इंग्रज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इंग्रज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

राणी वेलू नाचियार: ईस्ट इंडिया कंपनीला धूळ चारणारी शिवगंगाची वीर मंगई

भारताच्या गौरवशाली इतिहासात अनेक वीरांगणांनी आपले दुर्दम्य साहस, प्रखर बुद्धिमत्ता व स्वातंत्र्याच्या अथक संकल्पाने काळाच्या पडद्यावर अमर कहाण्या रचल्या. या धाडसी स्त्रियांनी परकीय आक्रमकांच्या अन्यायी सत्तेला केवळ ललकारलेच नाही, तर आपल्या कर्तृत्वाने स्वातंत्र्याच्या लढ्याला एक नवी चेतना दिली. आपल्या युद्ध कौशल्याच्या जोरावर इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली अमिट छाप सोडली.

अशा महिलांच्या शौर्याच्या व बलिदानाच्या गाथा आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेरणेचा अखंड झरा म्हणून वाहतात. चला तर मग आज पाहूया शिवगंगाची राणी वेलू नाचियार या अशाच एका तेजस्वी वीरांगणेचा इतिहास...