Brahminical Ideology लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Brahminical Ideology लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

वैदिकांचं हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणधर्म -राजू परुळेकर


हिंदू हा फारसी शब्द आहे. ‘हिंद’ आणि ‘हिंदू या शब्दांचा धर्माशी खरंतर काही संबंध नाही. सिंधू नदीच्या पलिकडील भौगोलिक कक्षेत येणाऱ्या प्रदेशाला ‘हिंद’ असं म्हटलं जातं. ‘हिंद’ या शब्दाचा उल्लेख उमर खैय्यामने बाराव्या शतकातही केला होता. सुभाषबाबूंनी दिलेली ‘जय हिंद’ ही घोषणा कोणत्याही धर्मासाठी नव्हती. ‘हिंदवी स्वराज्य’ हा शब्दही धर्ममूलक नाही तर तो प्रदेशाशी संबंधित आहे. हिंद, हिंदू, हिंदुस्तान या सगळ्या शब्दांचा धर्माशी मूलतः संबंधच नाही. Hindutva and Brahminism