Latest Science News Update लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Latest Science News Update लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ११ डिसेंबर, २०२३

तुम्ही नरकाचा दरवाजा पाहिलाय का?

स्वर्ग अन् नरक या दोन ध्रुवांसारख्या 2 टोकांच्या गोष्टी आहेत. स्वर्ग पुण्यवंतांना प्राप्त होणारा आनंदमय लोक, तर नरक म्हणजे पापी माणसांना मिळणारा दुःखमय लोक... स्वर्ग हा ऊर्ध्वलोक म्हणजे पृथ्वीच्या वर आहे. तर नरक हा अधोलोक म्हणजे पृथ्वीच्या खाली आहे. काही धार्मिक परंपरांमध्ये स्वर्ग हे देवांचे वसतिस्थान, तर नरक हे कथित दुष्ट शक्तींचे निवासस्थान मानले जाते. स्वर्ग हा आनंदमय असल्यामुळे प्रकाश हे त्याचे प्रतीक आहे. याऊलट नरक हे काळोखाचे प्रतीक मानले जाते. https://bhagyadarshi.blogspot.com/



स्वर्ग व नरक या दोन्ही अवस्था मृत्यूनंतर पाहता येतात असे मानले जाते. अनेकजण स्वतःच्या संसाराचाही स्वर्ग करतात. तर काही जण जीवंतपणेच नरकयातना भोगतात. वस्तुतः स्वर्ग व नरक या दोन्ही गोष्टी काल्पनिक आहेत. त्या अद्याप कुणीही पाहिल्या नाहीत. पण आपल्या पृथ्वीवरच नरकाचा दरवाजा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? होय, पृथ्वीवर नरकाचा दरवाजा असून, तो लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/

आता तुम्ही म्हणाल... हा दरवाजा पृथ्वीवर असेल, तर तो आतापर्यंत आम्हाला कसा माहिती झाला नाही? चला तर मग आज आपण पृथ्वीवरील नरकाच्या दरवाजाची माहिती पाहू... 



पृथ्वीवरील नरकाचा दरवाजा तुर्कमेनिस्तानात आहे. अश्गाबात शहरापासून 160 मैल अंतरावरील काराकुम वाळवंटात एक मोठा खड्डा आहे. हा खड्डा जवळपास 230 फूट रुंद आहे. त्यात मागील 50 वर्षांपासून सतत आग धुमसत आहे. त्यामुळे या खड्ड्याला नरकाचे मुख किंवा नरकाचे द्वार असे मानतात. आता तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रपतींनी हा खड्डा लवकरात लवकर बुजवण्याचे आदेश दिलेत. या खड्ड्यातून निघणाऱ्या धुरामुळे वायू प्रदुषणात वाढ होत आहे. त्याचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्यामुळे नरकाचे हे दार बंद केले जात आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/

या खड्ड्यात दुसऱ्या महायुद्धानंतर आग लागली. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियनचे मोठे हाल सुरू झाले. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना तेल व नैसर्गिक वायूची नितांत गरज होती. त्याचवेळी तेथील वाळवंटात उत्खनन सुरू झाले. त्यात नैसर्गिक वायू सापडला. पण कालांतराने तेथील जमीन पाण्याखाली गेली. त्यामुळे तिथे मोठे खड्डे तयार झाले. पुढे सोव्हिएत युनियनचे विघटन झाले आणि तुर्कमेनिस्तान हा स्वतंत्र देश म्हणून अस्तित्त्वात आला. 

या खड्ड्यांतून मिथेन वायूची गळती झपाट्याने होत होती. त्यामुळे वातावरणाचे जास्त नुकसान होऊ नये म्हणून या खड्ड्यांना आग लावण्यात आली. या खड्ड्यांतील गॅस संपल्यानंतर ही आग विझेल असे वाटले होते. पण तसे झाले नाही. मागील 50 वर्षांपासूनही ही आग आजही धगधगत आहे. हा एक दावा आहे. त्याचा कोणताही पुरावा नाही. https://bhagyadarshi.blogspot.com/



