कल्पना करा, तुम्ही समुद्रकिनारी उभे आहात. समोर निळाशार अथांग समुद्र पसरलेला आहे. लाटांवर सूर्यकिरण चमकत आहेत, वारा चेहऱ्यावर येऊन अलगद स्पर्श करत आहे आणि समुद्राचा अखंड गुंजणारा आवाज कानात भरत आहे. इतक्यात कुणीतरी तुम्हाला सहज विचारतो, "या समुद्राचे वय किती असेल?" तुम्ही कदाचित म्हणाल, "पृथ्वीएवढेच." कारण पाणी म्हणजे पृथ्वीचाच भाग, असे आपण लहानपणापासून मानत आलो आहोत. पण जर विज्ञानाने सांगितले की या समुद्रातील पाण्याचा इतिहास पृथ्वीपेक्षाही जुना असू शकतो, तर? हा दावा ऐकून कुणीही थोडा थबकेल. मात्र हाच प्रश्न आज खगोलशास्त्रज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ यांना अनेक दशकांपासून खुणावत आहे. Earth, Origin of Water
Early Earth लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
Early Earth लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सोमवार, २० जुलै, २०२६
शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५
पृथ्वीच्या पोटात लपलेल्या पाण्याचे रहस्य!
आपण आपल्या पृथ्वीला निळा ग्रह म्हणतो. ही वसुंधरा महासागरांनी वेढलेली आहे. पण 4.6 अब्ज वर्षांपूर्वीची पृथ्वी आजच्या सारखी शांत व जीवनदायी नव्हती. त्या काळातील पृथ्वी पूर्णपणे वितळलेली होती. सर्वत्र अग्नी, ज्वालामुखी व उष्णतेचे साम्राज्य होते. ग्रह सतत उल्कावर्षावाने झोडपला जात होता. या स्थितीत पृथ्वीवर पाणी टिकणे अशक्य आहे, असे आजपर्यंत शास्त्रज्ञ मानत होते. पाणी असेलच तर ते वाफ बनून अंतराळात निघून गेले असावे, असा जुना समज होता. पण एका नव्या संशोधनामुळे हा समज बऱ्यापैकी चुकीचा ठरला आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
