Treaty of Versailles लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Treaty of Versailles लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १४ जुलै, २०२६

दुसरे महायुद्ध का झाले?


पहिल्या महायुद्धाचा (1914 -1918) शेवट झाल्यानंतर जगातील लोकांना पुन्हा कधीही अशा भीषण युद्धाचा सामना करावा लागू नये, अशी अपेक्षा होती. पण अवघ्या 20 वर्षांतच जग पुन्हा एकदा विनाशकारी संघर्षाच्या खाईत कसे ढकलले गेले? दुसरे महायुद्ध (1939-1945) का झाले? हा प्रश्न इतिहासातील सर्वांत महत्त्वाच्या प्रश्नांपैकी एक मानला जातो. 

पहिले महायुद्ध -एका गोळीने नव्हे, तर अनेक घटनांनी पेटलेले युद्ध!


28 July 1914 रोजी ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियाविरुद्ध युद्ध घोषित केले आणि पहिल्या महायुद्धाची औपचारिक सुरुवात झाली. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये या युद्धाची सुरुवात एका घटनेशी जोडली जाते, परंतु प्रत्यक्षात हा संघर्ष एका दिवसात किंवा एका गोळीमुळे निर्माण झाला नव्हता. जवळपास 40 वर्षे युरोपमध्ये राजकीय स्पर्धा, साम्राज्य विस्तार, राष्ट्रवाद, लष्करी स्पर्धा आणि परस्पर अविश्वास सतत वाढत होता. या सर्व घटकांनी मिळून अशी परिस्थिती निर्माण केली होती की, एखादी छोटी घटना घडली तरी संपूर्ण खंड युद्धाच्या ज्वाळांत सापडणार हे जवळपास निश्चित झाले होते. त्यामुळे पहिले महायुद्ध समजून घ्यायचे असेल, तर त्याआधीचा युरोप समजून घेणे आवश्यक आहे. लेख थोडा मोठा आहे, पण घटना वाचणे अनिवार्य आहेत. World War I