याविषयी अजून एक दावा केला जातो. तो असा... सोव्हिएत इंजिनिअर्सचा एक समूह अक बुगदे जिल्ह्यात खनिज तेल उत्खननार्थ आला होता. त्यांनी ऑईल रिग सुरू केली, पण जमीन भुसभूशीत निघाली आणि अख्खी रिग जमिनीत धसली. रिग जमिनीच्या पोटात गडप झाली, पण एकही माणूस दगावला नाही. हा चमत्कारच होता. रिग गडप झाली तिथे अर्धे क्रिकेटचे मैदान मावेल एवढा म्हणजे जवळपास 70 टक्के खड्डा तयार झाला. https://bhagyadarshi.blogspot.com/

ऑईल रिग्जमध्ये अशा दुर्घटना घडण्यात कोणतेही नवल नाही. काराकुम वाळवंटात असे एक-दोन अपघात घडले. त्यानंतर हे खड्डे कधी वाळू, तर कधी पाण्याने भरून गेले. पण येथे एक नवाच प्रश्न निर्माण झाला. खड्ड्यामुळे एका वायूसाठ्याचे तोंड उघडले गेले. त्यातून मिथेन हा ज्वलनशिल वायू बाहेर पडू लागला. हे लिकेज असेल ठेवले, तर त्यामुळे काहीतरी मोठे अनुचित घडण्याची भीती होती. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी या ठिकाणी फ्लेयरिंग करण्याचे ठरले. 

फ्लेयरिंग म्हणजे वायूचा काही भाग जाळून नष्ट करणे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ही पद्धत वादग्रस्त आहे. पण त्याकाळी ही पद्धत सर्रासपणे रूढ होती. सामान्यतः आठवडाभर फ्लेयरिंग चालू राहते. मग विझते. त्यानुसार तेथील अधिकाऱ्यांनी क्रेटर पेटवला. पण सर्व अंदाज चुकले. हा क्रेटर आजही 50 वर्षांपासून सातत्याने धगधगत आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/



प्रत्येक संकटात काही चांगले शोधणारी माणसे असतात. अमेरिकेतील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (microbiologist) व अंतराळ जैवशास्त्रज्ञ (astrobiologist) यांना अशा वातावरणातील सूक्ष्म जीवांचा अभ्यास करण्याची हुक्की आली. परग्रहांवर कुठे सजीवसृष्टी असेल तर ती कशा प्रकारची असेल याचा अंदाज बांधण्यासाठी त्यांना पृथ्वीवरील असा टोकाच्या वातावरणातील जीवांचा म्हणजे एक्स्ट्रीमोफाईल्सचा अभ्यास करणे गरजेचे वाटले. त्यानुसार यलोस्टोन अर्थात अंटार्टिकासह या क्रेटरमध्येही हा अभ्यास करण्याचे प्रयत्न सुरू झाले. https://bhagyadarshi.blogspot.com/

पण या क्रेटरमध्ये उतरून तेथील मातीचे नमुणे आणणार कोण? असा मोठा प्रश्न उभा राहिला. या ठिकाणी नॅशनल जिओग्राफिक चॅनेल (National Geographic Channel) धावून आले. व्यावसायिक संशोधक असणाऱ्या जॉर्ज कोरोनीस यांनी हे आव्हान स्वीकारले. जॉर्जला वादळे, चक्रीवादळे व ज्वालामुखी अशा विविध संकटांचा सामना करण्याचा चांगला अनुभव होता. त्याने जवळपास 2 वर्षे हे क्रेटर सर करण्याचा सराव केला. क्रेटरमध्ये कोणत्या प्रकारचे अॅल्युमिनिअमचे कपडे घालावेत, कशा प्रकारचा दोरखंड वापरावा यावर बराच काथ्याकूट झाला. सर्व तयारी करूनही जॉर्जला ही मोहीम फत्ते करण्यासाठी केवळ 17 मिनिटांचा वेळ मिळणार होता. 



पण जॉर्जने या कालावधीतच आपली मोहीम फत्ते केली. त्याने या नरकाच्या दरवाजाच्या तळाशी जावून माती आणली. या मातीचा अभ्यास केल्यानंतर त्यात काही विरळ बॅक्टेरिया सापडले. यामुळे परग्रहावरील अशा वातावरणात कोणत्या प्रकारची सजीवसृष्टी असेल याचा काहीसा अंदाज संशोधकांना बांधता आला. https://bhagyadarshi.blogspot.com/

आता जाता - जाता पृथ्वीवरील स्वर्गही पाहूया...

इंडोनेशियाची अनेक बेटे आहेत, त्यापैकी एका बेटाला ‘पृथ्वीवरील शेवटचा स्वर्ग’ (लास्ट पॅराडाईज ऑन अर्थ) असे म्हटले जाते. या बेटाचे नाव ‘राजा अम्पत’ असे आहे. हे बेट त्याच्या निसर्गसौंदर्यासाठी ओळखले जाते. याशिवाय तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीसाठीही ते विख्यात आहे.



मॅक्स एम्मर नाक डच माणसाने या बेटाचा शोध लावला. दुसर्‍या महायुद्धात सैन्यात सहभागी झालेल्या त्याच्या घर मालकाकडून मॅक्सला या बेटाची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने इंडोनेशिया गाठले व या बेटाचा शोध सुरू केला. जवळपास 4 महिने त्याने हे बेट शोधले. यासाठी त्याने स्थानिक मच्छीमारांची मदतही घेतली. अखेर, पश्‍चिम पापुआ प्रांताजवळ त्याला हे ‘राजा अम्पत’ बेट सापडले. याठिकाणी असलेली थक्‍क करणारी सागरी जैवविविधता आणि तुलनेने दुर्गम स्थानामुळे लोक राजा अम्पत बेटाला ‘पृथ्वीवरील शेवटचा स्वर्ग’ मानले जाते. 

या ब्लॉगची सुरुवात कुठून झाली आणि आपण कुठपर्यंत पोहोचलो. असो, दिवानोंकी यह बाते दिवाने ही जानते है…

https://bhagyadarshi.blogspot.com/

संदर्भ - मायबोली, नॅशनल जिओग्राफिक आदी...

रविवार, १० डिसेंबर, २०२३

पृथ्वी 1 सेकंद थांबली तर.. कधी विचार केलाय?



पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते आणि यामुळे पृथ्वीवर दिवस अन् रात्र होते हे आपल्या सर्वांनाच ठावूक आहे. वसुंधरेच्या या फिरण्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. त्याचा आनंद आपण सर्वजणच घेत असतो. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की, पृथ्वीने क्षणभर आपले फिरणेच बंद केले तर काय होईल? पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर म्हणजे आपल्यावर त्याचा काय परिणाम होईल?... डोक्याला हात लावला ना? चला तर मग जाणून घेऊया, पृथ्वीने 1 सेकंद स्वतःभोवती फिरणे थांबवले तर काय होईल या प्रश्नाचे उत्तर.... https://bhagyadarshi.blogspot.com/

आपला निळा ग्रह अर्थात पृथ्वी आपल्या अक्षावर फिरते. ती 23 तास 56 मिनिटे व 4.1 सेकंदांत स्वतःची प्रदक्षिणा पूर्ण करते. यामुळे पृथ्वीच्या एका भागावर दिवस व दुसऱ्या बाजूला रात्र असते. अमेरिकेचे विख्यात खगोलशास्त्रज्ञ नील डीग्रास टायसन यांनी पृथ्वीने 1 सेकंद फिरणे बंद केले तर काय होईल यावर मार्मिक भाष्य केले आहे.

वेगात धावणाऱ्या कारचा अपघात झाला तर...

टायसन सांगतात की, पृथ्वीने एका सेकंदासाठी आपल्या अक्षावर फिरणे बंद केले तर अत्यंत भयंकर परिस्थिती उत्पन्न होईल. आपण सर्वजण पृथ्वीसोबत पूर्वेकडे ताशी 1674 किलोमीटर वेगाने पुढे जात आहोत. म्हणजे तिच्यासोबत आपणही फिरत आहोत. त्यामुळे पृथ्वीचे 1 सेकंद थांबणे आपल्यासाठी सजीवसृष्टी नष्ट करणारे ठरणार आहे. टायसन याविषयी एका कार अपघाताच्या उदाहरणाद्वारे समजावून सांगतात. ते म्हणतात की, पृथ्वीने क्षणभर स्वतःभोवती फिरणे थांबवले तर वेगाने जाणाऱ्या कारचा अपघात झाल्यासारखी स्थिती उत्पन्न होईल. कारमध्ये बसलेले लोक अपघात झाल्यानंतर जसे झटकन पुढे फेकल्या जातात, तसेच ते सीटवरून वेगाने पुढे फेकले जातील. https://bhagyadarshi.blogspot.com/




