प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी असा काळ येतो, जेंव्हा सगळं काही विस्कटलंय असं वाटतं. प्रयत्न करूनही गोष्टी हातातून निसटतात, आपल्याच लोकांकडून गैरसमज होतात आणि भविष्य धूसर दिसू लागतं. पण माणूस खरंच मजबूत आहे हे सिद्ध होतं ते अशा कठीण क्षणी. कारण अडचण माणसाला मोडत नाही… ती माणसाला घडवते.
आपल्या आसपास बघा, यशस्वी लोकांचं एकच गुपित असतं. ते हरत नाहीत, कितीही उलथापालथ झाली तरी. त्यांच्या आयुष्यातही अडथळे होते, नकार मिळाले, अपयश मिळालं, पण त्यांनी एक गोष्ट कधीच बदलली नाही. ती म्हणजे "मी थांबणार नाही."
समाजात बदल घडवणारे धुरंधरही याच मार्गाने पुढे गेले. अन्याय दिसला म्हणून संताप न करता त्यांनी लढण्याचा मार्ग निवडला. जग सुधारण्यापूर्वी त्यांनी स्वतःला सुधारलं. आणि म्हणूनच त्यांचं नाव काळाच्या पानांवर कोरलं गेलं.
आपल्या रोजच्या आयुष्यातही अनेक छोटे परिवर्तन शक्य आहेत.
• एखाद्याला मदतीचा हात देणे
• चुकीला विरोध करणे
• आपल्या कुटुंबासाठी वेळ काढणे
• स्वतःचा विकास थांबू न देणे
ही लहान कृती एक दिवस मोठा फरक निर्माण करतात.
जीवन नेहमी सरळ रेषेत चालत नाही. पण जेव्हा ढग दाटून येतात, तेव्हा पावसाची चाहूलही लागलेली असते. आपल्याला फक्त एवढंच करायचं असतं. उभं राहायचं, पुन्हा चालायला सुरुवात करायची.
कारण जिंकणं हे नेहमी शेवटी नसतं.
जिंकणं म्हणजे,
पडल्यावर पुन्हा उभं राहणं.
घाबरून न जाता प्रयत्न करत राहणं.
एक दिवस चांगले दिवस येणार यावर विश्वास ठेवणं.
तुमच्यात खूप ताकद आहे. कोण म्हणतं तुम्ही नाही करू शकत?
तुम्हीच स्वतःच्या आयुष्याचे खरे धुरंधर आहात.
फक्त एक पाऊल उचलत राहा, तुम्हाला तुमचे ध्येय स्वतःच भेटत जाईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा