले. जॉर्जला वादळे, चक्रीवादळे व ज्वालामुखी अशा विविध संकटांचा सामना करण्याचा चांगला अनुभव होता. त्याने जवळपास 2 वर्षे हे क्रेटर सर करण्याचा सराव केला. क्रेटरमध्ये कोणत्या प्रकारचे अॅल्युमिनिअमचे कपडे घालावेत, कशा प्रकारचा दोरखंड वापरावा यावर बराच काथ्याकूट झाला. सर्व तयारी करूनही जॉर्जला ही मोहीम फत्ते करण्यासाठी केवळ 17 मिनिटांचा वेळ मिळणार होता.
पण जॉर्जने या कालावधीतच आपली मोहीम फत्ते केली. त्याने या नरकाच्या दरवाजाच्या तळाशी जावून माती आणली. या मातीचा अभ्यास केल्यानंतर त्यात काही विरळ बॅक्टेरिया सापडले. यामुळे परग्रहावरील अशा वातावरणात कोणत्या प्रकारची सजीवसृष्टी असेल याचा काहीसा अंदाज संशोधकांना बांधता आला. https://bhagyadarshi.blogspot.com/
आता जाता - जाता पृथ्वीवरील स्वर्गही पाहूया...
इंडोनेशियाची अनेक बेटे आहेत, त्यापैकी एका बेटाला ‘पृथ्वीवरील शेवटचा स्वर्ग’ (लास्ट पॅराडाईज ऑन अर्थ) असे म्हटले जाते. या बेटाचे नाव ‘राजा अम्पत’ असे आहे. हे बेट त्याच्या निसर्गसौंदर्यासाठी ओळखले जाते. याशिवाय तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीसाठीही ते विख्यात आहे.
मॅक्स एम्मर नाक डच माणसाने या बेटाचा शोध लावला. दुसर्या महायुद्धात सैन्यात सहभागी झालेल्या त्याच्या घर मालकाकडून मॅक्सला या बेटाची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने इंडोनेशिया गाठले व या बेटाचा शोध सुरू केला. जवळपास 4 महिने त्याने हे बेट शोधले. यासाठी त्याने स्थानिक मच्छीमारांची मदतही घेतली. अखेर, पश्चिम पापुआ प्रांताजवळ त्याला हे ‘राजा अम्पत’ बेट सापडले. याठिकाणी असलेली थक्क करणारी सागरी जैवविविधता आणि तुलनेने दुर्गम स्थानामुळे लोक राजा अम्पत बेटाला ‘पृथ्वीवरील शेवटचा स्वर्ग’ मानले जाते.
या ब्लॉगची सुरुवात कुठून झाली आणि आपण कुठपर्यंत पोहोचलो. असो, दिवानोंकी यह बाते दिवाने ही जानते है…
https://bhagyadarshi.blogspot.com/
संदर्भ - मायबोली, नॅशनल जिओग्राफिक आदी...
रविवार, १० डिसेंबर, २०२३
पृथ्वी 1 सेकंद थांबली तर.. कधी विचार केलाय?
पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते आणि यामुळे पृथ्वीवर दिवस अन् रात्र होते हे आपल्या सर्वांनाच ठावूक आहे. वसुंधरेच्या या फिरण्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. त्याचा आनंद आपण सर्वजणच घेत असतो. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की, पृथ्वीने क्षणभर आपले फिरणेच बंद केले तर काय होईल? पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर म्हणजे आपल्यावर त्याचा काय परिणाम होईल?... डोक्याला हात लावला ना? चला तर मग जाणून घेऊया, पृथ्वीने 1 सेकंद स्वतःभोवती फिरणे थांबवले तर काय होईल या प्रश्नाचे उत्तर.... https://bhagyadarshi.blogspot.com/
आपला निळा ग्रह अर्थात पृथ्वी आपल्या अक्षावर फिरते. ती 23 तास 56 मिनिटे व 4.1 सेकंदांत स्वतःची प्रदक्षिणा पूर्ण करते. यामुळे पृथ्वीच्या एका भागावर दिवस व दुसऱ्या बाजूला रात्र असते. अमेरिकेचे विख्यात खगोलशास्त्रज्ञ नील डीग्रास टायसन यांनी पृथ्वीने 1 सेकंद फिरणे बंद केले तर काय होईल यावर मार्मिक भाष्य केले आहे.
वेगात धावणाऱ्या कारचा अपघात झाला तर...
टायसन सांगतात की, पृथ्वीने एका सेकंदासाठी आपल्या अक्षावर फिरणे बंद केले तर अत्यंत भयंकर परिस्थिती उत्पन्न होईल. आपण सर्वजण पृथ्वीसोबत पूर्वेकडे ताशी 1674 किलोमीटर वेगाने पुढे जात आहोत. म्हणजे तिच्यासोबत आपणही फिरत आहोत. त्यामुळे पृथ्वीचे 1 सेकंद थांबणे आपल्यासाठी सजीवसृष्टी नष्ट करणारे ठरणार आहे. टायसन याविषयी एका कार अपघाताच्या उदाहरणाद्वारे समजावून सांगतात. ते म्हणतात की, पृथ्वीने क्षणभर स्वतःभोवती फिरणे थांबवले तर वेगाने जाणाऱ्या कारचा अपघात झाल्यासारखी स्थिती उत्पन्न होईल. कारमध्ये बसलेले लोक अपघात झाल्यानंतर जसे झटकन पुढे फेकल्या जातात, तसेच ते सीटवरून वेगाने पुढे फेकले जातील. https://bhagyadarshi.blogspot.com/
एका भागात अंधार दुसऱ्या भागात उजेड
लोक उंच इमारतीतून खाली वेगाने आपटतील. हे दृश्य पाहणे खूपच भयावह असेल. ABC च्या रिपोर्टनुसार, पृथ्वी अचानक थांबली तर आपल्या वसुंधरेचा बहुतांश भाग नष्ट होईल. अर्ध्या पृथ्वीला सतत सूर्याच्या उष्णतेचा सामना करावा लागेल. याऊलट अर्ध्या ग्रहाला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागेल. म्हणजे सूर्याच्या दिशेला असणाऱ्या पृथ्वीच्या एका भागात कायमस्वरुपी दिवस तर सूर्याच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या दुसऱ्या भागात कायमस्वरुपी अंधार असेल. पृथ्वीवर काही भागात कायम सूर्योदय व सूर्यास्थाची स्थिती असेल. काही भागात वर्षभर पाऊस पडेल. तर काही भागात कायमस्वरुपी दुष्काळस्थिती निर्माण होईल, असाही दावा या प्रकरणी केला जातो. https://bhagyadarshi.blogspot.com/
मोठमोठे डोंगर उन्मळून पडतील
पृथ्वीवरील या विचित्र स्थितीचा फटका बाष्पीभवनाच्या प्रक्रियेला बसेल. मानवासह संपूर्ण सजीवसृष्टी संकटात येईल. या स्थितीत नेमके काय होईल? याची कल्पना न केलेली बरी. पृथ्वीने अचानक फिरणे थांबवल्यास वेगवान वादळे निर्माण होतील. मोठ्या व धोकादायक वादळांचा वेग ताशी 200 ते 300 किलोमीटर एवढा असतो. या स्थितीत पृथ्वीने फिरणे थांबवले तर एक भयंकर वादळ निर्माण होईल. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वच वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर उडून जातील. मोठे डोंगरही उन्मळून पडतील. महासागरांचे पाणी संपूर्ण पृथ्वीवर पसरेल. https://bhagyadarshi.blogspot.com/
आता पाहूया पृथ्वीची माहिती...
पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते. त्या क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. या अक्षाला पृथ्वीचा आस असेही म्हणतात. हा आस दक्षिणोत्तर असून, उत्तरेकडे तो साधारणतः ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. समजा तुम्ही ध्रुव ताऱ्यावर जावून पृथ्वीकडे पाहिले, तर ती तुम्हाला घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरताना दिसेल.
पृथ्वी स्वतःभोवती 23 तास 56 मिनिटे व 4.099 सेकंदांत 1 फेरी पूर्ण करते. सूर्याचा संदर्भ घेऊन विचार केला तर पृथ्वी एका दिवसात म्हमजे 24 तासांत ही 1 फेरी पूर्ण करते. हा फरक पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे होतो. दररोज 8,400 (24 तासांचे सेकंद)/365.25 ( एका वर्षातील दिवस) = 3 मिनिटे 56 सेकंद एवढा असतो.
पृथ्वीची उत्पत्ती केव्हा झाली?
पृथ्वीची निर्मिती साधारणतः 457 कोटी वर्षांपूर्वी झाली असावी असे मानले जाते. त्यानंतर 453 कोटी वर्षांपूर्वी तिच्या उपग्रहाने म्हणजे आपल्या चंद्राने पृथ्वीला प्रदक्षिणा घालणे सुरू केले. पृथ्वीचा व्यास 12,753 किलोमीटर एवढा आहे. सूर्यापासूनच तिचे अंतर सामान्यतः 14,95,97,890 किलोमीटर एवढे आहे. पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर सजीवसृष्टी नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे पृथ्वी स्वतः एक मोठे चुंबक आहे. त्यामु्ळे तिच्याभोवती चुंबकीय क्षेत्र आहे. या क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानीकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशाकडे वळले जातात.
तर मग पृथ्वीची इत्यंभूत माहिती जाणून घेताना तुम्हाला पृथ्वी क्षणभर थांबली तर किती भयंकर स्थिती उद्भवेल हे समजले का? हो तर मग उद्या पुन्हा अशाच एका रंजक विषयाची माहिती घेऊया...


.jpeg)




















