Frankfurt Hot Club लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Frankfurt Hot Club लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२६

बंडखोर सूर - Frankfurt Hot Club ची कहाणी


फ्रँकफर्टमधील एका छोट्याशा जागेत रात्री उशिरापर्यंत जॅझचे सूर घुमत होते. बाहेर युद्धाचे ढग होते. शहरावर नाझींची सत्ता होती. प्रत्येक संशयास्पद हालचालींवर Gestapo ची नजर होती. आत काही तरुण संगीताच्या तालावर हरवून गेले होते. अचानक दरवाजावरचा पहारेकरी धावत आत आला. त्याने फक्त एवढेच सांगितले, Gestapo येत आहे. 

काही सेकंदांत वातावरण बदलले. जॅझ  थांबला आणि नाझींना मान्य असलेले संगीत सुरू झाले. हा प्रसंग एखाद्या चित्रपटातील वाटतो, पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात फ्रँकफर्टमध्ये हे खरोखरच घडत होते.