एका भागात अंधार दुसऱ्या भागात उजेड 

लोक उंच इमारतीतून खाली वेगाने आपटतील. हे दृश्य पाहणे खूपच भयावह असेल. ABC च्या रिपोर्टनुसार, पृथ्वी अचानक थांबली तर आपल्या वसुंधरेचा बहुतांश भाग नष्ट होईल. अर्ध्या पृथ्वीला सतत सूर्याच्या उष्णतेचा सामना करावा लागेल. याऊलट अर्ध्या ग्रहाला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागेल. म्हणजे सूर्याच्या दिशेला असणाऱ्या पृथ्वीच्या एका भागात कायमस्वरुपी दिवस तर सूर्याच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या दुसऱ्या भागात कायमस्वरुपी अंधार असेल. पृथ्वीवर काही भागात कायम सूर्योदय व सूर्यास्थाची स्थिती असेल. काही भागात वर्षभर पाऊस पडेल. तर काही भागात कायमस्वरुपी दुष्काळस्थिती निर्माण होईल, असाही दावा या प्रकरणी केला जातो. https://bhagyadarshi.blogspot.com/




मोठमोठे डोंगर उन्मळून पडतील 

पृथ्वीवरील या विचित्र स्थितीचा फटका बाष्पीभवनाच्या प्रक्रियेला बसेल. मानवासह संपूर्ण सजीवसृष्टी संकटात येईल. या स्थितीत नेमके काय होईल? याची कल्पना न केलेली बरी. पृथ्वीने अचानक फिरणे थांबवल्यास वेगवान वादळे निर्माण होतील. मोठ्या व धोकादायक वादळांचा वेग ताशी 200 ते 300 किलोमीटर एवढा असतो. या स्थितीत पृथ्वीने फिरणे थांबवले तर एक भयंकर वादळ निर्माण होईल. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वच वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर उडून जातील. मोठे डोंगरही उन्मळून पडतील. महासागरांचे पाणी संपूर्ण पृथ्वीवर पसरेल. https://bhagyadarshi.blogspot.com/

आता पाहूया पृथ्वीची माहिती... 

पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते. त्या क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. या अक्षाला पृथ्वीचा आस असेही म्हणतात. हा आस दक्षिणोत्तर असून, उत्तरेकडे तो साधारणतः ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. समजा तुम्ही ध्रुव ताऱ्यावर जावून पृथ्वीकडे पाहिले, तर ती तुम्हाला घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरताना दिसेल. 

पृथ्वी स्वतःभोवती 23 तास 56 मिनिटे व 4.099 सेकंदांत 1 फेरी पूर्ण करते. सूर्याचा संदर्भ घेऊन विचार केला तर पृथ्वी एका दिवसात म्हमजे 24 तासांत ही 1 फेरी पूर्ण करते. हा फरक पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे होतो. दररोज 8,400 (24 तासांचे सेकंद)/365.25 ( एका वर्षातील दिवस) = 3 मिनिटे 56 सेकंद एवढा असतो. 




पृथ्वीची उत्पत्ती केव्हा झाली?

पृथ्वीची निर्मिती साधारणतः 457 कोटी वर्षांपूर्वी झाली असावी असे मानले जाते. त्यानंतर 453 कोटी वर्षांपूर्वी तिच्या उपग्रहाने म्हणजे आपल्या चंद्राने पृथ्वीला प्रदक्षिणा घालणे सुरू केले. पृथ्वीचा व्यास 12,753 किलोमीटर एवढा आहे. सूर्यापासूनच तिचे अंतर सामान्यतः 14,95,97,890 किलोमीटर एवढे आहे. पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर सजीवसृष्टी नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे पृथ्वी स्वतः एक मोठे चुंबक आहे. त्यामु्ळे तिच्याभोवती चुंबकीय क्षेत्र आहे. या क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानीकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशाकडे वळले जातात. 

तर मग पृथ्वीची इत्यंभूत माहिती जाणून घेताना तुम्हाला पृथ्वी क्षणभर थांबली तर किती भयंकर स्थिती उद्भवेल हे समजले का? हो तर मग उद्या पुन्हा अशाच एका रंजक विषयाची माहिती घेऊया...

 वाचा https://bhagyadarshi.blogspot.com/

'व्हॉयझर-1' एलियन्सनी हायजॅक केले का?

अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाचे 'व्हॉयझर-1' (Voyager 1) अंतराळ यान आपल्या सौर मंडळाच्या बाहेर प्रवास करत आहे. 45 वर्षांपूर्वी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. पण, आता हे यान पृथ्वीवर विचित्र संदेश पाठवत आहे. यामुळे शास्त्रज्ञही हैरान झालेत. 'नासा'ने सांगितले की, 'व्हॉयझर' सुरुळीतपणे काम करत आहे. त्याचा अँटेनाही पृथ्वीच्या दिशेने आहे. पण, तो आता आपल्या ठिकाणापासून एका वेगळ्या प्रकारचा संदेश पाठवत आहे. हा डेटा त्याने आतापर्यंत पाठवलेल्या डेटाशी मेळ खात नाही.'



'व्हॉयझर-1' (Voyager 1) पाठवत असलेला डेटा 'नासा'साठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण, याच डेटापासून त्यांना यानाच्या अँटेनाची दिशा पृथ्वीच्या दिशेने असल्याचे समजते. 

'नासा'च्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या (nasa jet propulsion laboratory) प्रोजेक्ट मॅनेजर सुजैन डॉड म्हणाल्या की, 'व्हॉयझरने असा व्यवहार करणे अत्यंत गूढ गोष्ट आहे. या यानाची AACS यंत्रणा योग्य ती माहिती पाठवत नाही. ही यंत्रणा यानाच्या ठिकाणाची माहिती पाठवण्यासह विविध प्रकारची काम करते. त्यातील एक काम व्हॉयझरचा अँटेना पृथ्वीच्या दिशेने ठेवण्याचे आहे.' त्या पुढे म्हणाल्या -'AACS अजूनही आपले काम करत आहे. पण, तो एरर डेटा पाठवत आहे. ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.'

यापूर्वीही करण्यात आली आहे व्हॉयझरमध्ये दुरुस्ती 

डॉड पुढे म्हणाल्या -'सध्या या कारणामुळे व्हॉयझरमध्ये कोणतीही समस्या दिसून येत नाही. अँटेना सातत्याने सिग्नल पाठवत आहे. म्हणजे तो सुरुळीतपणे काम करत आहे. त्याची दिशाही पृथ्वीच्या दिशेने आहे.' त्या म्हणाल्या -'इंजिनियर या समस्येवरील तोडगा सॉफ्टवेअरमध्ये बदल करुन काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्यात यश आले नाही तर पुढील पर्याय शोधावे लागतील.'

विशेष म्हणजे व्हॉयझरमध्ये बिघाड होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2017 मध्ये त्याच्या थ्रस्टरमध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर दुसरे एक थ्रस्टर तब्बल 37 वर्षांनी सुरू करण्यात आले होते. 

एक संदेश येण्यासाठी लागतात 2 दिवस

'व्हॉयझर-1' 1977 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. त्यानंतर 2012 मध्ये ते आपल्या सौर मंडळातून बाहेर पडले. सध्या ते इंटरस्टेलर अंतराळात प्रवास करत आहे. आपल्या सूर्यमालिकेबाहेर प्रवास करणारी ही मानवनिर्मित पहिलीच वस्तू आहे. सध्या व्हॉयझर पृथ्वीपासून सुमारे 23 अब्ज किलोमीटर दूर आहे. हे अंतर एवढे आहे की 'व्हॉयझर'ने पाठवलेला एक संदेश पृथ्वीपर्यंत येण्यासाठी व येथून त्याच्यापर्यंत संदेश पाठवण्यासाठी तब्बल् 48 तासांचा अवधी लागतो. bhagyadarshi.blogspot.com



केव्हा झाले होते प्रक्षेपण?

व्हॉयझर-1 ((Voyager 1)) आंतरिक्षयान आहे. याचे वजन 722 किलो ग्राम (1590 lb) आहे. ही पृथ्वीपासून सर्वात दूर गेलेली माणसाने निर्माण केलेली वस्तू आहे. दिनांक 5 सप्टेंबर 1977 रोजी व्हॉयझर-1 ((Voyager 1)) या यानाने पृथ्वीवरून उड्डाण केले. सौरमालेचा अभ्यास करण्यासाठी हे यान सोडले गेले आहे. गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून या दूरच्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यानंतर ही यानं आपल्या सौरमालेपलीकडे जातील अशी व्यवस्था करण्यात आली होती. युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांना भेट देणारी हे पहिले यान आहे. bhagyadarshi.blogspot.com

व्हॉयझर-1 ((Voyager 1)) आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वैज्ञानिकांना अपेक्षित असलेल्या कामगिरीच्या कितीतरी पटीने अधिक कामगिरी त्याने पार पाडली आहे. या यानाच्या प्रक्षेपणापूर्वी म्हणजे 20 ऑगस्ट 1977 या दिवशी व्हॉयझर-2 ((Voyager 2) या यानाला अवकाशात पाठविण्यात आले. गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून या दूरच्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी ही अंतराळ यानं सोडण्यात आली होती आणि त्यानंतर ही यानं आपल्या सौरमालेपलीकडे जातील अशी व्यवस्था करण्यात आली होती. या यानाचे आयुष्य 5 वर्षे असेल, असे गृहित धरून या मोहिमेची आखणी झाली होती, पण अतिशय आनंदाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 37 वर्षांनंतरही हे दोन्ही यान उत्तम कामगिरी बजावत आहेत. bhagyadarshi.blogspot.com

सुरुवातीच्या काळात व्हॉयझर्सनी गुरू व शनी हे ग्रह तसेच त्यांच्या उपग्रहांचा सविस्तर अभ्यास केला. युरेनस आणि नेपच्यून या  ग्रहांना भेट देणारी ही पहिलीच याने ठरली. गुरूच्या वातावरणात सतत प्रचंड उलथापालथ  चालू असते. या वातावरणाची विशेषत: गुरूवर असलेल्या भल्या मोठ्या लाल ठिपक्यांचे तपशीलवार फोटो या यानांनी पृथ्वीवर पाठवली. गुरूला अनेक उपग्रह आहेत. आयो हा त्यापैकी एक. या उपग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यावर अनेक जागृत ज्वालामुखी आहेत. त्यांचेही फोटो व्हॉयझर्सनी पाठवली आहेत. शनीला असलेली कडी हा वैज्ञानिकांच्याच नव्हे तर सर्वसामान्यांच्याही कुतूहलाचा विषय. त्या कड्यांचेही सुस्पष्ट फोटो आपल्याला या यानांमुळे उपलब्ध झाली आहेत. bhagyadarshi.blogspot.com




व्हॉयझरच आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यावर ठेवण्यात आलेली एक सोनेरी तबकडी. या तबकडीवर पृथ्वीसंबंधीची बरीच माहिती रेकॉर्ड करून ठेवलेली आहे. पृथ्वीवर नेहमी ऐकू येणारे आवाज उदा. पक्ष्यांचा किलबिलाट, धबधब्याचा किंवा रेल्वेचा आवाज यासह जगातल्या सर्वच प्रमुख भाषांमधून दिलेले शुभेच्छा संदेशही या तबकडीवर आहेत. या भाषांमध्ये हिंदी भाषेचाही समावेश आहे. आपली सौरमाला, त्यातले पृथ्वीचे स्थान याचा नकाशाही या तबकडीवर आहे. हा सगळा मजकूर, छायाचित्रे इ. तयार करण्याचे काम ज्या वैज्ञानिकांनी केले त्यात कार्ल सेगन या प्रसिद्ध खगोल वैज्ञानिकाचा समावेश होता. त्याच्या छोट्या मुलाचे बोबडे बोलही या गोल्डन रेकॉर्डवर आहेत. तो म्हणतो- Hello from the children of planet earth! हा सगळा मजकूर / आवाज व्हॉयझरच्या वेबसाईटवर आपल्याला पाहता / ऐकता येतो. bhagyadarshi.blogspot.com

वैज्ञानिकांना अशी (भाबडी?) आशा आहे की भविष्यात कधीतरी व्हॉयझर यान एखाद्या परग्रहावर उतरेल आणि तेथे असलेले मानव ही तबकडी पाहतील / वाचतील आणि पृथ्वीशी संपर्क साधतील. असे खरेच घडेल की नाही याचे उत्तर अर्थातच काळाच्या उदरात दडलेले आहे. एक मात्र निश्चित की व्हॉयझर यान आता अनंताच्या प्रवासाला निघाली आहेत. bhagyadarshi.blogspot.com