औद्योगिक क्रांतीपासून मानवाने मोठ्या प्रमाणावर कोळसा, पेट्रोल आणि डिझेलसारख्या जीवाश्म इंधनांचा वापर केला. त्यातून वातावरणात प्रचंड प्रमाणात कार्बन डायऑक्साइड (CO₂) सोडला गेला. यामुळे आज आपल्यापुढे जागतिक तापमानवाढ, हवामान बदल व समुद्राची वाढती पातळी यासारखी गंभीर संकटे निर्माण झाली आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून या CO₂ ला केवळ प्रदूषक न मानता त्याचा उपयोगी संसाधन म्हणून वापर करण्याचे मार्ग शोधत आहेत. त्यातच आता रशियन संशोधकांनी हवेतील CO₂ चे थेट मेथनॉल (Methanol, मिथेनॉल) या स्वच्छ इंधनामध्ये रूपांतर करण्यासाठी नवीन उत्प्रेरक (Catalyst) विकसित केल्याचा दावा केला आहे. हे संशोधन यशस्वी ठरले तर कार्बन प्रदूषण कमी करण्याबरोबरच स्वच्छ ऊर्जा निर्मितीचे नवे पर्व सुरू होऊ शकते. Carbon Dioxide
Green Technology लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
Green Technology लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मंगळवार, २८ जुलै, २०२६
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
