भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

एकेकाळी जर्मनीत प्रत्येक घर हिटलरचे मंदिर होते



जर्मनीत एक काळ असा होता, जेव्हा हिटलरची लोकप्रियता कळसाला पोहोचली होते. तिथे हर घर, हिटलरचे मंदिर झाले होते. राष्ट्रवादाच्या या उत्सवाच्या काळात प्रत्येक घर नाझी विचारधाराने रंगले गेले होते. राजकारण घरांच्या भीतींपर्यंत पोहोचले होते. 


प्रत्येक घरात स्वस्तिकचा झेंडा लावला जात होता. सकाळी उठताच मुले हिटलर यूथ व बालिका लिगमध्ये सहभागी होऊन हिटलरचा नारा देत होते. महिला घर सजवत, तर घराच्या भिंतींवर हिटलरचे मोठे पोस्टर होते. टेबलावर एकतरी नाझी प्रतीक असायचे. रेडिओवर सुमधूर गाणे सुरू असताना मध्येच गोबेल्सचे प्रचार गीत लागत. 

कुटुंब एकत्र येऊन हिटलरची प्रशंसा करणारे गीत गात. मुले शाळेतून हिटलरचे कौतुक असणारी पुस्तके घेऊन येत. स्वयंपाकघरात आई गल्लीतील नाझी दलाच्या बैठकीची तयारी करत असे. वाढदिवस किंवा सणावारांच्या दिवशी हिटलरला समर्पित कार्ड वाटले जात. हिटलरच्या जयंतीला राष्ट्रीय सुट्टी होती.

  

'ट्रायम्फ ऑफ द विल' सारख्या प्रचार चित्रपटांनी त्याला हिरो बनवले होते. 1936 च्या बर्लिन ऑलिम्पिकवेळी ही भावना टोकाला पोहोचली होती. हिटलरला जर्मनाचा उद्धारकर्ता मानले जात होते. मुले खेळण्याच्या जागी नाझी यूनिफॉर्म घालत. नाझीवाद दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला होता. सरकार आपल्या प्रत्येक निर्णयातून त्याला हवा देत होते.  

नाझी पक्षाचा उदय झाला तेव्हा तो एक सर्वसामान्य पक्ष होता. त्याला केव्हाच बहुमत मिळाले नाही. हिटलर अल्पमताचे युती सरकार चालवून चॅन्सलर बनला. त्यानंतर संपूर्ण जर्मनी त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या रंगात रंगून गेली. 

चित्रपट, पोस्टर व वृत्तपत्रे त्याला देवरूपात दाखवत होते. घरांमध्ये मीन काम्फच्या प्रती ठेवल्या जात होत्या. पक्षाचे सदस्यत्व अनिवार्य झाल्यासारखे झाले होते. 1939 पर्यंत नाझी हा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा केला जात होता. त्याचे 50 लाखांहून अधिक सदस्य होते. कौटुंबिक समारंभातही नाझी थीम वापरली जात होती. ख्रिसमसला स्वस्तिकने सजलेले वृक्ष, ईस्टरला हिटलरचे पोस्टर लागत. मुले हिटलर यूथ कॅम्प किंवा समजा शाखेत जात. तिथे राष्ट्रवाद शिकवला जात होता. अधिक मुले जन्माला घालणाऱ्या महिलांना मदर क्रॉस मिळे.


वडील नाझी शाखेतून परतल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला त्यांचा हेवा वाटे. हे समर्थन ऐच्छिकही होते आणि त्यावर दबाव व प्रचाराचे आवरणही होते. द्वेषाने यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जनतेने यहुद्यांवर बहिष्कार टाकण्यात चढाओढीने सहभाग घेतला. काहींनी आपल्या शेजाऱ्यांचेही पत्ते दिले. यात त्यांच्या काही कामांचाही परिणाम होता. 

1933 साली हिटलर सत्तेत आल्यानंतर बेरोजगारी दर 60 लाखांहून घसरून 1938 पर्यंत जवळपास शून्य झाला होता. ऑटोमोबाइल, शस्त्रास्त्रांचे कारखाने व सार्वजनिक कारखान्यांत भरमसाठ रोजगार मिळाला. सर्वसामान्य जनता समृद्ध झाली. महिला त्याला वडिलांसारखे मानत. राइनलँडवर ताबा, ऑस्ट्रियाच्या विलिनिकरणाने जर्मन अभिमानाला हवा दिली. राष्ट्र गौरव वाढला. सर्वेक्षणांत, कदाचित ते नियंत्रित होते, त्याला 99 टक्के पाठिंबा दिसून येत होता. लोकप्रियता एवढी की विरोधक गायब झाले किंवा करवले गेले. 

हिटलर हाच जर्मनी व जर्मनी हीच हिटलर होती.  

नाझी सभा म्हणजे एक विशाल उत्सव होता. न्यूरेम्बर्गच्या सभेत 5 लाखांहून अधिक लोक जमा झाले. सकाळपासून रांग लागत होती आणि रेल्वे व बस भरभरून लोक येत होते. तिकीट लागत नव्हते. हिटलरचे भाषण ऐकण्यासाठी ते अनेक तास वाट पाहत होते. मुले व महिला हिटलर यूथ परेडवर फुले उधळत होत्या. 1936 च्या रॅलीत तर 100 किलोमीटर लांब रांग लागली होती. लोक रात्रभर जागत, नारे देत असा सामूहिक उन्माद होता. 

युद्धाच्या सुरुवातीला पोलंडवरील आक्रमणावेळी उत्साह टोकाला पोहोचला. लोक रेडिओवर यु्द्धकथा ऐकून नाचत होते. फ्रान्स विजयानंतर घरोघरी उत्सव साजरा झाला. मुले सैनिक बनण्यास उत्सुक होते. प्रत्येक घरातून 2 जण हिटलरचा गणवेश घालून सीमेवर जाण्यास तयार होते. 

पण 1941 च्या सोव्हियत हल्ल्यानंतर परिस्थिती बदलली. 1943 च्या स्टॅलिनग्रादच्या पराभवामुळे स्थिती अधिकच गंभीर बनली. बॉम्बवर्षावामुळे शहरे उद्ध्वस्त होऊ लागली. हॅम्बर्ग, ड्रेसडेनमध्ये लाखो लोकांचा बळी गेला. घरोघरी उपासमार सुरू झाली. आता लोक बोलत होते, हा वेडेपणा आहे. पण काळ आपले काम करतोच. जर्मनीच्या नशेचा एककलमी उपचार सुरू झाला होता. 1944 पर्यंत थर्ड राइख उद्ध्वस्त झाले होते. संपूर्ण देशाची स्थिती एखाद्या पडलेल्या वाड्यासारखी झाली होती. 

महिला भाकरीसाठी आपल्या अब्रुचा सौदा करत होत्या. 

रस्त्यावर परदेशी बूटांचा टाप-टाप असा आवाज येत होता. रशियामध्ये नाझींनी एवढे अत्याचार केले होते की, रशियन रशियाचा नव्हे तर अमेरिकेचा धावा करत होते. अखेर ईश्वराने त्यांचे ऐकले. त्यानंतर बर्लिनमध्ये हत्या, बलात्कार व लुटालुटीचा कहर माजला. इतिहास त्यावर मौन आहे. जर्मनही आज त्यावर फार काही बोलत नाहीत. 

30 एप्रिल 1945 रोजी हिटलरने उद्ध्वस्त जर्मनीला अर्धमेल्या अवस्थेत सोडून या जगाचा निरोप घेतला. बरबाद जर्मनीने 7 मे 1945 रोजी बिनशर्त आत्मसमर्पम केले. न्यूरेम्बर्ग ट्रायल्समध्ये नाझीच्या सर्वच मोठ्या नेत्यांना सूळावर चढवण्यात आले. ज्या घरांत हिटलरचा उत्सव साजरा केला जात होता, ती घरे आता ओसाड बनली होती. 60 लाख यहुदी व 50 लाख जर्मन मारले गेले. राष्ट्रवादाचे स्वप्न होलोकॉस्ट व विनाशात बदलले. 

लोक पश्चाताप करत होते. पण फार उशीर झाला होता. या नाझीवादाच्या उत्सवाचा अंत युद्ध, मृत्यू व पतन आणि अखेरीस देशाच्या 2 भागांत विभाजनाने झाला. 

त्यामुळे वर आपले घर तोरण लावून सजवणाऱ्या त्या महिलेने स्वप्नातही विचारही केला नसेल की ती आपला मृत्यू व आपल्या फुटक्या नशिबाचा आनंदोत्सव साजरा करत आहे. 


0+ WhatsApp Great

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा