Artificial Intelligence (AI) ने अवघ्या 4 वर्षांत आपले जग बदलून टाकले आहे. कधी तो गणितातील न सुटलेली कोडी सोडवतो, तर कधी आपल्या नोकऱ्या खाण्याच्या मार्गावर येतो. आता Anthropic AI च्या एका संशोधकाने असे म्हणत राजीनामा दिला आहे की, AI येत्या 10 वर्षांत समस्त मनुष्यजातीचा नाश करू शकतो. या दाव्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. AI च्या आंधळ्या शर्यतीत सावधगिरीकडे दुर्लक्ष केले जात आहे का? असा प्रश्न यासंबंधी उपस्थित केला जात आहे.
AI च्या धोक्याचा हिशेब
जॅकब कॉक्सन (Jacob Coxon) हे Anthropic (Claude) मध्ये रिसर्चचे काम करत होते. ही कंपनी दावा करते की, आम्ही OpenAI (ChatGPT) च्या तुलनेत जास्त जबाबदार आहोत. तर Claude तयार करणाऱ्या डारियो अमोडेई यांनी OpenAI ला ते पैसे कमवण्यासाठी घाई करत असल्याचा आरोप करत सोडले होते.
जॅकब यांनीही OpenAI मध्ये काम केले आहे. त्यानी गत आठवड्यात Anthropic चा राजीनामा दिला. त्यांचा आरोप आहे की, AI वर काम करणाऱ्या कंपन्या मानवतेवरील संभाव्य धोक्याविषयी फार गंभीर नाहीत.
जॅकब यांच्या भीतीवर Anthropic चे CEO तथा संस्थापक डारिओ अमोडेई (Dario Amodei) यांनीही एकप्रकारे शिक्कामोर्तबच केले आहे. त्यांनी जॅकब यांच्या आरोपांना थेट उत्तर दिले नाही. पण त्यांनी AI च्या धोक्यावर एक ब्लॉग लिहिला आहे. त्यांनी AI कंपन्यांना विकासाचे काम संथ करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, AI चा धोका पाहता सुरक्षा व्यवस्था चोख केली पाहिजे. अन्यथा 6 ते 12 महिन्यांत एआय एजंट्सचा समूह संपूर्ण इंटरनेट ठप्प करण्याची ताकद ठेवू शकतो.
OpenAI चे संस्थापक सॅम ऑल्टमन व xAI चे संस्थापक एलन मस्क यांनी डारिओ यांचे समर्थन केले आहे.
उत्तर येमेनमध्ये क्षेपणास्त्र तयार करण्याचा प्रयत्न
डारिओ यांच्या ब्लॉगपूर्वी Anthropic चा एक सुरक्षा अहवालही आला होता. या अहवालात Claude AI चा गैरवापर करण्याचा प्रयत्न कसा व कुठे करण्यात आला हे सांगण्यात आले होते.
उत्तर येमेनमध्ये Claude च्या मदतीने चक्क क्षेपणास्त्र तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Claude च्या मदतीने Bio Weapon अर्थात जैविक शस्त्र तयार करण्याचाही प्रयत्न झाला. त्यात चिकनगुनिया व एव्हियन एन्फ्लूएंझा विषाणूंशी छेडछाड करण्यात आली होती. त्यामुळे एआयचा वापर रोग पसरवण्यासाठीही केला जाऊ शकतो.
म्हणजेच मानवतेचा विनाश घडवून आणण्याच्या प्रयत्नांत एआयची मदत घेण्यात आल्याचे स्पष्ट पुरावे मिळाले आहेत.
Bio Weapon तयार करून मानवजातीचा विनाश
जॅकब ज्या धोक्याबद्दल बोलत आहेत तो हा नाही. सध्या तर माणूस एआयचा वापर करून धोके निर्माण करत आहे, पण एआय आपल्यापेक्षा वेगाने पुढे गेला तर काय होईल? सध्या तो आपल्या सूचनेनुसार काम करत आहे, पण सोबतच तो स्वतःही शिकत आहे. जेव्हा तो आपल्या नियंत्रणाबाहेर जाईल, तेव्हा दोन प्रकारचे धोके निर्माण होतील अशी चर्चा आहे.
एआय स्वतः Bio Weapon तयार करून आपल्याला संपवू शकतो. म्हणजे एखादा विषाणू तयार करून त्याचा जगभरात प्रसार करू शकतो.
दुसरा धोका असा आहे की, एआय आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आहे. वीजपुरवठा असो, विमानतळ असो, रेल्वे किंवा लष्कर असो. या क्षेत्रांतही एआय मोठा विध्वंस घडवून आणू शकतो. सर्वांना या धोक्यांची कल्पना आहे. पण या शर्यतीत कुणाचीही मागे राहण्याची इच्छा नाही.
एक शर्यत अमेरिका व चीनमध्ये सुरू आहे. दुसरी शर्यत Bio Weapon व Anthropic सारख्या अमेरिकन कंपन्यांमध्ये सुरू आहे. या कंपन्या IPO आणण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेचे सरकारही कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मनःस्थितीत नाही. कारण, चीन अमेरिकेपुढे जाण्याची भीती आहे.
या एकमेकांना धोबीपछाड देण्याच्या शर्यतीमुळे जग संकटात सापडू शकते आणि ही गोष्ट आता डारिओ स्वतःच सांगत आहेत.
संपूर्ण लेख एका ग्राफिकमध्ये
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा