रविवार, १४ डिसेंबर, २०२५
आपण गप्प बसणार की बोलणार?
आपल्या समाजात एक धोकादायक सवय हळूहळू खोलवर रुजत चालली आहे, ती म्हणजे मौन. अन्याय दिसतो, वेदना ऐकू येतात, पण आवाज उमटत नाही. अन्याय अचानक घडत नाही, तो आपल्या गप्प बसण्यामुळे रोज थोडाथोडा वाढत जातो. त्यामुळे मौन हे फक्त शांतता नसते, ते अनेकदा अन्यायाला मिळालेलं मूक समर्थन असतं.
भूत असतात का?
भूत असतात का? हा प्रश्न शतकानुशतके मानवाला सतावतो आहे. जगभरातील संस्कृतींमध्ये भूतांच्या दंतकथा व कथित अनुभव सांगितले जातात. भारतात तर भूत-प्रेतांच्या दंतकथांचा अक्षरशः खच पडलेला आहे. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून याकडे कसे पहावे? हे आपण यातून समजून घेऊया...
स्पेसएक्सची रेड प्लॅनेट सिटी अर्थात 'मंगळ सिटी '
नमस्कार!
स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांनी मंगळ ग्रहावर मानवी वसाहत स्थापन करणे हे आपल्या कंपनीचे मुख्य उद्दीष्ट बनवले आहे. चालू महिन्यापर्यंतच्या माहितीनुसार, स्पेसएक्सची योजना आता अधिक स्पष्ट आणि महत्वाकांक्षी झाली आहे. स्टारशिप हे पूर्णपणे पुनर्वापरयोग्य रॉकेट या योजनेचे केंद्रबिंदू आहे. मस्कच्या मते, मानवजात मल्टिप्लॅनेटरी (multiplanetary) होण्यासाठी मंगळावर स्वयंनिर्भर शहर उभे करणे आवश्यक आहे. हे प्रत्यक्षात आले तर पृथ्वीवर काही आपत्ती आली तरी मानवजात टिकून राहील. या लेखात आपण स्पेसएक्सच्या मंगळ योजनेची तपशीलवार माहिती घेऊया...
सोमवार, ८ डिसेंबर, २०२५
इंडिगो आज… उद्या जिओ - एअरटेल?
इंडिगो एअरलाइन्सने गत काही महिन्यांत तिकिटांचे दर वाढवले, कॅन्सलेशन चार्जेस वाढवले, बॅगेज नियम कडक केले, तरीही ६५% पेक्षा जास्त मार्केट शेअर त्यांच्याकडेच राहिला. कारण? विमान क्षेत्रातील स्पर्धा जवळपास संपल्यात जमा आहे. स्पाइसजेट दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, GoFirst बंद पडली, Vistara-Air India एकत्र होऊनही अद्याप चाचपडतच आहे. परिणामी इंडिगोची धारणा “आपण राजे” अशी झाली आणि ग्राहकांच्या खिशावर थेट डाका पडू लागला.
आता याच गोष्टीचा विचार टेलिकॉम क्षेत्रात करा.
रविवार, ७ डिसेंबर, २०२५
आरोग्य : खरं धन, खरं जीवन
“पहिलं सुख तें जन्माचें दुसरं सुख निरोगी काया”
इतिहासाची पहिली नोंद कोणती?
जगातील पहिला इतिहासलेख कोणता?
पण खरे उत्तर आहे, ई.स.पू. ३१०० च्या सुमारास, म्हणजे आजपासून सुमारे ५१२५ वर्षांपूर्वी, इजिप्तमधील हायराकॉनपोलिस येथे सापडलेला एक सिल्टस्टोनचा तुकडा – नार्मर पॅलेट!
आयुष्य म्हणजे एक अनियंत्रित नदी
आयुष्य म्हणजे एक अनियंत्रित नदी. कधी शांत सपाट वाहते, तर कधी खडकांवर आदळून तीव्र वेगाने पुढे धावते. कधी आपण तिच्या प्रवाहात सहज तरंगतो, तर कधी तिच्या लाटांशी झुंज देताना श्वास गुदमरतो. चढउतार हे आयुष्याचे खरे स्वरूप आहे. हे चढउतार तेव्हाच जाणवतात जेव्हा आपण खोल खोल दरीतून वर येतो आणि मग अचानक समोर उंच शिखर दिसते. तिथे पोहोचल्यावर मागे वळून बघितले की लक्षात येते की, खाली पडल्याशिवाय वर चढता येत नाही.
बुधवार, ३ डिसेंबर, २०२५
दिमाखदार देवगिरी!
दख्खनच्या पठाराच्या उंच डोंगरावर दिमाखात उभा असलेला दौलताबाद किल्ला महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. पूर्वी हा किल्ला देवगिरी म्हणून ओळखला जात होता. हा अजिंक्य किल्ला केवळ एक तटबंदी नसून, तो युद्धकौशल्य आणि रणनीतीच्या अद्वितीयतेचे प्रतीक आहे. या किल्ल्याने आतापर्यंत अनेक लढाया, विश्वासघात आणि विजयाचे प्रसंग अनुभवलेत.

.jpg)

