भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५

आत्ता कॅन्सर काही दिवसांचाच पाहुणा; रशियन लस ठरणार गेम चेंजर



कॅन्सर सद्यस्थितीत जगातील एक भयंकर आजार आहे. दरवर्षी जगभरात लाखो लोक या रोगाला बळी पडतात. केमोथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रियांसारख्या पारंपरिक पद्धतींचा या आजारावर वापर होतो. या उपचारांमुळे रुग्णांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. अनेकदा रुग्ण पूर्णपणा बरा होण्याची शक्यताही कमी असते. पण आता, रशियाने विकसित केलेली एक नवीन लस ही स्थिती पूर्णपणे बदलू शकते. 'एंटरोमिक्स' (Enteromix) नामक ही लस mRNA तंत्रज्ञानावर आधारित आहे. ती कॅन्सर सेल्सची ओळख पटवून रोगप्रतिकारशक्तीला प्रशिक्षित करते. 2025 मध्ये सुरू झालेल्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये ही लस 100% प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या लेखाद्वारे आपण पाहू ही लस कॅन्सरविरोधात कशी गेम चेंजर ठरेल याचा लेखाजोखा... 


रशियाची कॅन्सर लस : विकास आणि वैज्ञानिक पार्श्वभूमी

रशियातील राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन रेडिओलॉजिकल केंद्र (National Medical Research Radiological Centre) आणि एंगेलहार्ट इन्स्टिट्यूट ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी यांनी संयुक्तपणे ही लस तयार केली आहे. ती  COVID-19 लसीच्या mRNA तंत्रज्ञानावर आधारित आहे. mRNA ही एक प्रकारची जनुकीय सामग्री आहे जी शरीराच्या पेशींना विशिष्ट प्रोटीन तयार करण्याचे आदेश देते. कॅन्सर लसीत, ही mRNA रुग्णाच्या ट्यूमरच्या अनोख्या जनुकीय माहितीवर आधारित तयार केली जाते. जेव्हा ही लस इंजेक्शनद्वारे दिली जाते, तेव्हा ती रोगप्रतिकारशक्तीला कॅन्सर सेल्सचे विशिष्ट 'मार्क्स' ओळखण्यास शिकवते, ज्यामुळे शरीर स्वतःच कॅन्सर सेल्सवर हल्ला करू लागते.  

2025 च्या सुरुवातीला प्री-क्लिनिकल ट्रायल्समध्ये ही लस ट्यूमर ग्रोथ 60-80% ने कमी करत असल्याचे दिसले. सप्टेंबर 2025 मध्ये, 48 स्वयंसेवकांवर झालेल्या फेज-1 क्लिनिकल ट्रायल्समध्ये तिने 100% परिणामकारकता आणि 0 गंभीर साइड इफेक्ट्स दाखवले. रशियाच्या फेडरल मेडिकल आणि बायोलॉजिकल एजन्सीच्या प्रमुख व्हेरॉनिका स्क्वॉर्ट्सोव्हा यांनी ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये सांगितले की, ही लस आता क्लिनिकल वापरासाठी तयार आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. ही लस वैयक्तिकृत (पर्सनलाइज्ड) आहे, म्हणजे प्रत्येक रुग्णाच्या ट्यूमरच्या जनुकीय प्रोफाइलनुसार ती तयार केली जाते. यासाठी AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर केला जातो. ही लस रशियाच्या गॅमालेया सेंटरसारख्या संस्थांच्या वर्षानुवर्षांच्या संशोधनाचे फलित आहे. 

एंटरोमिक्स का वेगळी आहे?

सध्या कॅन्सरचे उपचार मुख्यतः शस्त्रक्रिया, केमोथेरपी व रेडिएशन यावर अवलंबून आहेत. केमोथेरपीमध्ये ट्यूमर सेल्ससह निरोगी पेशींनाही हानी पोहोचते. त्यामुळे रुग्णांना थकवा, केस गळणे, उलट्या आणि इम्युन सिस्टम कमकुवत होण्यासारख्या गंभीर दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.  रेडिएशनही तसेच असते. रेडिएशन कॅन्सर सेल्सला मारते, पण निरोगी ऊतींना नुकसान पोहोचवते. कॅन्सर शरीरात सर्वत्र पसरलेला असतो तेव्हा शस्त्रस्क्रिया शक्य नसते. 

याउलट, एंटरोमिक्स सारखी mRNA लस 'इम्युनोथेरपी' आहे. ती शरीराच्या स्वतःच्या रोगप्रतिकारशक्तीला सक्रिय करते, ज्यामुळे कॅन्सर सेल्सवर अचूक हल्ला होतो आणि निरोगी पेशींना धक्का पोहोचत नाही. ट्रायल्समध्ये दिसले की, ट्यूमरच्या आकारात 60-80% ने घट झाली, आणि मेटास्टेसिस (कॅन्सरचा प्रसार) थांबला. साइड इफेक्ट्स फार सौम्य होते, जसे की इंजेक्शनच्या ठिकाणी सूज येणे. पारंपरिक उपचारांमध्ये 5 वर्षांच्या सरवायव्हल रेट (उपचारानंतर जगण्याची टक्केवारी) कोलोरेक्टल कॅन्सरसाठी 65% असते. पण ही लस सरवायव्हल रेट वाढवू शकते आणि जीवनाची गुणवत्ता वाढवू शकते. ही लस रुग्णाला वारंवार दिली जाऊ शकते. ती शरीराच्या DNA संरचनेत कोणताही बदल करत नाही. एंटरोमिक्स लस केमोथेरपीला पर्याय म्हणूनही वापरली जाऊ शकते. 

गेम चेंजर कशी? वैज्ञानिक आणि वैद्यकीय प्रभाव

ही लस कॅन्सरच्या उपचार क्षेत्रात गेम चेंजर ठरण्याची अनेक कारणे आहेत. कारण, ही लस प्रत्येक रुग्णाच्या ट्यूमरच्या म्युटेशन्सनुसार तयार केली जाते. त्यामुळे सामान्य लसींपेक्षा 30-50 टक्के जास्त प्रभावी होऊ शकते. AI च्या मदतीने ही प्रक्रिया तासाभरात पूर्ण होते. यामुळे रुग्णावर वेळीच उपचार सुरू होण्यास मदत होते. ही लस बहुविध कॅन्सरसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही लस केवळ कोलोरेक्टल कॅन्सरसाठी तयार केली गेली. पण आता ग्लियोब्लास्टोमा (मेंदूचा कॅन्सर) आणि मेलानोमा (त्वचेचा कॅन्सर) साठीही ही लस तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तिच्या ट्रायल्समध्ये 100% यश दिसले. त्यामुळे ही लस एक 'ब्रेकथ्रू थेरपी' ठरण्याची शक्यता आहे. 

वैद्यकीयदृष्ट्या, एंटरोमिक्स लस कॅन्सरला 'क्रॉनिक डिसीज' सारखे बनवू शकते. म्हणजे कॅन्सरवर दिर्घकाळापर्यंत नियंत्रण ठेवता येते. या लसीवर अत्यंत कमी खर्च येण्याची शक्यता आहे. एक डोस तयार करण्यासाठी 3 लाख रुबल्स अर्थात 35 हजार रुपये खर्च येऊ शकतो. पण रशियात ती मोफत दिली जाईल. रशिया ही लस जगभरातील देशांना उपलब्ध करून देणार आहे. तज्ज्ञांच्या मते, ही लस कॅन्सरच्या मृत्यूदरात 20-30%, तर उपचारांचा खर्चा 50 टक्क्यांनी कमी करू शकते. 

जागतिक प्रभाव आणि आव्हाने

रशियाची ही लस जागतिक आरोग्य व्यवस्थेसाठी क्रांती घडवेल. व्हिएतनामसारख्या देशांनी यापूर्वीच ही लस आयात करण्याची तयारी दर्शवली आहे. भारतासारख्या देशांसाठी ती लाभदायी ठरेल. WHO च्या अंदाजानुसार, 2050 पर्यंत कॅन्सरचे रुग्ण 77% नी वाढतील, पण अशा लसीमुळे त्याला पायबंद घालता येईल. रशियाच्या FMBA च्या माहितीनुसार, ही लस 2025 च्या अखेरीस उपलब्ध होईल.

दरम्यान, रशियाची कॅन्सर लस ही केवळ वैज्ञानिक यश नाही, तर आशेचा एक किरण आहे. तिच्या वैयक्तिकृत, सुरक्षित आणि स्वस्त स्वरूपामुळे ती कॅन्सरला पराभूत करण्याचा नवा मार्ग उघडेल. लाखो रुग्णांसाठी ती जीवनरक्षक ठरेल, आणि जागतिक आरोग्य क्षेत्रात एक नवे युग सुरू करेल. आता गरज आहे की, हे संशोधन सर्व देशांपर्यंत पोहोचवण्याची आणि कॅन्सर हा आजार इतिहासाने पान बनवण्याची... 

0+ WhatsApp Great

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा