अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेसह जगभरातील डझनभराहून अधिक संशोधकांनी 2032 साली चंद्रावर लघुग्रह धडकण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, 2024 YR4 नामक लघुग्रहाची 2032 मध्ये चंद्राला धडक होण्याची 4% शक्यता आहे. मग प्रश्न असा येतो की, मानवतेने या घटनेला कसा प्रतिसाद द्यावा? लघुग्रह चंद्राला धडण्यापूर्वी त्याला मार्गातून हटवले जावे का? त्याच्यावर अण्वस्त्र हल्ला करून तो नष्ट केला जावा का?
लघुग्रह चंद्राला धडकल्यावर काय होईल?
संशोधकांनी आपल्या शोधनिबंधात नमूद केले आहे की, चंद्र व लघुग्रहाची धडक झाली तर त्यातून चंद्राच्या पृष्ठभागावर 1 हजार पट उंच ढिगारा उत्पन्न होईल. हा ढिगारा पृथ्वीच्या खालच्या कक्षेतील अंतराळपटू व अंतराळ यानांसाठी धोकादायक ठरू शकतो. हा शोधनिबंध गत 15 सप्टेंबर रोजी प्रीप्रिंट वेबसाइट arXiv वर अपलोड करण्यात आला होता. पण आतापर्यंत त्याची समीक्षा झाली नाही.
लघुग्रहावर अणुबॉम्ब फोडणे का धोकादायक?
या शोधनिबंधानुसार, हा संभाव्य धोकादायक ढिगारा तयार होण्यापासून रोखण्यासाठी एक पर्याय हा आहे की, लघुग्रहावर एक अणुबॉम्ब फोडला जावा. वैज्ञानिकांच्या मते, चंद्रावर पोहोचण्यापूर्वीच त्याचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला जावा. पण कोणताही लघुग्रह नष्ट करण्यासाठी अणुस्फोटाचा वापर करण्याचा पर्याय आतापर्यंत केव्हाही वापरण्यात आला नाही. त्यामुळे या योजनेवर काम करताना अनेक जोखमी येऊ शकतात. कदाचित पृथ्वीही संकटात येऊ शकते.
शास्त्रज्ञांना काय वाटते?
फ्लोरिडा स्पेस इन्स्टिट्यूटच्या अंतरिम संचालक जूली ब्रिसेट या घटनेवर भाष्य करताना सांगितले आहे की, लघुग्रह 2024 YR4 चे प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला माहिती नाहीत. यात त्याच्या वस्तुमानाचाही समावेश आहे. त्यामुळे त्याच्यापासून कोणताही धोका उत्पन्न न होता त्याचा मार्ग कसा बदलयाचा हे ठरवणे अवघड सध्यातरी अवघड आहे. त्यापुढे म्हणाल्या, जर स्फोट पुरेसा झाला नाही, तरीही तुमच्याकडून कचऱ्याचे क्षेत्र तयार होईल. यामुळे भविष्यात अनेक गंभीर धोके निर्माण होतील. सर्वात मोठा धोका आपल्या उपग्रहांना होईल.
पृथ्वीला धडकू शकतो का 2024 YR4?
लघुग्रह 2024 YR4 पहिल्यांदा डिसेंबरमध्ये चिलीस्थित लघुग्रह स्थलीय-प्रभाव लास्ट अलर्ट सिस्टम स्टेशनने शोधला होता. नासाचा अंदाज आहे की, त्याचा व्यास 220 फूटांपर्यंत आहे. यामुळे त्याला "शहरांचा विनाशक" मानले जाऊ शकेल. हा उपग्रह पृथ्वीवरील एखाद्या शहराला किंवा प्रदेशाला गंभीर नुकसान पोहोचवू शकतो एवढा मोठा आहे. सुरुवातीला, तज्ज्ञांचा असा विश्वास होता की, हा लघुग्रह आपल्या ग्रहावर आदळण्याची शक्यता खूप कमी आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, अशा धडकेची शक्यता 3% होती. परंतु नंतर पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता नाकारण्यात आली.
2024 YR4 चंद्राला धडकण्याची शक्यता किती?
सध्या पृथ्वी सुरक्षित मानली जात आहे. पण 2024 वायआर 4 हा लघुग्रह चंद्रावर आदळण्याची शक्यता अंदाजे 4.3% आहे. अलिकडेच प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधाच्या लेखकांनी या लघुग्रहाचे निरीक्षण करण्यासाठी एक मोहीम सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. यात त्याचे जवळून वस्तुमान मोजणे समाविष्ट आहे. त्यानंतर, एक स्फोट उपकरण तयार करून ते त्या अंतराळ खडकावर लावण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा