Indian Freedom Fighter लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Indian Freedom Fighter लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६

'गुमनाबी बाबा'च नेताजी होते का? रहस्य काय?


 18 ऑगस्ट 1945. तैहोकू, फॉर्मोसा.

दुसरे महायुद्ध संपण्याच्या मार्गावर होते. जपान पराभूत झाला होता. ब्रिटिश साम्राज्य अजूनही भारतावर राज्य करत होते. याचवेळी एक बातमी वाऱ्यासारखी पसरली. भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरोधात सशस्त्र लढा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.

बातमी धक्कादायक होती. पण त्याहून मोठे रहस्य भविष्यात उदरात दडले होते. नेताजींचे पार्थिव भारतात आले नाही. त्यांच्या मृत्यूचे पुरावे सर्वमान्य होतील अशा पद्धतीने केव्हाच समोर आले नाही. त्यामुळे काही वर्षांनी नेताजी जिवंत असल्याच्या कथा सुरू झाल्या. त्यामुळे आजही नेताजींचा मृत्यू नेमका कसा झाला? हा प्रश्न उपस्थित केला जातो. Netaji Subhas Chandra Bose, Netaji Plane Crash,